आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सरप्राइज रिलीज:लीड अ‍ॅक्टर यशच्या 35 व्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशीच रिलीज झाला KGF 2 चा टीझर

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पहिला भाग संपल्यानंतर तेथून ‘केजीएफ-2’ची सुरुवात होणार आहे.

रॉकीच्या दुनियेची झलक पुन्हा एकदा प्रेक्षकांना अनुभवायला मिळाली आहे. निर्मात्यांनी निश्चित वेळेच्या आधीच चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे. आम्ही बोलतोय ते अभिनेता यशच्या आगामी KGF 2 या चित्रपटाविषयी. गुरुवारी रात्री चित्रपटाचा टीझर रिलीज केला गेला. दोन मिनिटांच्या टीझरमध्ये यशसह रवीना टंडन आणि संजय दत्तची झलक बघायला मिळतेय. यात यश अ‍ॅक्शन करताना दिसतोय. टीझर रिलीज झाल्यानंतर तासाभरातच त्याला दीड लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

यापूर्वी हा टीझर अभिनेता यशच्या 35 व्या वाढदिवशी म्हणजे 8 जानेवारी रोजी रिलीज करण्यात येणार होता. मात्र चाहत्यांची मागणी बघता निर्मात्यांनी तो आदल्या दिवशीच रिलीज केला आहे.

या चित्रपटाच्या निर्मात्यांनी चाहत्यांच्या मागणीनुसार केजीएफ 2 चा पहिला टीझर 7 जानेवारी 2021 रोजी रात्री 9: 29 वाजता होमबेल फिल्म्सच्या यू ट्युब वाहिनीवर प्रसिद्ध केला. एक्सेल एन्टरटेन्मेंट आणि एए फिल्म्स यंदा चित्रपटगृहात हिंदीतील महत्त्वाकांक्षी चित्रपट केजीएफ 2 प्रदर्शित करणार आहेत आणि निर्माते त्यापासून खूप खूश आहेत.

केजीएफ 2 च्या टीझरमध्ये काय?
टीझरबद्दल बोलताना सुरुवातीला आपल्याला रॉकीची आई आणि तिचे बालपण दिसेल. रॉकीच्या आईने त्याला कसे वाढविले, तो कसा मोठा झाला आणि त्याने आपल्याला जे वचन दिले होते ते तो आता पूर्ण करेल. पहिला भाग संपल्यानंतर तेथून ‘केजीएफ-2’ची सुरुवात होणार आहे. दुसऱ्या सिक्‍वेलमध्ये यशसह संजय दत्त आणि रवीना टंडन यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. यश आणि संजय दत्त यांच्यातील संघर्ष पाहण्यास मिळणार आहे. हा चित्रपट 2021 मध्ये प्रदर्शित होण्याची शक्‍यता आहे.

दोन वर्षांपासून सुरु आहे प्रॉडक्शन
चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन प्रशांत नील यांचे आहे. तर विजय किरागंदूर यांची निर्मिती आहे. चित्रपटात संजय दत्तने अधीरा हे पात्र साकारले आहे. यश, संजय आणि रवीना यांच्याव्यतिरिक्त श्रीनिधी शेट्टी, प्रकाश राज, मालविका अविनाश यांच्याही महत्त्वाच्या भूमिका या चित्रपटात आहेत. मागील दोन वर्षांपासून या चित्रपटाचे प्रॉडक्शनचे काम सुरु आहे. ते आता लवकरच पूर्ण होईल. चित्रपट आधी ऑक्टोबर 2020 मध्ये प्रदर्शित करण्याचा निर्मात्यांचा मानस होता. मात्र कोरोना आणि लॉकडाऊनमुळे चित्रपटाचे चित्रीकरण थांबवण्यात आले होते.

‘केजीएफ चॅप्टर -1’ बनवले होते अनेक रेकॉर्ड
2018 मध्ये आलेल्या ‘केजीएफ चॅप्टर -1’ने बॉक्‍स ऑफिसवर खूप चांगली कमाई केली होती. कन्नड, तामिळ, तेलुगु आणि हिंदीत प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने अनेक रेकॉर्ड प्रस्थापित केले होते. हा पहिली कन्नड चित्रपट होता, ज्याने 250 कोटींहून अधिकची कमाई केली होती. तर सर्वाधिक कमाई करणारा हिंदीत डब झालेला हा चौथा चित्रपट ठरला. या चित्रपटामुळे यशला खूप प्रसिद्धी मिळाली होती. यामुळे या चित्रपटाच्या सिक्‍वेलची चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाचा सिक्वेल कन्नड, हिंदी, तेलुगू, तामिळ आणि मल्याळम भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...