आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Kiara Advani Wanted To Give Only One Take For The Climax Scene Of 'Shershaah', Said Everyone Present On The Set Had Become Very Emotional At That Time

इंटरव्ह्यू:'शेरशाह'चा क्लायमॅक्स सीन एकाच टेकमध्ये कियारा आडवाणीला करायचा होता पूर्ण, म्हणाली - 'तेव्हा सेटवर उपस्थित असलेल्या प्रत्येकाचे डोळे पाणावले होते'

किरण जैन4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कियारा म्हणाली - आम्ही 11 जुलै 1999 हा दिवस जगलो

अभिनेत्री कियारा अडवाणी लवकरच दिग्दर्शक विष्णुवर्धन यांच्या 'शेरशाह' या चित्रपटात मुख्य अभिनेत्री म्हणून दिसणार आहे. चित्रपटात ती डिंपल चीमाच्या भूमिकेत दिसणार आहे. डिंपल चीमा या कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या प्रेयसी होत्या. या चित्रपटात अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा कॅप्टन विक्रम बत्रा यांची भूमिका साकारत आहे. अलीकडेच, दैनिक भास्करशी झालेल्या बातचीतमध्ये कियाराने हा चित्रपट आणि डिंपल चीमा यांच्याशी संबंधित खास गोष्टी शेअर केल्या आहेत.

डिंपल चीमा नसत्या तर ही फक्त एक काल्पनिक कथा राहिली असती
कियाराने सांगितले, 'जेव्हा मी डिंपल यांच्याकडून त्यांनी विक्रम बत्रा यांच्यासोबत घालवलेले ते सर्व क्षण ऐकले तेव्हा मी काही काळासाठी हैराण झाले होते. डिंपल यांच्यासारख्या व्यक्तीला ओळखणे आश्चर्यकारक आहे. मी त्यांच्यामुळे खूप प्रभावित झाले. त्यांनी त्यांची गोष्ट आमच्यासोबत शेअर केली, त्यामुळे मी त्यांची आभारी आहे.त त्या नसत्या तर ही फक्त एक काल्पनिक कथा राहिली असती. खरं सांगायचं तर, मी स्वतःला खूप रोमँटिक समजत होते, पण डिंपल यांच्या भेटल्यानंतर खरे प्रेम काय असते ते मला समजले.'

आम्ही 11 जुलै 1999 हा दिवस जगलो
कियाराने सांगितल्यानुसार, चित्रपटाच्या क्लायमॅक्स सीनच्या चित्रीकरणादरम्यान सेटवर उपस्थित प्रत्येकाचे डोळे पाणावले होते. विक्रम बत्रा युद्धात शहीद झाल्यानंतर त्यांची वाट पाहणा-या डिंपल यांच्या दुःखाला पारावार उरला नव्हता. विक्रम यांच्या पार्थिवाला अग्नी देताना डिंपल यांचे अश्रू अनावर झाले होते. या सीनबद्दल बोलताना कियारा म्हणाली, 'आम्ही हा सीन त्याच ठिकाणी पालमपूर इथे चित्रित करत होतो जिथे विक्रम यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. जेव्हा कॅप्टन शहीद झाले होते तेव्हा संपूर्ण शहर त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी आले होते. खूप माणसं दाखवण्यासाठी आमच्याकडे सेटवर ज्युनिअर आर्टिस्ट होते. पण जेव्हा आम्ही सीन चित्रित केला तेव्हा सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी होते.'

कियारा पुढे म्हणाली, 'त्या दिवशी सेटवर विक्रम यांचे भाऊ विशालदेखील आले होते. विशाल हे विक्रम यांचे जुळे भाऊ आहेत. मी खूप भावुक झाले होते त्यामुळे मी दिग्दर्शकांना सांगितले की, मला एका टेकमध्ये हा सीन पूर्ण करायचा आहे. त्यांनी माझ्या चेहऱ्यावरील हावभाव टिपण्यासाठी कॅमेरा अँगल फार जवळचा लावला होता. जेव्हा सीन चित्रित केला जात होता तेव्हा माझ्याही भावना अनावर झाल्या होत्या. पण सोबतच मी माझ्या आजूबाजूला उभ्या असणाऱ्या व्यक्तींचे रडण्याचे आवाज ऐकू शकत होते. त्या सगळ्यांच्या डोळ्यात पाणी होते. कॅमेरात फक्त मी दिसत होते पण तिथे उपस्थित सगळे रडत होते. आम्ही अभिनय करतोय, असे मुळीच वाटत नव्हते. आम्ही 11 जुलै 1999 चा तो क्षण खरंच जगलो.'

संधी मिळाली तर मला पुन्हा दिग्दर्शक विष्णुवर्धन यांच्यासोबत काम करायला आवडेल
कियारा म्हणते, दिग्दर्शक विष्णुवर्धन यांच्यासोबतचा हा माझा पहिला पॅन इंडिया चित्रपट आहे. त्यांची दृष्टी विलक्षण आहे आणि हा चित्रपट त्याच्यापेक्षा इतर कुणीही चांगला बनवू शकला नसता. चित्रपटातील सिद्धार्थ आणि माझ्यामधील मजेदार दृश्ये आणि आमच्यातील विनोद खूप खरे वाटतात, कारण ते आम्हाला आम्ही जसे आहेत तसे राहू देतात. तो तामिळ आहेत, पण त्यांनी पंजाबी उच्चार, बोली आणि चित्रपटातील इतर लहान बारकावे स्वीकारले. ते अजूनही मला 'डिंपल' म्हणतात आणि मला ते आवडते (हसते) जर संधी मिळाली तर मला पुन्हा त्यांच्यासोबत काम करायला आवडेल.'

आमचा चित्रपट डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होतोय याचा आनंद आहे
'आतापर्यंत आपल्या सर्वांना ओटीटीचा आवाका खूप मोठा आहे, हे समजले आहे. अमेझॉन प्राइम व्हिडिओच्या माध्यमातून आमचा चित्रपट 200 देशांतील घरांपर्यंत पोहोचणार आहे. आपल्या अपेक्षेपेक्षा खूप जास्त स्क्रीन मिळवणे ही बाब मोठी आहे आणि मला आनंद आहे की आमचा चित्रपट डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहे,' असे कियारा म्हणाली.

बातम्या आणखी आहेत...