आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

KGF चॅप्टर 2:ओव्हरसीज राइट्ससाठी 'केजीएफ चॅप्टर 2'च्या निर्मात्यांनी मागितले तब्बल 80 कोटी, आकडा ऐकून चित्रपट वितरकांनी हात घेतले मागे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 90 कोटींना विकले गेले हिंदी रिमेकचे हक्क

यश स्टारर 'केजीएफ चॅप्टर 2' हा यावर्षीचा बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. येत्या 16 जुलै रोजी हा कन्नड चित्रपट प्रदर्शित होतोय. रिलीजपूर्वीच या चित्रपटाचे हिंदी रिमेकचे हक्क रितेश सिधवानी आणि फरहान अख्तरच्या प्रॉडक्शन हाऊसने मोठी किंमत चुकवत विकत घेतले आहेत. आता या चित्रपटाबद्दलची एक नवीन माहिती समोर आली आहे. या चित्रपटाच्या ओव्हरसीज राईट्ससाठी निर्मात्यांनी तब्बल 80 कोटी रुपयांची मागणी केल्याचे वृत्त आहे. मात्र एवढ्या रकमेची मागणी केल्यानंतर या चित्रपटासाठी पुढे आलेल्या चित्रपट वितरण कंपनीने आपले हात मागे खेचले आहेत. आता केजीएफचे ओव्हरसीज राइट्स कोण विकत घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

90 कोटींना विकले गेले हिंदी रिमेकचे हक्क
केजीएफ 2 या चित्रपटाच्या हिंदी रिमेकचे हक्क एक्सेल एंटरटेन्मेंटला 90 कोटींपेक्षा जास्त किंमतीला विकले गेले आहेत. केजीएफ चॅप्टर 1 ची निर्मिती होत असताना, त्याच्या हिंदी रिलीजचा विचार केला गेला नव्हता. पण रिलीजच्या काही दिवसांपूर्वीच त्याचे हिंदी हक्क रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांच्या एक्सेल एन्टरटेन्मेंटला विकले गेले. पण आता गोष्टी बर्‍याच बदलल्या आहेत. केजीएफपेक्षा त्याच्या सिक्वेलमध्ये सातपट जास्त गुंतवणूक झाली आहे, म्हणून एक्सेलला यावेळी आपल्या हक्कांसाठी जास्त पैसे मोजावे लागले आहेत.

रितेश सिधवानी आणि फरहानच्या प्रॉडक्शन हाऊसने 2018 मध्ये जेव्हा कन्नड चित्रपट केजीएफचे हक्क खरेदी केले होते तेव्हा हा चित्रपट जबरदस्त हिट होणार आहे, याची कल्पनादेखील त्यांना नव्हती. रिपोर्टनुसार चॅप्टर 1 ने निर्मिती खर्चाच्या 35 पट कमाई केली होती.

250 कोटींचा व्यवसाय करणारा पहिला कन्नड चित्रपट
केजीएफ चॅप्टर 1 हा चित्रपट 80 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झाला होता, तर त्याने बॉक्स ऑफिसवर 250 कोटींचा व्यवसाय केला होता. यासह हा चित्रपट सर्वाधिक कमाई करणारा पहिला कन्नड चित्रपट बनला आहे. यश हा पहिला कन्नड नायक आहे ज्याच्या चित्रपटाने इतके मोठे कलेक्शन केले होते.

'केजीएफ 2' हा चित्रपट 16 जुलै रोजी रिलीज होणार आहे. चित्रपटाची घोषणा झाल्यापासून सोशल मीडियावर यशच्या चाहत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना ‘केजीएफ 2’च्या रिलीजच्या दिवशी राष्ट्रीय सुट्टी जाहीर करण्यासाठी पत्र लिहिले आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन प्रशांत नील यांनी केले असून यश आणि संजय दत्त आणि रवीना टंडन या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...