आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'KGF 2' ची क्रेझ:यशच्या चाहत्यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून KGF 2 च्या रिलीजच्या दिवशी राष्ट्रीय सुट्टी जाहीर करण्याची केली विनंती

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • केजीएफ 2 च्या टीझरने बनवला रेकॉर्ड

'केजीएफ 2' हा चित्रपट 16 जुलै रोजी रिलीज होणार आहे. चित्रपटाची घोषणा झाल्यापासून सोशल मीडियावर यशच्या चाहत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना ‘केजीएफ 2’च्या रिलीजच्या दिवशी राष्ट्रीय सुट्टी जाहीर करण्यासाठी पत्र लिहिले आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन प्रशांत नील यांनी केले असून यश आणि संजय दत्त या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

चाहत्यांनी पंतप्रधान मोदींना लिहिले पत्र लिहिले
चाहत्यांनी पंतप्रधानांना लिहिलेले पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात लिहिले आहे की, “यशचा केजीएफ 2 हा चित्रपट 16 जुलै 2021 रोजी रिलीज होत आहे हे आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे. चाहते चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत, म्हणून आम्ही आपणास त्या दिवशी राष्ट्रीय सुटी जाहीर करण्यासाठी विनंती करीत आहोत. आमच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा. हा फक्त एक चित्रपट नाही तर ती एक भावना आहे," असे या पत्रात म्हटले गेले आहे.

केजीएफ 2 हा पॅन इंडिया प्रोजेक्ट आहे. कारण तो हिंदीसह तामिळ, तेलुगू आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित होईल. या चित्रपटात श्रीनिधी शेट्टी, संजय दत्त, रवीना टंडन, अनंत नाग, नागभरन, प्रकाश राज, मालविका अविनाश, अच्युत कुमार आणि अर्चना जोइस मुख्य भूमिकेत आहेत.

केजीएफ 2 च्या टीझरने बनवला रेकॉर्ड
केजीएफ 2 या चित्रपटाचा टीझर सर्वाधिक पसंतीचा टीझर बनला आहे. टीझर रिलीज झाल्यानंतर 10 तासांत त्याला 16 मिलियन व्ह्यूज मिळाले आणि सोशल मीडियावर त्याने विक्रम बनवला. टीझर रिलीज झाल्यानंतर काही दिवसांनंतर संजय दत्त म्हणाला, "केजीएफ 2 च्या टीझरला चाहत्यांकडून मिळालेल्या प्रेमामुळे मी खूप खूष आहे. मी या चित्रपटासाठी खूप उत्साही आहे".

बातम्या आणखी आहेत...