आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बॉलिवूड:किआराने साेडला मुरादचा स्त्रीप्रधान चित्रपट

17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेत्री किआरा आडवाणीकडे सध्या मोठ्या बॅनरचे अनेक चित्रपट आहेत. ती ‘भूल भूलैया २’चे शूटिंग करत आहे. मात्र या चित्रपटाचे शूटिंग थांबले आहे, कारण तिच्या सहकलाकारांना कोरोना झाला आहे. शिवाय निर्माते मुराद खेतानने तिला आपल्या एका ‘अपूर्वा’ चित्रपटासाठी घेतले होते. हा स्त्रीप्रधान चित्रपट आहे. हा एक रोमांचक थ्रिलर चित्रपट आहे, यात मुराद किआराला मुख्य भूमिकेत घेऊ इच्छित होते. मात्र याचे बजेट कमी आहे. मात्र किआराने ही आॅफर नाकारल्याची चर्चा आहे.

किआरा आणि तिच्या टीमने चित्रपटाची कहाणी ऐकल्यानंतर हा निर्णय घेतला. ही रिस्क आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. किआराने याआधीच एक स्त्रीप्रधान चित्रपट साइन केला आहे. तो आशुतोष गोवारीकर बनवत आहेत. चित्रपटाचे नाव ‘कर्रम कुर्रम’आहे. याशिवाय ती दिग्दर्शक नितेश तिवारीच्या एका चित्रपटातदेखील दिसू शकते.

बातम्या आणखी आहेत...