आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पतीच्या निधनाच्या दोन दिवसानंतच रंगभूमीवर परतल्या केतकी दवे:म्हणाल्या - अभिनेत्री म्हणून मला माझ्या भावना लपवता येतात, मी तेच केले

किरण जैन8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • माझ्यामुळे कुणाला त्रास होऊ नये अशी माझी इच्छा आहे. - केतकी

अभिनेते रसिक देव यांचे 28 जुलै रोजी निधन झाले. मूत्रपिंड निकामी झाल्याने त्यांची प्राणज्योत मालवली होती. रसिक यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. मात्र त्यांच्या पत्नी आणि अभिनेत्री केतकी दवे यांनी स्वतःला सावरत दोन दिवसांतच कामावर परतण्याचा निर्णय घेतला. त्यांनी 1 ऑगस्ट रोजी रंगभूमीवर सादरीकरण केले. केतकी गुजराती नाटक 'खेल खेले खेलैया' या नाटकात काम करत आहेत. या नाटकाचा प्रयोग 31 जुलै रोजी सूरत येथे रंगला. यावेळी त्यांनी न डगमगता उत्कृष्ट अभिनय तर केलाच पण उपस्थित प्रेक्षकांनी त्यांना स्टँडिंग ओव्हेशन देखील दिले.

माझ्यामुळे कुणाला त्रास होऊ नये अशी माझी इच्छा आहे - केतकी
तो क्षण आठवताना केतकी यांनी दिव्य मराठीशी संवाद साधताना सांगितले की, "एक कलाकार म्हणून मी रंगभूमीवर फक्त माझे काम करत होते, पण मला अशा प्रकारच्या प्रतिक्रिया, प्रेक्षकांचे असे प्रेम मिळेल, असा विचार मी अजिबात केला नव्हता. रसिक यांची इच्छा होती की मी काहीही झाले तरी हे नाटक रद्द करू नये, मी तेच केले. माझ्याशिवाय या नाटकात अनेक कलाकार आहेत, आम्ही सर्व एक टीम आहोत, माझ्यामुळे कुणाला त्रास होऊ नये अशी माझी इच्छा आहे. एक कलाकार म्हणून मला माझ्या भावना लपवता येतात, आणि मी तेच केले."

मी स्टेजवर माझा सर्वोत्तम परफॉर्मन्स देते- केतकी
ती पुढे सांगतात, "खेल खेले खेलैया हे एक विनोदी आणि एंटरटेनिंग नाटक आहे, ज्यामध्ये माझी एक विनोदी व्यक्तिरेखा आहे. मी सुद्धा माझे दु:ख काही काळ विसरून, रंगमंचावर अतिशय प्रामाणिकपणे माझे पात्र साकारले आहे. पहिल्या दिवसापासून रंगभूमी हा माझा शिक्षक राहिला आहे आणि अजूनही आहे. जेव्हा मी रंगभूमीवर असते तेव्हा मी माझा सर्वोत्तम परफॉर्मन्स देते, कालही मी तेच केले. जेव्हा मला प्रेक्षकांकडून स्टँडिंग ओव्हेशन मिळाले तेव्हा त्यांचे प्रेम पाहून मी भावूक झाले. माझे पती रसिक यांच्या एका गोष्टीने मला धीर दिला - काहीही झाले तरी हो शो मस्ट गो ऑन... मीही शो सुरू ठेवला आहे आणि भविष्यातही असेच माझे काम सुरू ठेवणार आहे," असे केतकी म्हणाल्या.

केतकी इतर महिलांसाठी प्रोत्साहन ठरल्या: किरण भट्ट
केतकीच्या अभिनयाबद्दल, नाटकाचे दिग्दर्शक किरण भट्ट (तारक मेहता फेम नट्टू काका) म्हणतात, "शो सुरू होण्यापूर्वी आम्ही सर्वांनी केतकीच्या धाडसाचे कौतुक केले आणि ती फक्त एकच गोष्ट म्हणाली - आपण एक जोरदार शो करू. केतकी या शोची लीड अॅक्ट्रेस आहे. आणि तिने केलेला अभिनय खरोखरच थक्क करणारा होता. केतकीने नाटकात चांगले काम केले आहे पण तिने ज्या हिंमतीने अभिनय केला आहे, इतर महिलांसाठी ते प्रोत्साहन ठरले. प्रेक्षकांनी तिच्या सन्मानार्थ तिला स्टँडिंग ओव्हेशन दिले."

बातम्या आणखी आहेत...