आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसच्या ट्विटवरून वाद:'द कश्मीर फाइल्स' चित्रपटावर केरळ काँग्रेस म्हणाले -  399 पंडित मारले गेले, 15 हजार मुस्लिमांनी जीव गमावला होता

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जम्मू काश्मीरमध्ये पंडितांपेक्षा मुस्लिम जास्त मृत्युमुखी पडले होते, असे काँग्रेसने म्हटले आहे.

विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित 'द कश्मीर फाइल्स' हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचारावर हा चित्रपट आधारित आहे. सोशल मीडियावरही या चित्रपटाची जोरदार चर्चा होत आहे. मध्य प्रदेशसह अनेक राज्यांनी हा चित्रपट करमुक्त केला आहे. दरम्यान केरळ काँग्रेसने या चित्रपटाबद्दल एक वादग्रस्त ट्विट केले आहे. चित्रपटावर टीका करताना जम्मू काश्मीरमध्ये पंडितांपेक्षा मुस्लिम जास्त मृत्युमुखी पडले होते, असे काँग्रेसने म्हटले आहे.

काय आहे ट्विट?
केरळ काँग्रेसने ट्विटमध्ये म्हटले, ज्यांनी काश्मिरी पंडितांना निशाणा बनवले ते दहशतवादी होते. गेल्या 17 वर्षांत (1990-2007) 399 पंडित दहशतवादी हल्ल्यात मारले गेले होते. या काळात दहशतवाद्यांनी 15 हजार मुस्लिमांची हत्या केली होती.

पुढे त्यांनी आपल्या ट्विटमध्येम म्हटले की, काश्मीर खो-यातून काश्मीर पंडितांचे पयालन तत्कालीन राज्यपाल जगमोहन यांच्या निर्देशावर झाले होते, ते आरएसएस विचारसरणीचे होते.

वादानंतर हटवले ट्विट
काँग्रेसकडून करण्यात आलेल्या ट्विटनंतर सोशल मीडिया यूजर्सनी काँग्रेसविरोधात प्रतिक्रिया दिल्या हेत. त्यानंतर केरळ काँग्रेसने हे ट्विट डिलीट केले आहे.

या चित्रपटाचे निर्माते अभिषेक अग्रवाल आहेत. विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित हा चित्रपट 11 मार्च रोजी प्रदर्शित झाला आहे. काश्मिरी हिंदूंच्या हत्याकांड आणि पयालनावर चित्रपट आधारित आहे. अनुपम खेर, पल्लवी जोशी आणि मिथुन चक्रवर्ती यांच्या या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका असून समीक्षक आणि प्रेक्षकांकडूनही या चित्रपटाला दाद मिळत आहे.

बातम्या आणखी आहेत...