आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रसिद्ध अभिनेता शाहीद कपूर आणि प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल ठाकुर यांचा जर्सी हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. मुळात जर्सी हा चित्रपट तेलुगू या भाषेतून हिंदी या भाषेत रिमेक केला आहे. चित्रपटाचे कथानक आणि शाहिद मृणालच्या चांगल्या अभिनयान प्रक्षेक वर्गांकडून चांगला प्रतिसाद देखील मिळाला. त्याचप्रमाणे कौतूक देखील झाले.
अवघ्या 20 कोटींची कमाई करण्यासाठीही या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगलाच संर्घष करावा लागला आहे. चित्रपटाच्या कमाईवर कोणत्या गोष्टींचा परिणाम झाला असेल यावर मृणाल नुकत्यात दिलेल्या मुलाखतीत व्यक्त झाली आहे. यशच्या 'केजीएफ चाप्टर 2' या चित्रपटाचाही 'जर्सी' या चित्रपटाला फटका बसला आहे. असे ती मुलाखतीत म्हणाली. असे असेल की, तेलुगू चित्रपटाचा हिंदी डबिंग व्हर्जनसुद्धा असल्याने कमाईवर परिणाम झाला असेल, अशी शक्यता तिने व्यक्त केली आहे.
जर्सी चित्रपट रिलीज होऊन फक्त तीन आठवडे झाले आहेत. अजूनही प्रेक्षक आवडीने जर्सी हा चित्रपट थिएटर मध्ये पाहायला जात आहे. व लोकांचा चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे. डब केलेला मुळ चित्रपट टेलिव्हीजनवर आणि युट्युबवर उपलब्ध असल्याने कदाचित कमाईवर परिणाम होत असावा. असे मृणाल म्हणाली.
'जर्सी' च्या तेलुगू आणि हिंदी व्हर्जनचं दिग्दर्शन गौतम तिनानूरी यांनीच केले आहे. 2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या तेलूगू चित्रपटाने दोन राष्ट्रीय पुरस्कार पटकावले आहे. 25 कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने तब्बल 52 कोटी रुपये कमावले तसेच 'जर्सी' चित्रपटाने पहिल्या वीकेंडला फक्त 14 कोटी कमावले. मिळालेल्या माहितीनुसार या चित्रपटाने आतापर्यंच जवळपास 17.20 कोटी कमावले आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.