आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्टार लाइफ:'केजीएफ'चा हीरो आणि कन्नड सिनेसृष्टीतील महागड्या अभिनेत्यापैकी एक असलेल्या यशचे वडील आहेत बस ड्रायव्हर

2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • केजीएफ चॅप्टर-2 च्या टीझरला 7 दिवसांत 14.5 कोटी व्ह्यूज मिळाले आहेत.

कन्नड सिनेसृष्टीतील सुपरस्टार यशच्या आगामी केजीएफ चॅप्टर 2 या चित्रपटाचा टीझर यू ट्यूबवर धमाल करत आहे. एका आठवड्यात या टीझरला तब्बल 14.5 कोटी व्ह्यूज मिळाले आहेत. जबरदस्त फॅन फॉलोइंग असलेल्या यश कर्नाटकच्या हासन जिल्ह्यातील आहे. त्याचे खरे नाव नवीन कुमार गौडा असून एका मध्यमवर्गीय कुटुंबात त्याचा जन्म झाला. यशचे वडील कर्नाटक राज्य परिवहन बस सेवेत बस चालक आहेत.

म्हैसूर येथून शिक्षण पूर्ण झाल्यानंतर यश अभिनयात करिअर करण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बेंगळुरु येथे आला आणि येथील लोकप्रिय बिनाका थिएटर ट्रूपमध्ये सामील झाला. यशने एका मुलाखतीत सांगितले होते की, त्याचे वडील अजूनही बस चालवतात. केजीएफच्या प्री रिलीज इव्हेंटमध्ये एसएस राजामौली म्हणाले होते की, यशचे वडील बस ड्रायव्हर असल्याचे समजल्यावर मला आश्चर्य वाटले होते. माझ्या नजरेत यशपेक्षा त्याचे वडील एक मोठे स्टार आहेत.

टेलिव्हिजनवरुन केली करिअरची सुरुवात
यशने सिनेसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. पण त्याने आपल्या करिअरची सुरुवात नंद गोकुला या मालिकेद्वारे केली होती. याशिवाय तो इतर काही मालिकांमध्ये झळकला. यश एका रात्रीतून स्टार झालेला नाही. त्याने आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात अनेक लहान मोठ्या भूमिका केल्या.

कन्नड सिनेसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता
यश गेल्या दशकभरातील कन्नड चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणा-या कलाकारांपैकी एक आहे. कन्नड सिनेमामधील सर्वात महागड्या चित्रपटांपैकी एक असलेल्या केजीएफच्या यशानंतर यश प्रत्येक चित्रपटासाठी 15 कोटी रुपये मानधन घेतो. तो पहिला कन्नड अभिनेता आहे ज्याच्या केजीएफ या चित्रपटाने 200 कोटींचा व्यवसाय केला.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser