आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॅन्सरशी लढा देत आहेत किरण खेर:68 वर्षीय किरण खेर यांना ब्लड कॅन्सरचे निदान, चार महिन्यांपूर्वी हात फ्रॅक्चर झाल्यानंतर आजाराबद्दल समजले होते

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • किरण खेर यांच्या कुटूंबाकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

बॉलिवूड अभिनेत्री आणि भारतीय जनता पक्षाच्या चंदीगडमधील खासदार किरण खेर या मल्टीपल मायलोमा नावाच्या आजाराने त्रस्त असून हा आजार रक्ताच्या कर्करोगाचा एक प्रकार आहे. मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ही माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष अरुण सूद यांनी दिली आहे.

हात फ्रॅक्चर झाल्यानंतर झाले होते आजाराचे निदान
याविषयी अधिक माहिती देताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष अरुण सूद म्हणाले की, 'लॉकडाऊनमध्ये किरण चंदीगडमध्ये होत्या आणि त्या लोकांना मदत करत होत्या. इतकेच नव्हे तर, मागील वर्षी 11 नोव्हेंबरमध्ये जेव्हा त्यांचा हात फ्रॅक्चर झाला, त्यानंतर त्यांच्यावर चंदीगड येथे उपचार सुरू झाले आणि त्याच वेळी तपासणी दरम्यान त्यांना मल्टिपल मायलोमा नावाचा आजार असल्याचेही आढळले. 4 डिसेंबर रोजी त्यांना मुंबईत आणण्यात आले. या आजारावर उपचार घेण्यासाठी त्यांना सतत हॉस्पिटलमध्ये जावे लागत आहे,' असे सूद यांनी सांगितले.

2014 मध्ये प्रथमच निवडणूक लढवली
किरण खेर यांनी 2014 मध्ये पहिली लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यांनी कॉंग्रेसच्या पवन बन्सल आणि आम आदमी पक्षाच्या गुल पनाग यांचा पराभव केला. 2019 मध्ये पवन बन्सल यांचा पराभव करून त्या पुन्हा एकदा लोकसभेच्या खासदार म्हणून निवडून आल्या. गेल्या वर्षी किरण खेर शहरातून बेपत्ता असल्याचे पोस्टर चंदीगडमध्ये कोरोना साथीच्या दरम्यान लावण्यात आले होते. कॉंग्रेसने त्यांच्यावर आरोप केला होता की, महामारीच्या काळात त्या आपल्या लोकसभा मतदारसंघाकडे दुर्लक्ष करत आहेत. नंतर, किरण यांनी कॉंग्रेसच्या आरोपांचे खंडन करणारा एक व्हिडिओ प्रसिद्ध करून त्याच्यावर पलटवार केला होता.

अरुण सूद किरणचा बचाव करत म्हणाले, "गेल्या वर्षी डिसेंबरपर्यंत त्या चंदीगडमध्ये होत्या. त्या ज्येष्ठ नागरिक आणि डायबिटिक आहेत. लॉकडाऊनदरम्यान त्यांना घराबाहेर न जाण्याचा सल्ला देण्यात आला होता. केवळ आपल्या आजारावर उपचार घेण्यासाठी त्या शहराबाहेर गेल्या होत्या. आजारी असूनही किरण माझ्याशी सतत संपर्कात होत्या आणि शहराशी संबंधित वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करीत होत्या.'

किरण 1983 मध्ये चित्रपटांमध्ये आल्या होत्या
किरण यांनी 1983 मधील ‘आसरा प्यार दा’ या पंजाबी चित्रपटातून चित्रपटसृष्टीत प्रवेश केला होता. बॉलिवूडमधील त्यांचा पहिला चित्रपट 'पेस्तोंजी' (1988) होता. सरदार बेगम (1996) या हिंदी चित्रपटासाठी त्यांना प्रथमच राष्ट्रीय (विशेष ज्युरी) चित्रपट पुरस्कार मिळाला. 'बारीवाली/द लेडी ऑफ द हाउस' (1999) या बंगाली चित्रपटासाठी त्यांना दुसरा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्यांच्या इतर लोकप्रिय चित्रपटांमध्ये देवदास '(2002),' वीर जारा '(2004),' ओम शांती ओम '(2007) आणि' ब्यूटीफुल '(2014) यांचा समावेश आहे.

किरण खेर यांचे वैयक्तिक आयुष्य
किरण यांचे पहिले लग्न मुंबईतील व्यावसायिक गौतम बैरीसोबत झाले होते, या दोघांना एक मुलगा सिकंदर आहे. नंतर अभिनेता अनुपम खेर यांच्याशी त्यांची जवळीक वाढली आणि त्यांनी बैरीसोबत घटस्फोट घेऊन अनुपम खेर यांच्याशी लग्न केले. अनुपम आणि किरण यांना स्वतःचे मुल नाही. पण सिकंदर त्यांच्या बरोबर राहतो आणि अनुपम त्याच्यावर सख्खा मुलाप्रमाणे प्रेम करतात.

बातम्या आणखी आहेत...