आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुपरस्टार किच्चा सुदीपला धमकीचे पत्र:पत्रातून खासगी व्हिडिओ लीक करण्याचा इशारा; भाजपमध्ये प्रवेशाच्या चर्चेदरम्यान आली धमकी

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कन्नड सुपरस्टार किच्चा सुदीपच्या मॅनेजरला धमकीचे पत्र मिळाले आहे. त्या पत्रात अभिनेत्याचा खासगी व्हिडिओ लीक करण्याचा इशारा देण्यात आला आहे. हे धमकीचे पत्र अशावेळी आले आहे जेव्हा किच्चा सुदीप भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.

त्याच्या व्यवस्थापकाने या अज्ञात व्यक्तीविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. कर्नाटकमध्ये निवडणुका होणार आहेत, त्यामुळे किच्चा सुदीप आज म्हणजेच 5 एप्रिल रोजी चाहत्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या बातम्या येत आहेत.

व्यवस्थापकाने फिर्याद दिली असून, पोलीस गांभीर्याने तपास करत आहेत

याप्रकरणी सुदीपचे व्यवस्थापक जॅक मंजू यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आयपीसी कलम 04, 506 आणि 120 (बी) अंतर्गत गुन्हादेखील नोंदवला आहे. सूत्रांवर विश्वास ठेवला तर अधिकारी हे प्रकरण केंद्रीय गुन्हे शाखेकडे (सीसीबी) सोपवण्याचा विचार करत आहेत.

सुदीप यांनी भाजप नेत्यांची भेट घेतली होती

कर्नाटकात 10 मे रोजी विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. काही दिवसांपूर्वी बातमी आली होती की किच्चा सुदीप भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहे. फेब्रुवारीमध्ये त्यांनी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यासह भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली होती.

त्यानंतर त्यांनी इंडिया टुडेला सांगितले की, 'मी डीके शिवकुमार, सीएम बसवराज बोम्मई आणि मंत्री डीके सुधाकर यांना भेटलो आहे. माझे सर्वांशी चांगले संबंध आहेत, पण मी माझ्या राजकीय कारकिर्दीशी संबंधित कोणताही निर्णय घेतलेला नाही. मी जेव्हा ठरवेन तेव्हा जाहीर करेन.

राजकारणात येण्याचे संकेत

सुदीप म्हणाला, 'राजकीय पक्षांपेक्षा मला माझ्या चाहत्यांकडून माझ्या राजकारणात येण्याबद्दल त्यांचे काय मत आहे हे जाणून घेणे आवश्यक आहे. मला त्यांचाही सल्ला घ्यावा लागेल. राजकारणात न येताही सेवा करता येते. प्रथम मला स्वतः विचार करावा लागेल की मला राजकारणात का यायचे आहे, मी राजकारणात न येता माझ्या वैयक्तिक क्षमतेने लोकांची सेवा करू शकतो का?

सुदीपचा आज भाजपमध्ये प्रवेश!

न्यूज 18च्या वृत्तानुसार, सुदीप आज कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करू शकतो. कर्नाटकच्या मध्यवर्ती भागात त्याचा मोठा चाहता वर्ग आहे. तो नायक समाजातील असून एसटी प्रवर्गात येतो. त्यामुळे तो पक्षात सहभागी झाल्याने भाजपलाही मोठा फायदा होऊ शकतो. त्याने पक्षात प्रवेश केल्यास पक्ष सुदीपला स्टार प्रचारक म्हणून प्रोजेक्ट करू शकतो.

हिंदीबाबत केले होते वादग्रस्त विधान

किच्चा सुदीपने गत वर्षी हिंदी भाषेबाबत वादग्रस्त विधान केले होते. हिंदी आता राष्ट्रभाषा राहिलेली नाही, असे तो एका कार्यक्रमात म्हणाला होता. बॉलीवूड पॅन इंडिया चित्रपट बनवण्यासाठी धडपडत आहे, तर दक्षिणेकडील उद्योग भूतकाळात यशस्वी झाले आहेत. यावर अजय देवगणने किच्चा सुदीपला प्रत्युत्तर देत म्हटले की, जर हिंदी राष्ट्रभाषा नसेल तर दक्षिणेतील चित्रपटांचे निर्माते हिंदीत डब केलेले चित्रपट का प्रदर्शित करतात? अजय आणि सुदीप यांच्यातील हा वाद सोशल मीडियावर बराच काळ सुरू होता.

सुदीपच्या ताज्या चित्रपटांबद्दल सांगायचे तर, तो कन्नड भाषेतील अ‍ॅक्शन चित्रपट अक्षरमध्ये दिसला होता. याशिवाय गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या विक्रांत रोना या त्याच्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती.