आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा मागच्या काही दिवसांपासून त्यांच्या लग्नाच्या बातम्यांमुळे सातत्याने चर्चेत आहेत. आता अखेर 6 फेब्रुवारी रोजी ते लग्नगाठीत अडकणार आहेत. लग्नासाठी कियारा जैसलमेरमध्ये दाखल झाली आहे. मुकेश अंबानींच्या चार्टर्ड प्लेनने कियारा येथे पोहोचली आहे. यावेळी तिच्यासोबत डिझायनर मनीष मल्होत्रा आणि त्यांची टीम होती.
जैसलमेर येथे कियारा-सिद्धार्थच्या लग्नाविषयी बरीच गुप्तता बाळगण्यात येत होती. पण आता कियारा येथे पोहोचल्याने बॉलिवूडचे हे लोकप्रिय कपल लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सिद्धार्थ मल्होत्रा आज संध्याकाळपर्यंत येथे पोहोचणार असल्याची माहिती आहे.
एअरपोर्टवर दिसली कियाराची क्रेझ
जैसलमेर एअरपोर्टबाहेर कियाराला बघण्यासाठी चाहते जमले होते. येथे तिची चांगलीच क्रेझ बघायला मिळाली. यावेळी कियारा व्हाइट आउटफिटमध्ये दिसली. सिद्धार्थ आणि कियाराच्या लग्नाची तयारी सध्या जोरदार सुरू आहे. सिद्धार्थ-कियाराचा शाही विवाहसोहळा जैसलमेरमधील सूर्यगढ पॅलेसवर पार पडणार आहे. लग्नासाठी 100 ते 125 लोकांना निमंत्रण दिले गेले आहे. 5 फेब्रुवारी म्हणजेच उद्यापासून यांच्या लग्नाच्या कार्यक्रमांना सुरुवात होणार आहे. कियारासह तिचे वडील आणि भाऊदेखील येथे पोहोचले आहेत. हॉटेलमध्ये एन्ट्रीसाठी ड्रायव्हर्ससाठी स्पेशल कार्ड आणि बँड बनवण्यात आले आहेत.
कंगनाच्या पोस्टने वेधले लक्ष
कियारा आणि सिद्धार्थच्या लग्नापूर्वी कंगनाने एक पोस्ट शेअर केली आहे. कंगनाने सिद्धार्थ आणि कियारा यांचा एक छोटासा व्हिडिओ तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर पोस्ट करत लिहिले, “हे जोडपं किती आनंददायी आहे. सिनेसृष्टीत असे खरे प्रेम क्वचितच पाहायला मिळते. ही दोघे एकत्र खूप छान दिसतात.” आता तिच्या या स्टोरीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
वीणा नागदा कियाराच्या हातावर मेंदी लावणार आहे
रिपोर्ट्सनुसार, प्रसिद्ध बॉलिवूड आर्टिस्ट वीणा नागदा कियाराच्या हातावर लग्नात मेंदी लावणार आहे. त्यांनी शुक्रवारी एक फोटो पोस्ट केला, ज्यामध्ये त्यांनी त्या राजस्थानला रवाना होत असल्याचे सांगितले होते.
सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी सध्या त्यांच्या लग्नामुळे चर्चेत आहेत. रिपोर्ट्सनुसार दोघे 6 फेब्रुवारीला जैसलमेरच्या सूर्यगड पॅलेसमध्ये लग्न करणार आहेत. 4 फेब्रुवारी ते 6 फेब्रुवारी दरम्यान या पॅलेसमध्ये दोघांचे लग्नाचे विधी पार पडणार आहेत. दरम्यान, बॉलिवूडच्या प्रसिद्ध मेंदी कलाकार वीणा नागदा यादेखील राजस्थानमध्ये दाखल झाल्या आहेत. राजस्थानला रवाना होण्यापूर्वी मुंबई विमानतळावरून त्यांनी त्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. येथे वाचा सविस्तर वृत्त...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.