आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोनावर मात:किरण कुमार यांनी सांगितली आपबीती, म्हणाले - मी डिस्पोजेबल ताटात जेवतो, स्वतःची खोली स्वतः स्वच्छ करतो 

मुंबई (किरण जैन)एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • किरण कुमार यांची 14 मे रोजी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती.

काही दिवसांपूर्वी अभिनेते किरण कुमार यांना कोरोनाव्हायरसची लागण झाली होती. त्यांची दुसरी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. पण आता दिलासादायक बातमी म्हणजे त्यांनी कोरोनावर मात केली असून त्यांची तिसरी कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. या वृत्तामुळे त्यांच्या कुटुंबियांना दिलासा मिळाला आहे.

किरण यांनी घरात राहून कोरोनावर कशी मात केली हे सांगितले आहे. 14 मे रोजी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांनी मुंबईतील त्यांच्या राहत्या घरी स्वतःला क्वारंटाईन केले होते. त्यांनी सांगितल्यानुसार, ते डिस्पोजेबल ताटात जेवतात आणि स्वतःची खोली स्वतः स्वच्छ करतात. 

किरण यांनी सांगितल्यानुसार, ते घरातील दुस-या मजल्यावर एकटे आयसोलेशनमध्ये राहात आहेत. ते म्हणाले, "मी माझ्या पत्नीला माझ्यासाठी डिस्पोजेबल भांडी खरेदी करण्यास सांगितले. ती माझे जेवण पाय-यांवर ठेवते आणि मी कुणाच्याही संपर्कात न येता, ते खोलीत आणतो. जेवतो आणि नंतर प्लेट्स डिस्पोज करतो. मी स्वतः पलंगावरची चादर बदलतो आणि खोली स्वतः स्वच्छ करतो."

  • 'कोरोना व्हायरसला डेथ वॉरंट समजू नका'

दिव्य मराठीसोबत झालेल्या बातचीतमध्ये किरण म्हणाले, "मी कोरोनाव्हायरसला घाबरत नाही. त्यामुळे मनात कसलीच भीती वाटली नाही. आता  या व्हायरससोबतच जगायचे आहे, हे आपण गृहित धरायला हवे.  हे एक सामान्य फ्लूसारखे आहे. घाबरून जाण्याची गरज नाही. त्याला डेथ वॉरंट समजू नका. फक्त तुमच्या आरोग्याची योग्य काळजी घ्या. आणि त्यासोबत जगण्याची सवय लावा."

  • 'मला माहित नाही की, या विषाणूची लागण मला कशी झाली'

किरण म्हणाले, "मी कुठे बाहेर गेलो नाही किंवा कोणाशीही संपर्कात आलो नाही. तरीही मला या विषाणूची लागण कशी झाली, हे सर्व कसे घडले माहित नाही?  नेहमीप्रमाणे मी नियमित आरोग्य तपासणीसाठी रुग्णालयात गेलो होतो. पण डॉक्टर म्हणाले की, प्रथम कोरोनाव्हायरसची तपासणी करणे आवश्यक आहे. कोणत्याही लक्षणांशिवाय माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला."

किरण पुढे म्हणाले, "मी तातडीने बीएमसी अधिका-यांना याची माहिती दिली. मी दोन मजल्यांच्या घरात राहत असल्याने अधिका-यांनी मला घरातील एका मजल्यावर एकटे राहण्याची परवानगी दिली. मी स्वत:ला आयसोलेट केले आणि खबरदारी घ्यायला सुरुवात केली.' काही दिवसांनंतर पुन्हा चाचणी केली तर रिपोर्ट निगेटिव्ह आला. मात्र आताही काळजी घेतोय. मी कुटुंबातील सदस्यांपासून दूर राहतोय आणि घरीही मास्कचा वापर करतोय, असेही किरण यांनी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...