आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दादासाहेब फाळके पुरस्कार:अभिनेता के.के मेननला अष्टपैलू अभिनयासाठी पुरस्कार, सोशल मीडियावर फोटो शेअर करुन म्हटले - धन्यवाद

12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दरवर्षी सिनेसृष्टीत अतुलनीय कामगिरी करणाऱ्या कलावंतांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.

'ब्लॅक फ्राइडे' (2004), 'सरकार राज' (2008), 'गुलाल' (2009), 'ABCD'(2013) आणि 'द गाजी अटॅक' (2017) यासारख्या चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारा अभिनेता म्हणजे के. के. मेनन. अलीकडेच त्याला सिनेसृष्टीतील मानाचा समजल्या जाणा-या दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळ्यात अष्टपैलू अभिनेत्याचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. के. के. मेननने सोशल मीडियावर पुरस्काराचे फोटो शेअर करत चाहत्यांचे आभार मानले आहेत. तसेच दादासाहेब फाळके राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्याच्या आयोजकांचेही आभार मानले. दरवर्षी सिनेसृष्टीत अतुलनीय कामगिरी करणाऱ्या कलावंतांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.

रंगभूमीवरुन केली होती करिअरची सुरुवात
के. के. मेननने रंगभूमीवरुन अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले होते.. त्यानंतर काही मालिकांमध्ये त्याने नशीब आजमावले. 1995 मध्ये आलेल्या ‘नसीम’ या चित्रपटात के.के. मेननने एक छोटेखानी भूमिका साकराली होती. त्यानंतर ‘भोपाळ एक्सप्रेस’ या चित्रपटातून के. के. मेनन मुख्य नायकाच्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला आला. त्याला खरी ओळख 2004 मध्ये आलेल्या 'ब्लॅक फ्राईडे' या चित्रपटातून मिळाली होती. 2014 मध्ये आलेल्या 'हैदर' या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. अखेरचा तो 2020 मध्ये आलेल्या 'स्पेशल ऑप्स' या वेब सीरिजमध्ये दिसला होता.

बातम्या आणखी आहेत...