आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चित्रपटांचे नवीन युग:'KGF 2' ठरला 1000 कोटी कमावणारा एकमेव कन्नड चित्रपट, या चित्रपटांनी प्रादेशिक चित्रपटांना मिळवून दिली वेगळी ओळख

19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या चित्रपटांविषयी जाणून घेऊयात सविस्तर -

KGF 2 या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 1000 कोटींहून अधिकची कमाई केली आहे. कन्नड भाषेतील हा चित्रपट 14 एप्रिल रोजी संपूर्ण भारतात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी तब्बल 164 कोटी रुपयांचे ओपनिंग कलेक्शन केले होते. KGF 2 पुर्वी 2.0, बाहुबली, बाहुबली 2, RRR, साहो या चित्रपटांनी देशभरात तगडे कलेक्शन करून अनेक मोठे रेकॉर्ड प्रस्थापित केले होते आणि आता KGF 2 ने नवीन विक्रमाची नोंद केली आहे.

गेल्या काही वर्षात भारतात पॅन इंडिया चित्रपटांचा ट्रेंड सुरू झाला आहे, त्यामुळे प्रादेशिक भाषांमधील चित्रपटांना संपूर्ण भारतात पसंती मिळत आहे. कन्नड पॉवरस्टार राजकुमारचा 'महिषासुर मर्दिनी' हा कन्नड सिनेमाचा पहिला पॅन इंडिया चित्रपट होता. पण आता या इंडस्ट्रीला KGF 2 ने खरी ओळख मिळवून दिली आहे. KGF व्यतिरिक्त, असे कोणते चित्रपट आहेत ज्यांनी तामिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम, मराठी आणि पंजाबी इंडस्ट्रीला देशभरात वेगळे स्थान मिळवून दिले आहे ते जाणून घेऊया-

2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या एसएस राजामौली यांच्या 'बाहुबली: द बिगनिंग' या चित्रपटाने भारतात आणि इतर देशांमध्येही जबरदस्त व्यवसाय केला होता. पॅन इंडिया रिलीज झालेल्या या चित्रपटाने 650 कोटी रुपयांची कमाई केली आणि तेलुगू चित्रपटांसाठी एक नवीन बेंचमार्क सेट केला.

'बाहुबली'नंतर आलेला त्याचा दुसरा भाग 'बाहुबली: द कन्क्लुजन'ने 1810 कोटींची कमाई करत पहिल्या भागाचा विक्रम मोडित काढला होता. हा चित्रपट वर्ल्डवाइड भारताचा दुसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे. पहिल्या क्रमांकावर आमिर खानचा 'दंगल' आहे ज्याने 2200 कोटींची कमाई केली होती.

2018 मध्ये प्रदर्शित झालेला 'KGF' हा कन्नड चित्रपट देशभरात चांगलाच गाजला होता. कन्नड स्टार यश या चित्रपटात मुख्य भूमिकेत होता. 80 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने 250 कोटींची कमाई केली होती. एवढे मोठे कलेक्शन करणारा हा पहिला कन्नड चित्रपट होता. पहिल्या चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर चित्रपटाचा दुसरा भाग 100 कोटींच्या बजेटमध्ये तयार करण्यात आला असून या चित्रपटाने 1000 कोटींहून अधिक कमाई केली आहे.

2021 मध्ये प्रदर्शित झालेल्या मोहनलाल स्टारर 'मरक्कर' या चित्रपटाने सुमारे 50-60 कोटींचे कलेक्शन केले होते. अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्येच चित्रपटाने मोठा गल्ला जमवला होता. हा चित्रपट पॅन इंडियामध्ये प्रदर्शित झाला होता. पहिल्याच दिवशी चित्रपटाने 6 कोटींची कमाई केली होती. मल्याळम सिनेसृष्टीतील सर्वाधिक ओपनिंग मिळवणारा हा पहिला चित्रपट ठरला.

2014 मध्ये प्रदर्शित झालेला हॅरी बाजवा यांचा 'चार साहिबजादे' हा पंजाबी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे. केवळ 20 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 70 कोटींचे कलेक्शन केले होते. या चित्रपटाला पॅन इंडियामध्ये रिलीज मिळाले नाही परंतु त्याने फक्त 196 स्क्रीन्सवरुन रेकॉर्डब्रेक कलेक्शन केले होते.

2016 साली प्रदर्शित झालेल्या 'सैराट' या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीला देशभरात ओळख मिळवून दिली. या चित्रपटाची लोकप्रियता इतकी होती की 2018 मध्ये बॉलिवूडने त्याचा रिमेक 'धडक' हा चित्रपट बनवला. या चित्रपटाने 110 कोटींची कमाई केली होती. हा मराठी चित्रपटातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे.

बातम्या आणखी आहेत...