आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी सध्या त्यांच्या लग्नाच्या बातम्यांमुळे चर्चेत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोघे 6 फेब्रुवारीला जैसलमेरच्या सूर्यगड पॅलेसमध्ये लग्न करणार आहेत. आता या पॅलेसनेही या लग्नाची पुष्टी केली असून हा भव्य विवाहसोहळा 4 फेब्रुवारी ते 6 फेब्रुवारीदरम्यान या पॅलेसमध्ये होणार आहे. यासोबतच शाहरुख खानच्या एक्स बॉडीगार्डवर या भव्य लग्नाची सुरक्षा व्यवस्था सोपवण्यात आली आहे.
सूर्यगड पॅलेसने दिला लग्नाला दुजोरा
फोटोग्राफर विरल भयानी यांनी गुरुवारी (3 फेब्रुवारी) सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. यात त्यांनी लिहिले, 'आम्ही कियारा आणि सिद्धार्थच्या लग्नाच्या कव्हरजेसाठी जैसलमेरला जात आहोत. आम्ही उद्या तेथे पोहोचणार असून जीपने जैसलमेर गाठणार आहोत. 4 फेब्रुवारी ते 6 फेब्रुवारी या कालावधीत विवाहसोहळा चालणार आहे. हा विवाह सूर्यगड पॅलेसमध्ये होणार आहे.'
सूर्यगड पॅलेसने आपल्या अधिकृत अकाऊंटवरून या पोस्टवर प्रतिक्रिया देत लिहिले, 'लवकरच भेटू.' सूर्यगड पॅलेसची ही प्रतिक्रिया पाहिल्यानंतर सिद्धार्थ आणि कियारा या पॅलेसमध्ये लग्न करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
1 ते 2 कोटी रुपये प्रतिदिन भाडे
मीडिया रिपोर्ट्सनुसार, या पॅलेसमध्ये लग्नासाठी रोजचे भाडे 1 ते 2 कोटी रुपये आहे. यासोबतच पाहुण्यांना नेण्यासाठी मर्सिडीज बेंझ, जग्वार आणि बीएमडब्ल्यूसह सुमारे 70 कारची व्यवस्था करण्यात आली आहे. जैसलमेरमध्ये लग्नानंतर मुंबईत दोघांचे ग्रँड वेडिंग रिसेप्शन होणार आहे.
शाहरुखचा एक्स बॉडीगार्ड लग्नाची सुरक्षा पाहणार
सिद्धार्थ आणि कियाराच्या लग्नाच्या सुरक्षेची जबाबदारी शाहरुख खानचा एक्स बॉडीगार्ड यासीन युगल याच्यावर सोपवण्यात आल्याचे वृत्त आहे. 3 फेब्रुवारीला सुरक्षा रक्षकांची टीम मुंबईहून जैसलमेरला रवाना होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या लग्नाला अमिताभ बच्चन, शाहरुख खान, करण जोहर, वरुण धवन, शाहिद कपूर-मीरा राजपूत आणि ईशा अंबानीसह अनेक सेलिब्रिटींना आमंत्रित करण्यात आले आहे. त्यामुळे लग्नापूर्वी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.
सिद्धार्थने घेतला लग्नाच्या तयारीचा आढावा
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सिद्धार्थ त्याच्या लग्नाच्या अंतिम टप्प्यातील तयारीकडे स्वतः जातीने लक्ष देतोय. त्याला प्रत्येक गोष्टीला त्याचा पर्सनल टच द्यायला आवडतो. यामुळे त्याने दिल्ली गाठली आहे. रिपोर्ट्समध्ये असेही म्हटले जात आहे की, सिद्धार्थ काही दिवसात आईवडील आणि नातेवाईकांसह लग्नासाठी दिल्लीहून राजस्थानला रवाना होईल.
'शेरशाह'मध्ये एकत्र दिसले सिद्धार्थ आणि कियारा
सिद्धार्थ आणि कियाराने 2021 मध्ये आलेल्या 'शेरशाह' चित्रपटात एकत्र काम केले होते. सिद्धार्थच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेता रोहित शेट्टीच्या 'इंडियन पुलिस फोर्स' या वेब सिरीजमध्ये तो दिसणार आहे. ही मालिका Amazon Prime वर रिलीज होणार आहे. दुसरीकडे, कियारा लवकरच 'सत्यप्रेम की कथा'मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत कार्तिक आर्यन झळकणार आहे.
बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी सध्या त्यांच्या लग्नाच्या बातम्यांमुळे चर्चेत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोघे येत्या 6 फेब्रुवारीला लग्नबंधनात अडकणार आहेत. आता या ग्रॅण्ड लग्नातील पाहुण्यांची यादी समोर आली आहे. हा एक खासगी विवाहसोहळा असून यात फक्त 100-125 पाहुणे सहभागी होणार आहेत. येथे वाचा सविस्तर वृत्त...
बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी सध्या त्यांच्या लग्नाच्या बातम्यांमुळे चर्चेत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोघे 6 फेब्रुवारीला लग्नबंधनात अडकणार आहेत. दरम्यान, मंगळवारी (31 जानेवारी) कियारा रात्री उशिरा प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रासोबत स्पॉट झाली. दुसरीकडे, सिद्धार्थ होमटाऊन दिल्लीत दिसला. येथे वाचा सविस्तर वृत्त..
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.