आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कियारा अडवाणीची हुबेहूब कॉपी आहे राजकुमार संतोषींची मुलगी:तनीषा संतोषीचा फोटो पाहून लोक म्हणाले- ती कियाराचे लाइट व्हर्जन आहे

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडचे प्रसिद्ध चित्रपट निर्माते-दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांची मुलगी तनीषा संतोषीचे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. तिचे फोटो समोर आल्यानंतर ती हुबेहुब कियारा अडवाणीसारखी दिसते, असे अनेकांचे म्हणणे आहे. तनीषा नुकतीच नायका फेमिना ब्युटी अवॉर्ड्समध्ये दिसली. या इव्हेंटमध्ये तिचा लूक पाहिल्यानंतर चाहत्यांनी तिची तुलना कियारासोबत करायला सुरुवात केली.

लोक तनीषाला कियाराची जुळी बहीण म्हणत आहेत
अवॉर्ड सोहळ्यात तनीषा गोल्डन आउटफिटमध्ये खूपच सुंदर दिसली. आता तिचे फोटो पाहिल्यानंतर सोशल मीडिया यूजर्स तिला कियारा अडवाणीचे लाईट व्हर्जन म्हणत आहेत. तर काही जण तिला कियारा अडवाणीची जुळी बहीणदेखील म्हणत आहेत.

पाहूयात तनिषाची काही छायाचित्रे...

कोण आहे तनीषा संतोषी?

तनीषा संतोषी लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. चित्रपटसृष्टीत तनीषाची जान्हवी कपूरसोबत चांगली मैत्री आहे. जान्हवी तिची बालपणीची मैत्रीण आहे. तनीषा आणि जान्हवी अनेकदा एकत्र स्पॉट होतात. तनीषाचे वडील राजकुमार संतोषी हे इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव आहे. 1990 मध्ये राजकुमार यांनी 'घायल' हा त्यांचा पहिला चित्रपट बनवला. हा चित्रपट त्या काळातील सर्वात हिट चित्रपटांपैकी एक होता. 'बरसात', 'दामिनी', 'अंदाज अपना अपना', 'चायना गेट', 'अजब प्रेम की गजब कहानी', 'फटा पोस्टर निकला हिरो' असे अनेक चित्रपट त्यांच्या नावी आहेत.

बातम्या आणखी आहेत...