आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
केजीएफ चॅप्टर 1च्या यशानंतर आता सुपरस्टार यशचे चाहते या चित्रपटाच्या दुस-या भागाची आतुरतेने वाट बघत आहेत. पण आता चाहत्यांची ही प्रतिक्षा लवकरच संपणार आहे. कारण चित्रपटाचे टीजर रिलीज होऊ लागले आहेत. कन्नड सुपरस्टार यशच्या चित्रपटाचे हिंदी रिमेकचे हक्क गेल्यावेळीप्रमाणेच यावेळी देखील फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांचे प्रॉडक्शन हाऊस एक्सेल एंटरटेन्मेंटने खरेदी केले आहेत. यासाठी त्यांना 90 कोटींपेक्षा जास्त किंमत मोजावी लागली आहे.
अलीकडेच स्पॉटबॉयला दिलेल्या मुलाखतीत फिल्म प्रॉडक्शनच्या जवळच्या एका सूत्राने सांगितले की, केजीएफ 2 एक्सेल एंटरटेन्मेंटला 90 कोटींपेक्षा जास्त किंमतीला विकला गेला आहे. केजीएफ चॅप्टर 1 ची निर्मिती होत असताना, त्याच्या हिंदी रिलीजचा विचार केला गेला नव्हता. पण रिलीजच्या काही दिवसांपूर्वीच त्याचे हिंदी हक्क एक्सेल एन्टरटेन्मेंटला विकले गेले. पण आता गोष्टी बर्याच बदलल्या आहेत. केजीएफपेक्षा त्याच्या सिक्वेलमध्ये सातपट जास्त गुंतवणूक झाली आहे, म्हणून एक्सेलला यावेळी आपल्या हक्कांसाठी जास्त पैसे मोजावे लागले आहेत.
रितेश सिधवानी आणि फरहानच्या प्रॉडक्शन हाऊसने 2018 मध्ये जेव्हा कन्नड चित्रपट केजीएफचे हक्क खरेदी केले होते तेव्हा हा चित्रपट जबरदस्त हिट होणार आहे, याची कल्पनादेखील त्यांना नव्हती. रिपोर्टनुसार चॅप्टर 1 ने निर्मिती खर्चाच्या 35 पट कमाई केली होती.
250 कोटींचा व्यवसाय करणारा पहिला कन्नड चित्रपट
केजीएफ चॅप्टर 1 हा चित्रपट 80 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झाला होता, तर त्याने बॉक्स ऑफिसवर 250 कोटींचा व्यवसाय केला होता. यासह हा चित्रपट सर्वाधिक कमाई करणारा पहिला कन्नड चित्रपट बनला आहे. यश हा पहिला कन्नड नायक आहे ज्याच्या चित्रपटाने इतके मोठे कलेक्शन केले होते.
केजीएफ चॅप्टर 2 चा पहिला टीजर 8 जानेवारीला रिलीज होणार होता, पण चाहत्यांच्या मागणीनुसार तो आदल्या दिवशी म्हणजे 7 जानेवारी रोजी रिलीज करण्यात आला होता. चित्रपटाच्या पहिल्या टीजरला आतापर्यंत 16 कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. अभिनेता यश आणि दिग्दर्शक प्रशांत नील यांनाही प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद पाहून आश्चर्य वाटले. आता चित्रपटाचा दुसरा टीजरही लवकरच रिलीज होणार आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.