आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

KGF स्टार यशचा वाढदिवस:200 कोटींचा चित्रपट देणारा कन्नडचा पहिला स्टार आहे यश, एका चित्रपटासाठी 15 कोटी घेतो परंतु वडील आजही आहेत बस ड्रायव्हर

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बस ड्रायव्हर आहेत यशचे वडील

कन्नड अभिनेता यश आज आपला 34 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याच्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी KGF 2 चा टीझर लाँच केला गेला, जो सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. यशच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक नजर टाकुयात त्याच्याशी संबंधित खास गोष्टींवर -

बस ड्रायव्हर आहेत यशचे वडील

मोठी फॅन फॉलोइंग असलेल्या यश मुळचा कर्नाटकच्या हासन जिल्ह्यातील आहे. त्याचे खरे नाव नवीन कुमार गौडा असे असून त्याचा जन्म मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्याचे वडील कर्नाटक राज्य परिवहन बस सेवेत बस चालक आहेत. म्हैसूर येथून शिक्षण पूर्ण झाल्यानंतर यश अभिनयात करिअर करण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बेंगळुरु येथे आला आणि येथील लोकप्रिय बिनाका थिएटर ट्रूपमध्ये सामील झाला. यशने एका मुलाखतीत सांगितले होते की, त्याचे वडील अजूनही बस चालवतात. केजीएफच्या प्री रिलीज इव्हेंटमध्ये एसएस राजामौली म्हणाले होते की, यशचे वडील बस ड्रायव्हर असल्याचे समजल्यावर मला आश्चर्य वाटले होते. माझ्या नजरेत यशपेक्षा त्याचे वडील एक मोठे स्टार आहेत.

टेलिव्हिजनवरुन केली करिअरची सुरुवात
यशने सिनेसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. पण त्याने आपल्या करिअरची सुरुवात नंद गोकुला या मालिकेद्वारे केली होती. याशिवाय तो इतर काही मालिकांमध्ये झळकला. यश एका रात्रीतून स्टार झालेला नाही. त्याने आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात अनेक लहान मोठ्या भूमिका केल्या.

कन्नडमधील सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता
यश गेल्या दशकभरातील कन्नड चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणा-या कलाकारांपैकी एक आहे. कन्नड सिनेमामधील सर्वात महागड्या चित्रपटांपैकी एक असलेल्या केजीएफच्या यशानंतर यश प्रत्येक चित्रपटासाठी 15 कोटी रुपये मानधन घेतो. तो पहिला कन्नड अभिनेता आहे ज्याच्या केजीएफ या चित्रपटाने 200 कोटींचा व्यवसाय केला.

राधिका पंडितसोबत केले लग्न
यशने अभिनेत्री राधिका पंडितशी लग्न केले असून त्यांना दोन मुले आहेत. टीव्ही शो नंद गोकुलाच्या सेटवर राधिका आणि यश पहिल्यांदा भेटले. दोघेही गरिबांच्या मदतीसाठी यशो मार्ग फाउंडेशन चालवतात.

बातम्या आणखी आहेत...