आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंटरव्ह्यू:‘अभिनय माझा आवडीचा छंद, तो मी आयुष्यभर जपेन, रोमान्सप्रमाणेच आता अ‍ॅक्शनमध्येही हात आजमावणार’ - कियारा

किरण जैन12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कियाराला वाटतेय, ‘कबीर सिंह’ च्या यशानंतर अष्टपैलू प्रतिभा दाखवण्याची संधी मिळाली

कियारा अडवाणीचा चित्रपट ‘जुग जुग जियो’ लवकरच मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होत आहे. नुकतेच दिव्य मराठीशी विशेष बातचीतमध्ये कियाराने तिच्या व्यावसायिक आणि खासगी आयुष्याशी संबंधित काही रोचक गोष्टी सांगितल्या…

  • तू इंडस्ट्रीत 8 वर्षे पूर्ण केली. करिअरमध्ये किती समाधानी आहेस?

मला लहानपणापासूनच अभिनेत्री व्हायचे होते आणि त्या शिवाय दुसऱ्या एखाद्या व्यवसायाकडे बघू इच्छित नव्हते. चित्रपटाच्या माध्यमातून तुम्ही अनोळखींना जवळ आणू शकता, आपली कहाणी लोकांपर्यंत पोहोचवू शकतो, असे मला लहानपणापासून वाटायचे. गेल्या आठ वर्षातील अनुभव खूपच शानदार आहेत. गेल्या काही वर्षात खूप चढ–उतार अनुभवले आणि या गोष्टींनी मला प्रत्येक स्थितीत दृढ होणे शिकवले. अभिनय करणे माझा छंद आहे आणि मी आयुष्यभर आपला हा छंद जोपासू इच्छिते. माझा पहिला चित्रपट जेव्हा फ्लॉप झाला तेव्हा सर्वांनी मला सांगितले, जर तू एक चांगली कलाकार असशील तर तू टिकून राहशील आणि काळाच्या परीक्षेत पास होशील. बॉक्स ऑफिस कलेक्शनमुळे तुमच्या यशाचा प्रवास बदलणार नाही. माझ्यासोबतही असेच काहीसे घडले.

  • ‘कबीर सिंह’चे यश तुझ्या आयुष्यात पॉइंट ठरले. काय सांगशील?

माझे खरे काम गेल्या चार वर्षातच प्रेक्षकांपर्यंत पोहोचले, असे माझ्या माझ्या वडिलांचे मत आहे. हो, ‘कबीर सिंह’ पासून हा प्रवास सुरू झाला, ज्यासाठी मी नेहमीच ऋणी राहिन. जे करू इच्छित होते ते काम मी आता करत आहे. 4 वर्षांपूर्वी हा आत्मविश्वास नव्हता. मी मागे वळून पाहते तेव्हा, माझ्या कामाचे कौतुक झाले. आता स्थिती बदलली, कारण आता मी जास्त प्रेरित झाले. ‘कबीर सिंहच्या 3 महिन्यांनंतरच ‘गुड न्यूज’, ‘गिल्टी’, ‘शेरशाह’, ‘भूल भुलैया 2’ सारखे प्रोजेक्टचा भाग व्हायची संधी मिळाली आणि प्रतिभा ओळखण्याची क्षमताही आली.

  • लग्नाबाबत तुझे मत काय?

खरे सांगायचे तर मी त्या मुलींपैकी आहे ज्या लहानपणासून लग्नाचे स्वप्न बघत असतात. मी माझ्या आई– वडिलांचे यशस्वी लग्न पाहिले आणि स्वत:लाही अशाच नात्यात पाहू इच्छिते.

  • खासगी आयुष्यावर होणारी गॉसिप कशी हाताळते?

मी आधीच ठरवले होते की, मी माझ्या खासगी आयुष्यावर कधीही, कोठेही बोलणार नाही. मात्र या गोष्टीला नाकारणारही नाही की लोकांमध्ये होणाऱ्या गॉसिपमुळे फरक पडत नाही, कारण मीही माणूसच आहे. मात्र मी त्याकडे दुर्लक्ष करून पुढे जाते. या गोष्टींकडे जास्त लक्ष जाणार नाही आणि फक्त आपल्या कामावर लक्ष देता येईल यासाठी प्रयत्न करते.

  • ‘गोविंदा नाम मेरा'मध्ये विकी कौशलसोबत काम करण्याचा अनुभव कसा होता ?

विकी आणि मला नेहमीच सर्वात वेगळ्या पद्धतीने जोडले गेले. ‘लस्ट स्टोरीज’मध्ये एक असेच अनोखे नाते दाखवले, ज्यात मनोरंजनाबरोबरच भावनाही होत्या आणि हा एक खूप वेगळ्या प्रकारचा चित्रपट आहे. विकी आणि माझे चित्रपटात काहीसे असेच अनोखे नाते आहे. तुम्ही या पूर्वी कधी पाहिले नसेल. लोक आमची केमिस्ट्री कसे बघतील हे पाहण्यासाठी मी उत्सुक आहे.

  • तू स्वत:ला कशा भूमिकांमध्ये पडद्यावर पाहू इच्छिते?

स्वत:ला पडद्यावर अ‍ॅक्शन करताना पहायचेय. संधी मिळाली तर त्या भूमिकेला पूर्णपणे न्याय देईन, मला पूर्ण विश्वास आहे. मी शारीरिक व मानसिकदृष्ट्या तयार आहे, या शैलीसोबतच एखाद्या ऐतिहासिक चित्रपटाचाही भाग होऊ इच्छिते. आतापर्यंत अ‍ॅक्शन आणि ऐतिहासिक हे दोन प्रकार आहे ज्यात मी काम केलेले नाही. संजय लीला भन्साळींसोबत एखाद्या ऐतिहासिक नाट्यात मुख्य भुमिका करणे माझे स्वप्न आहे.

बातम्या आणखी आहेत...