आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
या वर्षी लॉकडाऊननंतर चित्रपटगृहात दुसरा मोठा चित्रपट ‘इंदु की जवानी’ रिलीज होणार आहे. या चित्रपटाची जबाबदारी किआरा आडवाणीच्या खांद्यावर आहे. नुकताच तिचा लक्ष्मी डिजिटल प्लॅटफार्म हॉट स्टारवर रिलीज झाला होता. ‘इंदु की जवानी’ला निर्माते एका हजारांपेक्षा जास्त स्क्रीन्सवर रिलीज करण्याची तयारी करत आहेत. चित्रपटाची सहनिर्माती मोनीषा आडवाणी यांनी याला दुजोरा दिला आहे. विविध प्लॅटफॉर्म्समवर आल्यामुळे या चित्रपटाने रिलीज आधीच नफा कमावल्याचा त्यांचा दावा आहे.
मोनीषा सांगते, मल्टिप्लेक्स आणि सिंगल स्क्रीनवाल्यांची चांगली मागणी होती. ते सुरक्षेवरही चांगले लक्ष देत आहेत. ‘सूरज पर मंगल भारी’ नंतर दर दिवशी देशाच्या वेगवेेगळ्या भागांच्या चित्रपटगृहांत लोक विचारपूस करत आहेत. किआराने कमी चित्रपट केले असले तरी प्रेक्षकांबरोबरच निर्मात्यांचाही तिच्यावर विश्वास आहे. किआराला ‘कबीर सिंह’ आणि ‘गुड न्यूज’ येण्याआधीच साइन केले होते.
‘इंदर की जवानी’ असते तर विरोध झाला नसता
किआरा सुंदरच नव्हे तर ती प्रतिभावंत आहे, हे आम्हाला फार आधीच कळाले होते. त्यामुळे या चित्रपटाची जबाबदारी तिच्या खांद्यावर दिली आहे. मात्र अजूनही ‘इंदु की जवानी’ टायटलवर प्रश्न केले जात आहेत. हेच शीर्षक जर ‘इंदर की जवानी’असते तर इतका विरोध झाला नसता. लोकांना उलट मजा आली असती इंदर म्हणजेच एका तरुणाच्या जवानीचा विषय आहे. येथे किआराने तरुणाची जवानी आणि डेटिंगचे जुने विचार मोडून काढले. आमचा ‘इंदु की जवानी’ लोकांना हसवेल.
जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचे आमचे ध्येय
‘सूरज पर मंगल भारी’ नंतर किआराच्या या चित्रपटावर व्हर्च्युअल प्रिंट फीस लागणार नाही. हा 1000 पेक्षा जास्त स्क्रीनवर रिलीज होणार आहे.म्हणजेच रिलीज झाल्यानंतर जवळजवळ दीड कोटी रुपये वाचतील. हा चित्रपट डिजिटल प्लॅटफार्मच्या आधी चित्रपटगृहात रिलीज केला जाणार आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा चित्रपट पोहोचवण्याचे ध्येय आहे. चित्रपटगृहात लोकांनी परत यावे, अशी आमची इच्छा आहे. आम्हाला यासाठी टी सिरीजही पूर्णपणे मदत करत आहे. त्यांच्यानंतर डिजिटल प्लॅटफॉर्मनेही आमचे म्हणणे ऐकले आहे.
गाणे रिलीज
गुरुवारी चित्रपटाचे एक नवे गाणेदेखील रिलीज झाले. दिल तेरा शीर्षकाचे हे गाणे बेनी दयाल आणि नीती मोहनने गायले आहे. तर ते रोचक कोहलीने कंपोज केले आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.