आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टेस्ट रिपोर्ट:74 वर्षीय किरण कुमार यांची केला कोरोनाचा पराभव, कोरोनामुक्त झाल्यावर म्हणाले  - हा विषाणू आपल्यासोबत राहायला आला आहे

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • किरण यांची कोरोनाची चाचणी 14 मे रोजी पॉझिटिव्ह आली होती.

ज्येष्ठ अभिनेते किरण कुमार यांनी कोरोनावर मात केली आहे. सलग तिस-यांदा त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. 74 वर्षीय किरण यांनी एका इंग्रजी वेबसाइटशी बोलताना हे उघड केले. तसेच कोरोनाच्या रूग्णांपासून अंतर ठेवा, मात्र त्यांच्यावर बहिष्कार घालू नका, असे आवाहनदेखील त्यांनी केले आहे.  

  • 'बहिष्कार नव्हे तर सामाजिक अंतर ठेवा'

टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना किरण म्हणाले, "कोरोना माझ्या शरीरातून, माझ्या घरातून आणि मनातून निघून गेला आहे." पुढे, यापासून खबरदारीचा उपाय सांगताना ते म्हणाले, "कोरोनाव्हायरसचा पराभव करण्यासाठी सामाजिक अंतर ठेवणे आवश्यक आहे. पण कोरोना रुग्णांवर बहिष्कार घालणे हे योग्य नाही. एखाद्या व्यक्तीची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह येणे हा गुन्हा नाही, पण कोरोनाला लपविणे गुन्हा आहे."

  • 'अत्यावश्यक सेवा देणार्‍या लोकांसोबत गैरवर्तन करणे चुकीचे'

किरण पुढे म्हणाले, जे लोक स्वतःच्या जीवाची पर्वा न करता इतरांसाठी झटत आहेत, त्यांच्याशी गैरवर्तन करणे चुकीचे आहे. जर शेजारची एखादी व्यक्ती संक्रमित झाली असेल आणि ती सेल्फ आयसोलेशनमध्ये राहात असेल, तर त्याच्यासाठी उभे राहिले पाहिजे. त्या ज्येष्ठ नागरिकांचा विचार करा जे एकटे राहतात. त्यांची या परिस्थितीत काय अवस्था झाली असेल. त्यांच्या मदतीसाठी आपण पुढे यायला हवे, असेही किरण म्हणाले.  

  • रुग्णांना डिस्पोजेबल पॅकेजिंगमध्ये जेवण द्या

या बातचीतमध्ये किरण यांनी रुग्णांना डिस्पोजेबल पॅकेजिंगमध्ये जेवण देण्याचा सल्ला दिला आहे. ते म्हणाले, "भविष्यात या गोष्टी सुधारल्यानंतर ज्यांच्या मदतीसाठी तुम्ही उभे राहिलात ते लोक नक्कीच यासाठी तुमचे आभार मानतील. सकारात्मक आणि सहानुभूतीसह आम्हाला कोरोनाव्हायरसचा सामना करावा लागेल."

  • 'कोरोना येथे राहायला आला आहे'

किरण यांनी लोकांना सुरक्षित राहण्याचे आवाहन केले आणि म्हणाले, "कोरोनाव्हायरस येथे राहण्यासाठी आला आहे. सध्या यावर उपचार नसल्यास सगळे घाबरले आहेत. पण घाबरुन जाऊ नका. काळजी घ्या आणि तुमच्यामुळे तो इतरांना होणार नाही याची खात्री करुन घ्या.'

ते पुढे म्हणाले, "मी 14 दिवसांपासून सेल्फ आयसोलेशनमध्ये राहिलो आणि आता चाचणी निगेटिव्ह आली तरीदेखील मी सावधगिरी बाळगत आहे. थोड्याशा लक्षणांमुळे आपल्याला रुग्णालयात जाण्याची आवश्यकता नाही.  बेड, व्हेंटिलेटर आणि हेल्थकेअर वर्कर्सची कमतरता भासत आहे."

  • किरण यांची चाचणी 14 मे रोजी पॉझिटिव्ह आली होती

किरण यांची कोरोनाची चाचणी 14 मे रोजी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर ते होम क्वारंटाईन झाले होते. त्यांनी मुलाखतीत सांगितले की, मी घराच्या दुस-या मजल्यावर एकटा राहू लागलो. माझी पत्नी मला डिस्पोजेबल ताटात जेवण द्यायची. मी माझा पलंग आणि खोली स्वतः स्वच्छ करायचो. याकाळात मी घरच्यांपासून दूर राहिलो, असे किरण यांनी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...