आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'शर्मा जी नमकीन':कॅन्सरच्या उपचारादरम्यान रणबीर कपूरला सोबत ठेवून ऋषी कपूरला वाटायचे अपराधी , मुलाला सांगायचे- मुंबईला परत जा

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडचे दिग्गज ऋषी कपूर यांचा शेवटचा चित्रपट 'शर्मा जी नमकीन' OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापुर्वी रणबीर कपूरने आपल्या वडिलांच्या चित्रपटाचे प्रमोशन करताना ऋषी कपूरबद्दलच्या अनेक गोष्टी शेअर केल्या होत्या. रणबीरने सांगितले की, कर्करोगाच्या उपचारादरम्यान त्याच्या वडिलांना अपराधी वाटायचे, कारण रणबीर आपली सर्व कामे सोडून ऋषी कपूरसोबत न्यूयॉर्कमध्ये होता.

ऋषी कपूर स्वतःला देत होते दोष
रणबीर पुढे म्हणाला, "ते नेहमी स्वत:ला दोषी मानायचे, 'तू इथे का आहेस? मुंबईला परत जा, कामावर जा, घरी जा. काहीतरी कर. बाहेर जेवायला जा, तुझ्या आईला जेवायला घेऊन जा.' असे ऋषी कपूर कायम सांगायचे.

कठीण काळात एकत्र होते संपूर्ण कुटुंब
रणबीर पुढे म्हणाला की त्याची मोठी मावशी आणि त्याची मुलगी, धाकटी मावशी देखील त्यावेळी न्यूयॉर्कमध्ये होती आणि संपूर्ण कुटुंबाने त्या कठीण प्रसंगाचा सामना केला. रणबीर म्हणाला की, ते क्षण त्यांच्यासाठी नेहमीच खास असतील.

रणबीरचा आगामी चित्रपट 'ब्रह्मास्त्र'
आलिया आणि रणबीर पहिल्यांदाच अयान मुखर्जीच्या 'ब्रह्मास्त्र' चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटात अमिताभ बच्चन, डिंपल कपाडिया, नागार्जुन अक्किनेनी आणि मौनी रॉय यांच्याही भूमिका आहेत. हा चित्रपट 9 सप्टेंबर 2022 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...