आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नाच्या तयारीसाठी दिल्लीला पोहोचला सिद्धार्थ:वेडिंग ड्रेस फायनल करण्यासाठी मनीष मल्होत्रासोबत दिसली कियारा

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी सध्या त्यांच्या लग्नाच्या बातम्यांमुळे चर्चेत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोघे 6 फेब्रुवारीला लग्नबंधनात अडकणार आहेत. दरम्यान, मंगळवारी (31 जानेवारी) कियारा रात्री उशिरा प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रासोबत स्पॉट झाली. दुसरीकडे, सिद्धार्थ होमटाऊन दिल्लीत दिसला.

सिद्धार्थला लग्नाच्या तयारीला पर्सनल टच द्यायचा आहे

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सिद्धार्थने त्याच्या लग्नाची अंतिम टप्प्यातील तयारी स्वतः जातीने बघितली. त्याला प्रत्येक गोष्टीला त्याचा पर्सनल टच द्यायला आवडतो. यामुळे तो दिल्लीला गेला आहे. काही रिपोर्ट्नुसार, सिद्धार्थ काही दिवसांत दिल्लीहून त्याचे आई-वडील आणि जवळच्या कुटुंबियांसोबत लग्नासाठी राजस्थानला पोहोचेल. पण याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही.

मनीष मल्होत्राने डिझाइन केला कियाराचा लहेंगा
कियारा तिच्या लग्नात जो लेहेंगा परिधान करणार आहे तो मनीष मल्होत्राने डिझाईन केला आहे, असा अंदाज आता चाहत्यांनी लावला आहे. त्याचे कारण म्हणजे कियारा मंगळवारी रात्री मनीषला भेटायला पोहोचली होती. तर सिद्धार्थही लग्नाच्या पाच दिवस आधी तयारीसाठी त्याच्या मूळ गावी दिल्लीला पोहोचला आहे.

कियारा-सिद्धार्थ जैसलमेर पॅलेसमध्ये लग्न करू शकतात

दोघांनी लग्नासाठी राजस्थानमधील आलिशान जैसलमेर पॅलेस हॉटेल निवडल्याचे मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले जात आहे. इतकंच नाही तर या जोडप्याच्या लग्नात कडेकोट सुरक्षा व्यवस्थाही ठेवण्यात आली असून, लग्नाआधीपासून ते लग्नापर्यंतचे सर्व सोहळे पॅलेसमध्येच ठेवण्यात येणार आहेत. या लग्नात फक्त कुटुंबातील सदस्य आणि जवळचे मित्र उपस्थित राहणार आहेत. मात्र, अद्याप दोघांच्या लग्नाबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

'शेरशाह'मध्ये एकत्र दिसले होते सिद्धार्थ-कियारा
सिद्धार्थ आणि कियाराने 2021 मध्ये आलेल्या 'शेरशाह' चित्रपटात एकत्र काम केले होते. सिद्धार्थच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेता रोहित शेट्टीच्या 'इंडियन पुलिस फोर्स' या वेब सिरीजमध्ये दिसणार आहे. ही मालिका Amazon Prime वर रिलीज होणार आहे. दुसरीकडे, कियारा लवकरच 'सत्यप्रेम की कथा'मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत कार्तिक आर्यन झळकणार आहे.

बातम्या आणखी आहेत...