आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूडचे लोकप्रिय जोडपे सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी 7 फेब्रुवारीला जैसलमेर (राजस्थान) येथे डेस्टिनेशन वेडिंग करणार आहेत. दरम्यान, सोशल मीडियावर सिद्धार्थ आणि कियाराचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यामध्ये दोघेही डान्स करताना दिसत आहेत. आता हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तो दोघांच्या संगीत सेरेमनीचा व्हिडिओ असल्याचा अंदाज अनेकजण व्यक्त करत आहेत.
सिद्धार्थ-कियाराचा हा आहे थ्रोबॅक व्हिडिओ
या व्हिडिओमध्ये कियारा तिचा सिद्धार्थसोबत डान्स करताना दिसत आहे. यामध्ये सिद्धार्थ काळ्या रंगाच्या सूटमध्ये दिसत आहे. दुसरीकडे, कियारा शिमरी लेहेंग्यात खूपच सुंदर दिसत आहे. व्हिडिओमध्ये दोघेही एकत्र खूप आनंदी दिसत आहेत. मात्र हा व्हिडिओ सिद्धार्थ-कियारा यांच्या संगीत सेरेमनीचा नसून त्यांच्या खास मित्राच्या लग्नाचा थ्रोबॅक व्हिडिओ आहे. ‘फिल्मवाला’ या इन्स्टाग्राम पेजवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.
लग्नात मोबाईल आणायला परवानगी नाही
सिद्धार्थ आणि कियाराच्या या भव्य लग्नाची सुरक्षा शाहरुख खानचा एक्स बॉडीगार्ड यासिन युगलवर सोपवण्यात आली आहे. तो आपल्या अंगरक्षक आणि सुरक्षा रक्षकांसह तेथे सर्वांच्या सुरक्षेची काळजी घेईल. या लग्नात नो मोबाईल पॉलिसी आहे. हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना मोबाईल आत नेण्याची परवानगी नाही. त्यांचे मोबाईल लॉकरमध्ये ठेवले जातील, जेणेकरून कोणताही फोटो किंवा सेल्फी लीक होऊ नये. मुंबईहून येणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही मोबाइल फोन वापरण्याची परवानगी नाही.
बॉलिवूडची मेंदी क्वीन कियाराच्या हातावर लावणार मेंदी
लोकप्रिय मेंदी आर्टिस्ट वीणा नागदा कियाराच्या हातावर मेहंदी लावणार आहे. वीणा यांना बॉलिवूडची मेंदी क्वीन म्हटले जाते. माधुरी दीक्षितपासून कतरिना कैफपर्यंत अनेक सेलिब्रिटींच्या हातावर त्यांनी मेंदी लावली आहे. मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानीच्या लग्नातही त्यांनी मेंदी आर्टिस्ट म्हणून काम केले होते. वीणा यांचे मुंबईत एक इन्स्टिट्यूटही आहे. आता वीणा बोहल्यावर चढण्यास सज्ज असलेल्या कियाराच्या हातावर सिद्धार्थच्या नावाची मेंदी काढणार आहेत.
सिद्धार्थ-कियारा 4 फेब्रुवारीला जैसलमेरला पोहोचले
शनिवारी (4 फेब्रुवारी) रात्री सिद्धार्थ जैसलमेर विमानतळाबाहेर दिसला. यावेळी तो ऑल ब्लॅक लूकमध्ये दिसला. त्याच्यासोबत त्याचे कुटुंबीय आणि मित्रही दिसले. सिद्धार्थ आणि त्याच्या कुटुंबापूर्वी दुपारी कियारा विमानतळावरून बाहेर पडताना दिसली होती. यादरम्यान ती फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रासोबत दिसली. व्हाइट आउटफिटमध्ये कियारा खूपच सुंदर दिसत होती.
लग्नासाठी 80 खोल्या आणि 70 कारची व्यवस्था
सिद्धार्थ आणि कियारा यांच्या ग्रँड वेडिंगच्या निमित्ताने उपस्थित राहणाऱ्या पाहुण्यांसाठी सूर्यगड पॅलेसच्या 80 खोल्या बुक करण्यात आल्या आहेत. या पॅलेसमधील लग्नासाठी दररोजचे भाडे 1 ते 2 कोटी रुपयांच्या जवळपास असल्याचे सांगण्यात येत आहे. यासोबतच पाहुण्यांना नेण्यासाठी मर्सिडीज बेंझ, जग्वार आणि बीएमडब्ल्यूसह सुमारे 70 कारची व्यवस्था करण्यात आली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.