आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरुषांसारखी दिसते म्हणून लोकांनी टोमणे मारले:वयाच्या 37 व्या वर्षी बनवले सिक्स पॅक अ‍ॅब्स, दक्षिणेतील स्टार्सची फिटनेस ट्रेनर आहे किरण

उमेशकुमार उपाध्याय / अरुणिमा शुक्ला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आधी हे दोन फोटो बघा...

जी साडीत दिसतेय तिचे नाव आहे किरण डेम्बला... जी सिक्स पॅक अॅब्समध्ये दिसतेय तीसुद्धा किरणच आहे. हे ट्रान्सफॉर्मेशन एक सामान्य गृहिणी आणि दोन मुलांच्या आईचे आहे. आता किरण 47 वर्षांची आहे. जिम ट्रेनर, बॉडी बिल्डर, डीजे, सिंगर, फोटोग्राफर हे सर्वकाही ती आहे. ती साऊथची स्टार फिटनेस ट्रेनर आहे. अनुष्का शेट्टी, तमन्ना भाटिया, तापसी पन्नू, एस.एस. राजामौली, रामचरण तेजा आणि इतर अनेक दाक्षिणात्य कलाकारांची ती फिटनेस ट्रेनर आहे.

काही वर्षांपूर्वीपर्यंत किरण एक सर्वसामान्य गृहिणी होती, तिच्यावर घर आणि दोन मुलांची जबाबदारी होती. बाहेरच्या जगाशी जवळपास तिचा काहीही संबंध नव्हता. तिच्यासाठी तिचे कुटुंबच सर्वकाही होते. एक दिवस मेंदूत गुठळी झाली. आजार बरा करण्यासाठी तिने औषधांचा डोस घेतला, त्यामुळे तिचे वजन 53 किलोवरून 75 किलो झाले. मग एक दिवस किरणने स्वतःला बदलण्याचा विचार केला. जिम जॉईन केली. शरीर सुधारण्यासाठी जिम जॉईन केली पण नंतर तेच पॅशन बनले.

किरण बॉडीबिल्डर बनली. साऊथ सुपरस्टार रामचरण तेजाने तिला जिममध्ये पाहिले आणि तो प्रभावित झाला. त्याने त्याची पत्नी उपासनासाठी किरणला जिम ट्रेनर म्हणून नियुक्त केले. त्यानंतर किरणचे नशीब पालटले. एकामागून एक साऊथचे अनेक स्टार किरणचे शिष्य बनले. सिक्स पॅक बॉडी पाहून लोकांनी पुरुषांसारखी दिसते म्हणत टोमणेही मारले. लोक जिममध्ये ट्रेनिंग घेण्यासही नकार देत असत.

किरणचा स्वतःचा एका सामान्य गृहिणीपासून ते स्टार फिटनेस ट्रेनर बनवण्याचा प्रवास खूपच रंजक आहे. साधारणपणे, जवळजवळ प्रत्येक गृहिणीची गोष्ट किरण सारखीच असते. फरक हा आहे की किरणने स्वतःला प्रेरित केले. कठोर परिश्रम केले आणि स्वतःचे नशीब बदलले.

आज स्ट्रगल स्टोरीजमध्ये वाचा किरण डेम्बला हिची कहाणी, तिच्याच शब्दांत….

2013 मध्ये किरणने वर्ल्ड चॅम्पियनशिप फाईटमध्ये 6 व्या स्थानावर मजल मारली होती.
2013 मध्ये किरणने वर्ल्ड चॅम्पियनशिप फाईटमध्ये 6 व्या स्थानावर मजल मारली होती.

मध्यमवर्गीय कुटुंबात वाढले
माझा जन्म 10 नोव्हेंबर 1974 रोजी आग्रा येथील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. आम्ही चार भाऊ बहिणी होतो. वडील बँकर होते आणि आई गृहिणी होती. मला संगीताची खूप आवड होती. मी वयाच्या चौथ्या वर्षी आग्रा घराण्यातून संगीताचे धडे घ्यायला सुरुवात केली. 1995 पर्यंत मी अनेक स्टेज परफॉर्मन्सचा भाग होते आणि त्याच वर्षी मी भारतीय शास्त्रीय गायनात पदव्युत्तर पदवी पूर्ण केली.

सासरच्या मंडळींमुळे संगीतापासून दुरावले
दोन वर्षांनंतर, 1997 मध्ये माझे लग्न एका सिंधी कुटुंबात झाले. माझे पती अजित हे आयटी प्रोफेशनल आहेत. लग्नानंतर गोष्टी बदलतात असे लोक म्हणायचे, मलाही हे लग्नानंतरच कळले. लग्नानंतर माझे आयुष्य फक्त स्वयंपाकघरापुरते मर्यादित झाले होते. माझ्या सासरच्या मंडळींनी गाण्याला मनाई केली होती, म्हणून मी त्यापासून पूर्णपणे दुरावले. त्यानंतर मी कोणताही स्टेज शो केला नाही.

दोन मुलांची आई बनली, अनेक देशांचा प्रवासही केला
लग्नाच्या 2 वर्षानंतर मी 1999 मध्ये मुलगी प्रियांकाला जन्म दिला. त्यानंतर मी माझ्या पती आणि मुलीसह बंगळुरूला शिफ्ट झाले, कारण माझ्या पतीला तिथे WIPRO मध्ये नोकरी मिळाली. नवऱ्याला कामानिमित्त परदेशात जावे लागायचे. यामुळे मी जर्मनी, जपान आणि अमेरिकेचा दौराही केला. यादरम्यान मी पुन्हा गरोदर राहिली आणि बंगळुरूला परत आले आणि मुलगा क्षितिजला जन्म दिला.

जिम आणि घरच्या जेवणाने मी 7 ते 8 महिन्यांत 28 किलो वजन कमी केले - किरण
जिम आणि घरच्या जेवणाने मी 7 ते 8 महिन्यांत 28 किलो वजन कमी केले - किरण

मानसिक ताणामुळे मेंदूमध्ये गुठळी झाली, औषधाच्या ओव्हरडोजमुळे वजन वाढले
घरातच आयुष्य चालले होते. मी काय करतेय, असा प्रश्न अनेकदा पडायचा. माझ्या स्वतःच्या आयुष्यात काहीच उरले नव्हते. एक दिवस माझी तब्येत बिघडली. तपासणीत मेंदूमध्ये गुठळी झाल्याचे समोर आले. मी खूप विचार करायचे, त्यामुळे हा आजार झाला.

उपचारादरम्यान मला खूप त्रास सहन करावा लागला. अनेक एमआरआय चाचण्या करण्यात आल्या. डॉक्टरांनी दिलेल्या औषधांमुळे मला सतत झोप यायची. यामुळे मी घरची कामेही करु शकत नव्हते. डॉक्टरांना माझी स्पीडी रिकव्हरी हवी होती, पण त्याचा माझ्यावर विपरीत परिणाम झाला. औषधांच्या ओव्हरडोसमुळे आरोग्याच्या इतर अनेक समस्या निर्माण झाल्या आणि वजनही वाढले. वजन 53 वरून 75 किलो पर्यंत वाढले.

नवऱ्याच्या सांगण्यावरून संगीताचे वर्ग सुरू केले
या सर्व गोष्टींमुळे मी खूप अडचणीत होते. एके दिवशी मी माझ्या पतीला सांगितले की, मी काहीतरी केले पाहिजे. असे संपूर्ण आयुष्य घालवू शकत नाही. माझी अवस्था पाहून ते म्हणाले की, मी घरीच इतर मुलांना संगीत शिकवायला सुरुवात करावी. घरूनच कारण माझ्यावर उपचार सुरु होते आणि मुलांनाही माझी गरज होती. 10 वर्षांनंतर मी पुन्हा संगीतासाठी स्वतःला तयार केले, हार्मोनियम आणि तबलाही विकत घेतला. शाळेबाहेर स्वतःच्या म्युझिक क्लासचा प्रचार केला. अशा प्रकारे मी संगीत शिकवू लागलो.

उपचारादरम्यान वजन कसे कमी करावे हे समजत नव्हते. या कारणास्तव, मी घराजवळील योग केंद्रात प्रवेश घेतला, परंतु ते योग केंद्र काही वेळातच बंद झाले, त्यानंतर मी स्विमिंग क्लास जॉईन केलाय. पण 15 दिवसांनी तो सोडला कारण स्विमिंग क्लास दरम्यान कोणीतरी मला पाण्यात फेकले, त्यामुळे मी खूप घाबरले होते. दुसरे कारण म्हणजे स्विमिंग क्लासमध्ये जेव्हा मी पाण्याखाली जायचे तेव्हा मला डोकेदुखी व्हायची.

मात्र, काही दिवसांनी माझ्या लक्षात आले की, जर माझ्या कमकुवतपणाने माझ्यावर वर्चस्व गाजवायला सुरुवात केली तर मी भविष्यात काहीही करू शकणार नाही. यानंतर मी पुन्हा स्विमिंग क्लास जॉईन करायचे ठरवले. मी सुमारे एक वर्ष स्विमिंग क्लास केला आणि त्यानंतर मी जिम जॉईन केले.

तमन्ना भाटिया, तापसी पन्नू, एस.एस. राजामौली आणि प्रकाश राज यांची किरण डेम्बला फिटनेस ट्रेनर आहे.
तमन्ना भाटिया, तापसी पन्नू, एस.एस. राजामौली आणि प्रकाश राज यांची किरण डेम्बला फिटनेस ट्रेनर आहे.

जिम करून 28 किलो वजन कमी केले
मी जिम जॉईन केले होते, पण मला भीती वाटत होती. कारण म्हणजे जिममध्ये पुरुषांची संख्या जास्त होती. मी मुलींच्या शाळेत शिकले, त्यामुळे मुलांशी माझी फारशी मैत्री नव्हती. यासाठी मी कोपऱ्यात जाऊन कसरत करायचे. पर्सनल ट्रेनर घेण्याइतकी माझी आर्थिक स्थिती नव्हती. मात्र, कालांतराने मी लोकांशी बोलायला सुरुवात केली आणि बेसिक वर्कआउट करायला सुरुवात केली.

मी पहाटे 4 वाजता उठून जिमसाठी तयार व्हायचे. 5 ते 6 पर्यंत जिम करायचे, मग घरी आधी मुलाला फीड करायची. त्यानंतर मुलीला तयार करुन तिला शाळेत पाठवायची. नवऱ्याच्या ऑफिससाठी टिफिन बनवायची. अशाप्रकारे मी 7 ते 8 महिन्यांत जिम आणि घरचे जेवणाने 28 किलो वजन कमी केले.

शिकल्यानंतर जिम उघडून इतरांना शिकवायला सुरुवात केली
दरम्यान, मी अमेरिकन मसल आणि फिटनेस पर्सनल ट्रेनरचा ऑनलाइन कोर्स केला. या कोर्सने मला खूप मदत केली आणि त्यानंतर मी स्वतःची जिम उघडली. माझा हा प्रवास खूप यशस्वी झाला. मी अनेकांना प्रशिक्षण दिले. अशातच मी घराच्या चार भिंतींमधून स्वतःला बाहेर काढले.

एके दिवशी मला साऊथ स्टार राम चरण भेटले. माझी शरीरयष्टी आणि मेहनतीने ते खूप प्रभावित झाले होते, त्यानंतर त्यांनी मला त्यांची पत्नी उपासना हिच्यासाठी फिटनेस ट्रेनर म्हणून नियुक्त केले. त्यानंतर मी मागे वळून पाहिले नाही आणि एक एक करून मी तमन्ना, तापसी पन्नू, प्रकाश राज, एस.एस. राजामौली आणि अनुष्का शेट्टी यांच्यासाठी ट्रेनर म्हणून काम केले. महिला ट्रेनर असल्याने मला बरेच डिमोटिव्ह करण्यात आले. भारतात महिला फिटनेस ट्रेनरची किंमत नाही कारण कोणीही महिलांकडून प्रशिक्षण घेऊ इच्छित नाही.

या दरम्यान मी घरच्या जबाबदाऱ्याही सांभाळल्या. स्वयंपाक करणे, मुलांना शाळेत पाठवणे, शिकवणी आणि घरातील प्रत्येक छोट्या गोष्टीची काळजी घेतली. अशातच वेळ निघून गेला.

किरणने सुमारे 7 महिन्यांत सिक्स पॅक बनवले.
किरणने सुमारे 7 महिन्यांत सिक्स पॅक बनवले.

वयाच्या 37 व्या वर्षी सिक्स पॅक बॉडी बनवली, लोक म्हणाले- पुरुषांसारखी दिसते
वयाच्या 37 व्या वर्षी मी सिक्स पॅक बॉडी बनवण्याचा निर्णय घेतला. ही गोष्ट पूर्ण करण्यासाठी मी स्वतःला मानसिकदृष्ट्या तयार केले. मी माझा आहार, जीवनशैली सर्वकाही बदलले आणि 6-7 महिन्यांत मी रिब बॉडी बनवली. माझी सिक्स पॅक बॉडी पाहिल्यानंतर लोक टोमणे मारायचे की, मी स्त्री असून पुरुषांसारखी दिसते. आवाज आणि चालणे देखील सर्व पुरुषांसारखे झाले आहे. लोक माझ्याकडून जिममध्ये प्रशिक्षण घेण्यास टाळाटाळ करायचे.

आयुष्यातील सर्वात मोठी आनंदाची गोष्ट...
सिक्स पॅक बॉडी बनवल्यानंतर मी माझे फोटोशूट करून घेतले. एका मित्राच्या मदतीने मी माझी स्वतःची फोटो गॅलरी बनवली ज्याच्या उद्घाटनासाठी चित्रपट दिग्दर्शक एस. एस. राजामौली आणि अनुष्का शेट्टी हे सेलेब्स आले होते. अनेक मोठ्या सेलिब्रिटींच्या उपस्थितीमुळे माझ्या फोटो गॅलरीत मीडिया देखील उपस्थित होता, ज्यांनी मला कव्हर केले. दुसऱ्या दिवशी मी स्वतः अनेक वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्यांवर झळकली. तो माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण होता. माझा फोटो पाहून इंडियन बॉडीबिल्डिंग फेडरेशनने माझ्याशी संपर्क साधला आणि अशा प्रकारे मी 2013 मध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या लढतीत भाग घेतला.

वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या लढतीत बिकिनी घालण्यास पतीचा होता आक्षेप
वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या लढतीत सहभागी होताना, मला थेट प्रवेश मिळाला, कारण सहसा आई झाल्यानंतर फाईट चॅम्पियनशिपमध्ये कुणी सहभागी होत नाही. मी त्यात भाग घेतला होता, पण माझ्यासमोर बिकिनी चॅलेंज उरले होते. माझ्या पतीला बिकिनी घालण्यावर आक्षेप असल्याने यासाठी त्यांचे मन वळवायचे कसे हे मला समजत नव्हते. त्यांना खूप समजावून सांगितले की, मला परदेशात बिकिनी परिधान करावी लागेल, या काळात हा ड्रेस कोड आहे. शेवटी त्यांनी होकार दिला. त्यानंतर मी चॅम्पियनशिपची तयारी सुरू केली.

मी भरपूर ट्रेकिंग केली आहे. मी एव्हरेस्ट बेस कॅम्पदेखील कव्हर केला आहे.
मी भरपूर ट्रेकिंग केली आहे. मी एव्हरेस्ट बेस कॅम्पदेखील कव्हर केला आहे.

एका व्यक्तीने शिवीगाळ केल्याने त्याला मारली होती थोबाडीत
चॅम्पियनशिपच्या 20 दिवस आधी मी एका कार्यक्रमाला जात होते. यादरम्यान मी साडी नेसली आणि केसांमध्ये फुले माळली होती. तेवढ्यात अचानक एका माणसाने माझ्या गाडीला धडक दिली. मी शांत राहिले आणि त्याला काहीच बोलले नाही, पण तो माणूस मला शिवीगाळ करू लागला. त्याच्या या वागण्यानंतर मी गाडीतून उतरले.

माझे शरीर पाहून त्याला धक्काच बसला. तो आणखी काही बोलायच्या आधीच मी त्याच्या कानशिलात लगावली. मी त्याला सांगितले की, यापुढे कोणत्याही महिलेशी गैरवर्तन करू नका. काही वेळातच आजूबाजूचे लोक आणि पोलिस जमा झाले. नंतर त्या माणसाने त्याच्या वाईट कृत्याबद्दल माझी माफीही मागितली.

चॅम्पियनशिपच्या 15 दिवस आधी सासऱ्यांचा मृत्यू
चॅम्पियनशिपच्या 15 दिवस आधी आणखी एक अपघात झाला. माझ्या पतीने सांगितले की, वडिलांचे (सासरे) निधन झाले. त्यामुळे आपल्या सर्वांना मुंबईला जावे लागले. मी घरची धाकटी सून, त्यामुळे घरची सगळी कामे मलाच करावी लागायची. रोज सकाळी उठून मी गाईला चारा द्यायची, मग घरची सगळी कामे करायची. या काळात मला माझ्या शरीरावर आणि चॅम्पियनशिपच्या तयारीवर लक्ष केंद्रित करता आले नाही. कुटुंबीयांपासून शरीर लपवण्यासाठी सलवार सूट घालावा लागला. या सगळ्या गोष्टींचा मला खूप त्रास व्हायचा.

एके दिवशी मी खूप रडले आणि माझ्या पतीशी बोलायचे ठरवले. मी त्यांना सांगितले की, जे घडले आहे ते आपण बदलू शकत नाही, परंतु जे घडणार आहे त्यासाठी आपण काम करू शकतो. त्यांना सांगितले की, मी स्वतःवर जे काही कष्ट केले ते सर्व नष्ट होईल.

भारतात कोणीही महिला प्रशिक्षकाकडून प्रशिक्षण घेऊ इच्छित नाही. लोक माझ्याकडून प्रशिक्षण घेण्यासही टाळाटाळ करायचे.
भारतात कोणीही महिला प्रशिक्षकाकडून प्रशिक्षण घेऊ इच्छित नाही. लोक माझ्याकडून प्रशिक्षण घेण्यासही टाळाटाळ करायचे.

कुटुंबीयांशी खोटे बोलून जिम केली
त्यांनी माझ्याशी सहमत होऊन मला पाठिंबा दिला. माझ्या घरातील वडीलधारी मंडळी हे समजू शकले नाहीत. मी त्यांनाही खूप समजावले. माझ्या पुतण्यामुळे मी माझ्या घराजवळील जिममध्ये वर्कआउट करू लागले. मी सलवार-सूट घालून जिममध्ये जायचे, पण तिथे गेल्यावर जिमचे कपडे घालायचे. पहिल्या दिवशी मी कपडे बदलले तेव्हा तिथे उपस्थित असलेले सर्वजण आश्चर्यचकित झाले.

मी पहिल्यांदा जिममध्ये गेले तेव्हा जिमचे कपडे आणि शूज सोबत आणले नव्हते. कारण घरच्यांनी जिम करायला परवानगी दिली नाही, हे फक्त माझ्या पतीला माहीत होते. नंतर माझा भाचा टेरेसच्या तिसऱ्या मजल्यावरून जिमचे कपडे आणि शूज फेकत असे आणि अशाप्रकारे मला कपडे आणि शूज मिळायचे. मी माझ्या घरच्यांना खोटे बोलायचो की, मी काही कामासाठी बाहेर जात आहे.

शेजाऱ्यांकडून अंडी उकळायची आणि घरच्यांच्या नकळत गुपचूप खायचे
यादरम्यान आणखी एक समस्या निर्माण झाली. सासर्‍यांच्या निधनामुळे घरी नॉनव्हेज बनवायला बंदी होती. गाईला चारायला घराबाहेर पडल्यावर अंडी विकत घ्यायचे. शेजाऱ्यांना मी अंडी उकडून देण्याची विनंती करायचे, पण शेजारी कोणी तयार नव्हते. नंतर एका कुटुंबाने सहमती दर्शवली. ते दररोज माझ्यासाठी अंडी उकळत असत. घरातील कुणालाही कळू नये, म्हणून मी मासे आणि चिकन विकत घ्यायचे आणि घरापासून दूर कुठल्यातरी कोपर्‍यात बसून ते खायचे. कारण अंड्यांव्यतिरिक्त मासे आणि चिकनही माझ्या आरोग्यासाठी आवश्यक होते.

फिटनेस ट्रेनर असण्यासोबतच किरण एक प्रशिक्षित फोटोग्राफर देखील आहे.
फिटनेस ट्रेनर असण्यासोबतच किरण एक प्रशिक्षित फोटोग्राफर देखील आहे.

वर्ल्ड चॅम्पियनशिप फाईटमध्ये 6वे स्थान गाठले
काही दिवसांनी मी हैदराबादला परत आले आणि घरी न जाता थेट जिममध्ये गेले. त्यानंतर मी 10 दिवस जिममध्ये खूप कसरत केली आणि त्यानंतर चॅम्पियनशिपसाठी बुडापेस्टला गेले. स्पर्धेदरम्यान, मी पहिल्यांदा बिकिनी घातली, नंतर आरशात पाहून स्वतःची प्रशंसा केली. या स्पर्धेत मी सहाव्या क्रमांकावर पोहोचले. स्पर्धेत सहावा क्रमांक मिळाल्याचे जाहीर झाल्यावर मी खूप रडले. खूप खडतर प्रवास करून मी इथपर्यंत पोहोचले होते.

त्यानंतर मी घरी परतले. माझ्या यशाने घरातील सर्वजण खूप आनंदी होते. सर्व काही पुन्हा सुंदर आणि चांगले झाले. काही दिवसांनी माझे काही मित्र डोंगरात ट्रेकिंगला जात असल्याचे मला कळले. मग मी पण त्यांच्यासोबत जाण्याचे ठरवले. खरंच हा अनुभव पण खूप सुंदर होता. मी भरपूर ट्रेकिंग केली. मी एव्हरेस्ट बेस कॅम्प देखील कव्हर केला आहे.

डीजे आणि फोटोग्राफर देखील आहे किरण
इतक्या गोष्टी साध्य करूनही कुठेतरी हृदयात संगीत जिवंत होते. कारण मी लहानपणापासून ते जगत आले आणि माझे पहिले प्रेम तेच आहे. त्यानंतर संगीतात काहीतरी करायचे ठरवले. वयाच्या 42 व्या वर्षी मी डिस्को जॉकी म्हणून माझा ठसा उमटवला. माझ्या या कामासाठी मी माझ्या पतीलाही पटवले.

हे काम तरुण करतात, पण मी जोखीम पत्करून डिस्क जॉकीचा कोर्स केला. यानंतर मी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर संगीत दिले. 2017 मध्ये मला बेस्ट डेब्यू फिमेलच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

किरणला 2017 मध्ये डेब्यू फिमेलचा पुरस्कार मिळाला होता.
किरणला 2017 मध्ये डेब्यू फिमेलचा पुरस्कार मिळाला होता.

मी इथेच थांबले नाही. माझी मोबाईल फोटोग्राफी चांगली होती, म्हणून मी फोट्रिया अकादमीमध्ये प्रोफेशनल फोटोग्राफीचा कोर्स केला. मी आता एक ट्रेंड फोटोग्राफर देखील आहे आणि फोटोग्राफीशी संबंधित अनेक कार्यक्रमांमध्ये सहभागी होत असते.

बातम्या आणखी आहेत...