आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खुशीला कोरोना:अभिनेत्री जान्हवी कपूरची बहिण खुशी कपूरला कोरोनाची लागण

मुंबई8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनाची तिसऱ्या लाटेने देशात हाहाकार माजवला आहे. गेल्या काही दिवसांपासुन सर्वसामान्य नागरिकांबरोबरच सिनेसृष्टीत देखील कोरोनाची लागण होण्याचे सत्र जोरात सुरू आहे. सुमोना कपूर, एकता कपूर, मृणाल ठाकूर, प्रेम चोपडा अशा अनेक सिनेसृष्टीतील कलाकारांना कोरोनाची लागण झाली आहे. आता अर्जुन कपूर आणि अंशुला कपूरची बहिण खुशी कपूर देखील कोरोनाच्या विळख्यात सापडली आहे.

रिपोर्टनुसार, जान्हवी कपूर आणि बोनी कपूर हो दोघेही घरीच क्वारंटाईन आहे. नुकतेच जान्हवीने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले असून, त्याच जान्हवीने तोंडात थर्मामीटर लावले आहे. जान्हवीचे हे फोटो तिच्या चाहत्यांनी पाहिल्यानंतर तिच्या लवकरच बरे होण्याची प्रार्थना देखील केली जात आहे.

खुशी कपूर कोरोना पॉझिटिव्ह

जान्हवीने आपल्या सोशल मीडियावरील पोस्टवर वेगवेगळे फोटो शेअर केले आहेत. त्यात पहिल्या फोटोत जान्हवी तोंडात थर्मामीटर लावताना पाहायला मिळत आहे. तर दुसऱ्या फोटोत जान्हवी आपली बहिण खुशी कपूर हिच्यासोबत अंथरुणावर आराम करताना पाहायला मिळत आहे. तर तिसरे फोटोंमध्ये काही पेटींग्स आणि कलरचे फोटो जान्हवीने शेअर केले आहेत.

दरम्यान, सध्या खुशी कपूर यांना कोरोना झाल्याची अधिकृत माहिती त्यांच्या कुंटुंबियाने दिलेली नाही. मात्र अर्जुन कपूरला कोरोनाची लागण झाली होती. अर्जुनची आज पुन्हा कोरोना चाचणी करण्यात आली असून, त्यात त्याला अहवाल हा निगेटिव्ह आढळला आहे. अशुंला कपूर, रिया कपूर आणि पती करण बुलानी यांना देखील कोरोना झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...