आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिग्गजाच्या निधनाने बॉलिवूड हळहळले:फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना यांना बॉलिवूडची श्रद्धांजली, शाहरुखने लिहिले - स्वर्गातही तुम्ही सर्वांना मंत्रमुग्ध कराल

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शाहरुख खान, प्रियांका चोप्रासह अनेक कलाकारांनी सोशल मीडियाद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

अर्जेंटिनाचे महान फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना यांचे बुधवारी वयाच्या 60 व्या वर्षी निधन झाले. मॅराडोना यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता. दोन आठवड्यांपूर्वीच त्यांच्यावर मेंदूतील गाठीची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. चार फिफा विश्वचषकात खेळलेल्या मॅराडोना यांनी आपल्या नेतृत्वात 1986 मध्ये अर्जेंटिनाला विश्वविजेतेपद मिळवून दिले होते. फुटबॉल क्षेत्रात दबदबा निर्माण करणाऱ्या मॅरेडोना यांच्या निधनामुळे बॉलिवूड देखील हळहळले आहे. शाहरुख खान, प्रियांका चोप्रासह अनेक कलाकारांनी सोशल मीडियाद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

शाहरुख खानने मॅराडोनाची आठवण ठेवून लिहिले की, "दिएगो मॅराडोना ... तुम्ही फुटबॉलला आणखीन सुंदर बनवले. तुम्हाला कायम आम्ही आमच्या आठवणीत ठेऊ. आशा आहे, जसे तुम्ही या जगाचे मनोरंजन केले, तसेच स्वर्गातदेखील सगळ्यांना मंत्रमुग्ध कराल. तुमच्या आत्म्याला शांती लाभो."

अजय देवगणने श्रद्धांजली वाहताना लिहिले की, "ब-याच वर्षांपासून मॅराडोना यांचा खेळ आणि आयुष्याला फॉलो केले. मैदान (अजय देवगणचा आगामी चित्रपट) या खेळाच्या जवळ आणले. ते एकउत्कृष्ट खेळाडू होते. त्यांना जाताना पाहून मी दु: खी आहे."

अभिनेत्री करीना कपूरची श्रद्धांजली

प्रियांका चोप्राने आपल्या पोस्टमध्ये लिहिले, "तुमच्या आत्म्याला शांती लाभो दिएगो मॅराडोना. आतापर्यंतच्या महान फुटबॉलपटूंपैकी एक. एक खरे लीजेंड."

रणवीर सिंगची श्रद्धांजली-

चित्रपट निर्माते शेखर कपूर लिहितात, "तुमच्या आत्म्याला शांती लाभो मॅराडोना ... पेलेनंतर फुटबॉलमधील सर्वात मोठी प्रतिभा."

अभिषेक बच्चनची श्रद्धांजली-

दक्षिण भारतीय चित्रपट अभिनेता महेश बाबू यांनी लिहिले- "दिग्गजाचे निधन... तुमच्या आत्म्याला शांती लाभो दिएगो मॅराडोना."

विकी कौशलची श्रद्धांजली-

निर्माता बोनी कपूर लिहितात, "चांगला फुटबॉलपटू गेला. मैदानच्या टीमकडून दिएगो मॅराडोना यांना श्रद्धांजली. दिग्गज कधीही मरत नाहीत, त्यांचा वारसा कायम जिवंत राहतो."

अर्जुन कपूरने वाहिली श्रद्धांजली

मॅराडोना यांनी 30 ऑक्टोबरला आपला 60 वा वाढदिवस साजरा केला होता. चार फिफा विश्वचषकात खेळलेल्या मॅराडोना यांनी आपल्या नेतृत्वात 1986 मध्ये अर्जेंटिनाला विश्वविजेतेपद मिळवून दिले होते. मेंदूच्या शस्त्रक्रियेनंतर 8 दिवसांत त्यांना रुग्णालयात सुटी देण्यात आली होती. यानंतर ते घरीच विश्राम करत होते.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser