आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
दाक्षिणात्य चित्रपटांमधील सर्वाधिक चर्चेत आणि लोकप्रिय ठरलेला ‘केजीएफ चॅप्टर – 1’ या चित्रपटाचा सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. या चित्रपटात अभिनेता संजय दत्त महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे.
संजय दत्त नुकताच कर्करोगमुक्त झाला आहे. तब्येत बरी झाल्यावर प्रशांत नील दिग्दर्शित 'केजीएफ 2' या बहुभाषिक चित्रपटाच्या कामावर तो परतला आहे. संजयची एनर्जी लेव्हल पाहून निर्माते आणि टीम आश्चर्यचकित झाली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, संजयची परिस्थिती लक्षात घेऊन अॅक्शन दृश्ये चित्रित करण्याचे नियोजन करण्यात आले होते, पण संजय दत्त जणू अजिंक्य आहे. तो वादळासारखा आहे, शूटिंगसाठी तो कशाचाही तडजोड करायला तयार नाही. त्याचा उत्साह पाहण्यासारखा असतो.
‘केजीएफ’ टीमच्या एका सदस्याने सांगितले की, कोणत्याही अभिनेत्यात इतकी उच्च पातळीची ऊर्जा दिसली नाही. अॅक्शन दृश्यांसह संजय दत्त सर्व दृश्ये खूप चांगल्या प्रकारे पूर्ण करत आहे. चित्रपटाचा नायक सुपरस्टार यशही त्याच्या सहकलाकाराबद्दल म्हणतो, ‘संजय दत्तला पुन्हा पूर्ण अॅक्शनमध्ये पाहायचे आहे. त्यांनी कुठेही आमची निराशा केली नाही.’
संजय दत्त या चित्रपटातून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करत आहे. काही महिन्यांपूर्वी संजय दत्तने या आगामी चित्रपटाचा पोस्टर शेअर करुन याबाबत माहिती दिली होती. दुस-या भागाचा आवाका पहिल्या भागापेक्षाही अधिक मोठा असेल असे अभिनेता यशने सांगितले होते. हा चित्रपटही पहिल्या भागाप्रमाणेच हिंदी, तामिळ आणि कन्नड या तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.