आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नाच्या तीन दिवस आधी पोहोचणार रोहित शेट्टी-करण जोहर:कतरिना-विकी कौशलच्या लग्नाला कबीर खान लावणार हजेरी, रणथंबोरमध्ये करणार टायगर सफारी

15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या व्हीआयपी पाहुण्यांच्या सुरक्षेची जबाबदारी जयपूरच्या एमएच सिक्युरिटी कंपनीला देण्यात आली आहे.

हॉटेल सिक्स सेंस बरवाडा फोर्टमध्ये कतरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या लग्नाची तयारी जोरात सुरू झाली आहे. लग्नासाठी आमंत्रित करण्यात आलेल्या 125 खास पाहुण्यांच्या मुक्कामासाठी सवाई माधोपूर येथील हॉटेल ताज आणि हॉटेल ओबेरॉय येथे व्यवस्था करण्यात आली आहे. या खास पाहुण्यांसाठी लग्नादरम्यान रणथंबोरमध्ये टायगर सफारीही आयोजित केली जाणार आहे. रणथंबोर टायगर सफारी करणाऱ्या खास पाहुण्यांच्या यादीतील काही नावे समोर आली आहेत. हे पाहुणे मुंबईहून जयपूरला विमानाने येणार आहेत. तेथून त्यांना ऑडी-रेंज रोव्हरसारख्या आलिशान कारमधून सवाई माधोपूरला आणले जाईल.

रणथंबोर नॅशनल पार्कमध्ये सध्या पर्यटकांना टायगर सफारीमध्ये वाघाचे दर्शन होत आहे.
रणथंबोर नॅशनल पार्कमध्ये सध्या पर्यटकांना टायगर सफारीमध्ये वाघाचे दर्शन होत आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चित्रपट दिग्दर्शक कबीर खान, रोहित शेट्टी आणि करण जोहर या लग्नाला हजेरी लावणार आहेत. हे सर्व व्हीआयपी पाहुणे 5 डिसेंबरच्या संध्याकाळी सवाई माधोपूरला पोहोचतील आणि 6 किंवा 8 डिसेंबरला टायगर सफारी करू शकतात. मिळालेल्या माहितीनुसार, पाहुणे सकाळच्या वेळेतच टायगर सफारी करणार आहेत. या व्हीआयपी पाहुण्यांच्या सुरक्षेची जबाबदारी जयपूरच्या एमएच सिक्युरिटी कंपनीला देण्यात आली आहे. कंपनीचे बाऊन्सर 4 डिसेंबरला सवाई माधोपूरला पोहोचतील.

अलीकडेच पर्यटकांच्या गाडीसमोर अचानक वाघ आला आणि सुमारे 30 मिनिटे याच परिसरात फिरला.
अलीकडेच पर्यटकांच्या गाडीसमोर अचानक वाघ आला आणि सुमारे 30 मिनिटे याच परिसरात फिरला.

एमएच सिक्युरिटी कंपनीने चौथ का बरवडा येथील मीना धर्मशाळेत बाऊन्सर्सची राहण्याची व्यवस्था केली आहे. हे बाऊन्सर 4 दिवस खास पाहुण्यांच्या सुरक्षेची काळजी घेतील. दुसरीकडे, कालरा बस सर्व्हिसेस कंपनीने चालकांसाठी सवाई माधोपूर येथील द फॉरेस्ट व्ह्यू रिसॉर्ट बुक केले आहे. या हॉटेलमध्ये सुमारे 18 खोल्या बुक केल्या आहेत, ज्यामध्ये ट्रिनल ऑक्युपेंसी उपलब्ध आहे.

हॉटेल सिक्स सेंस बरवाडा फोर्ट येथे रॉयल वेडिंगदरम्यान चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. ड्रोनद्वारे लग्न कव्हरेज केले जाऊ शकते असा संशय सुरक्षा कंपनीला आहे. हे टाळण्यासाठी कंपनीने ड्रोन डिटेक्टरची व्यवस्था केली आहे. यासोबतच शूटरही नेमण्यात आले आहे, जे ड्रोनने लग्न शूट झाल्यास एअर गनने ड्रोन खाली पाडतील.

बातम्या आणखी आहेत...