आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

KGF फेम कृष्णा जी राव काळाच्या पडद्याआड:वयाच्या 70 व्या वर्षी निधन, बंगळुरू येथील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

KGF फेम कृष्णा जी राव यांचे वयाच्या 70 व्या वर्षी निधन झाले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कृष्णा हे बऱ्याच दिवसांपासून आजारी होते. त्यांना उपचारासाठी बंगळुरू येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे आयसीयूमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. बुधवारी त्यांनी उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. मात्र, त्यांना कोणत्या आजाराने ग्रासले होते, हे समोर आले नाही.

KGF मध्ये अंध वृद्धाच्या भूमिकेत दिसले होते कृष्णा

कृष्णा यांच्या निधनाने दाक्षिणात्य सिनेसृष्टीला धक्का बसला आहे. कृष्णा यांचे चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत. कृष्णा जी राव हे साऊथ इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकार होते. यश स्टारर आणि प्रशांत नील दिग्दर्शित KGF व्यतिरिक्त त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या व्यक्तिरेखा साकारल्या होत्या. यशच्या चित्रपटात त्यांनी एका अंध वृद्धाची भूमिका साकारली होती.

KGF नंतर 30 चित्रपट ऑफर झाले होते

कृष्णा जी राव यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक चित्रपटांमध्ये काम केले, पण त्यांना खरी ओळख KGF या चित्रपटातून मिळाली होती. या चित्रपटातील त्यांच्या कामाचे खूप कौतुक झाले होते. केजीएफमध्ये काम केल्यानंतर त्यांना एकापाठोपाठ 30 चित्रपटांमध्ये काम मिळाले होते. कृष्णा कुमार दिग्दर्शित ‘नैनो नारायणपूर’ या तेलुगू कॉमेडी चित्रपटात ते महत्त्वाच्या भूमिकेत झळकले होते.

बातम्या आणखी आहेत...