आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअलीकडेच सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणीचे ब्रेकअप झाल्याच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या दरम्यान, रविवारी दोघेही अर्पिता खानच्या ईदच्या सेलिब्रेशनला एकत्र पोहोचले होते. दोघांनी एकत्र पोज देण्यास नकार दिला असला तरी ते एकत्र पार्टीच्या ठिकाणी दिसले.
सिद्धार्थ-कियारा पार्टीत दिसले एकत्र
सिद्धार्थने पार्टीसाठी काळा कुर्ता-पायजामा घातला होता, तर कियारा राखाडी टॉप आणि पॅंटसह लांब श्रग मध्ये दिसली होती. पार्टीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये कियारा आणि सिद्धार्थ स्वतंत्रपणे पोज देत आहेत.
दोघांना एकत्र पाहून चाहते खूश झाले
शेरशाहच्या कलाकारांना एकत्र पाहून चाहत्यांना आनंद झाला. शेअर केलेल्या व्हिडिओवर एका चाहत्याने कमेंट केली, "माध्यमांद्वारे अफवा पसरवल्या गेल्या. आशा आहे की ते लवकरच लग्न करतील, एकत्र छान दिसतात.." दुसर्याने कमेंट केली की, "त्या दोघांना एकत्र पाहून आम्हा सर्वांना आनंद झाला आहे.
'शेरशाह' होता सिद्धार्थ-कियाराचा पहिला एकत्र चित्रपट
ब्रेकअपच्या अफवांमागचे कारण अद्याप समोर आलेले नाही, मात्र दोघांनीही इंस्टाग्रामवर एकमेकांच्या पोस्ट लाईक केल्या आहेत. अलीकडेच सिद्धार्थने कियाराच्या 'भूल भुलैया 2' चित्रपटाचे प्रमोशन करत असताना तिच्या दोन पोस्ट लाइक केल्या होत्या. 'शेरशाह'ला पुरस्कार मिळाल्यानंतर कियाराने चित्रपटाचे पोस्टरही शेअर केले. 'शेरशाह' हा सिद्धार्थ आणि कियाराचा पहिला एकत्र चित्रपट होता. या चित्रपटातील दोघांच्या केमिस्ट्रीला चांगलीच पसंती मिळाली आहे.
सिद्धार्थ-कियाराचे आगामी प्रोजेक्ट्स
दोघांच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर कियारा 'जुग जुग जियो' आणि 'गोविंदा नाम मेरा' व्यतिरिक्त 'भूल भुलैया 2' मध्ये दिसणार आहे. कियारा एक तेलुगु चित्रपटही शूट करते आहे. दुसरीकडे, सिद्धार्थ 'मिशन मजनू', 'योधा' आणि 'थँक गॉड' मध्ये दिसणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.