आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हा कसा सन्मान?:सोनू सूदच्या फोटोला दुधाचा अभिषेक करणाऱ्यांवर भडकली कविता कौशिक, म्हणाली- सोनूदेखील अशा प्रकारे दुधाची नासाडी पाहून दुखी होईल

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कविताने विचारले - आपण सगळेच नेहमीच प्रत्येक गोष्टीचा अतिरेक का करतो

आंध्रप्रदेशातील श्रीकालहस्ती येथे चाहत्यांनी सोनू सोनूदच्या फोटोला हार घालून त्यावर दुधाचा अभिषेक केला. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अभिनेत्री कविता कौशिक मात्र संतापली आहे. तिने दुधाची नासाडी करणा-यांना मुर्ख म्हटले आहे. असा मुर्खपणा बघून सोनूदेखील आनंदी होणार नाही, असे ती म्हणाली आहे. सोनूने मात्र हा व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया हँडलवर शेअर करत 'नम्र' असे लिहिले आहे.

कविताने विचारले - आपण सगळेच नेहमीच प्रत्येक गोष्टीचा अतिरेक का करतो
कविताने आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले, 'आपण सगळेच सोनू सूदवर प्रेम करतो आणि संपूर्ण देश सोनू करत असलेल्या निस्वार्थ कामासाठी कायम त्याचा आभारी राहील. परंतु, मला या गोष्टीची खात्री आहे की, जिथे एकीकडे लोकांना खायला अन्न मिळत नाहीये आणि लोक भुकेने मरत आहेत, तिथे सोनूदेखील अशा प्रकारे दुधाची नासाडी पाहून दुखी होईल. हे मूर्खपणाचं काम आहे. यातून पुढील पिढ्या कोणताही आदर्श घेऊ शकत नाहीत,' असे कविता म्हणाली.

आपण सगळेच नेहमीच प्रत्येक गोष्टीचा अतिरेक का करतो?, असा प्रश्नही तिने विचारला आहे.

बातम्या आणखी आहेत...