आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खुलासा:किरण खेर म्हणाल्या - हॉस्पिटलमध्ये कर्करोगावर उपचार घेत असताना देखील माझे काम सातत्याने सुरु होते

14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कर्करोगावरील उपचारादरम्यानही किरण खेर यांचे काम सुरु होते

बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजप खासदार किरण खेर यांना काही महिन्यांपूर्वी कर्करोगाचे निदान झाले होते. उपचारादरम्यान त्या प्रसिद्धीपासून दूर राहिल्या, पण आजारपणातदेखील त्यांनी आपले काम बंद केले नव्हते. त्यांचा मुलगा सिकंदर खेर त्यांच्या हेल्थबद्दल चाहत्यांना सतत अपडेट देत होता. पण आता किरण यांनी स्वतः एका मुलाखतीदरम्यान खुलासा केला की, हॉस्पिटलमध्ये कर्करोगावर उपचार घेत असतानाही त्या काम करत होत्या.

कर्करोगावरील उपचारादरम्यानही किरण खेर यांचे काम सुरु होते
किरण यांनी खुलासा केला, "जेव्हा माझ्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते, तेव्हादेखील मी माझे काम सुरु ठेवले होते. फोनच्या माध्यमातून मी सतत लोकांच्या संपर्कात होते. त्या दरम्यान मी चंदीगडमध्ये ऑक्सिजन प्लांटचे उद्घाटनही केले होते.' किरण यांनी सांगितल्यानुसार, कमकुवत प्रतिकारशक्तीमुळे अद्यापही त्यांना कोठेही प्रवास करण्याची परवानगी नाही. विशेषत: विमानाने त्या प्रवास करु शकत नाहीये.

अनुपम खेर यांनी काही महिन्यांपूर्वी चाहत्यांना माहिती दिली होती की, त्यांची पत्नी मल्टिपल मायलोमा नावाच्या आजाराने ग्रस्त आहे, हा एक प्रकारचा रक्ताचा कर्करोग आहे.

किरण यांनी व्हिडिओ कॉलद्वारे नवीन ऑक्सिजन प्लांट्सचे उद्घाटन केले
काही दिवसांपूर्वी किरण यांनी व्हिडिओ कॉलद्वारे नवीन ऑक्सिजन प्लांट्सचे उद्घाटन केल्याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना दिली होती. किरण यांनी त्यांच्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले होते, "आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पीएम केअर फंडाच्या माध्यमातून देशभरात ऑक्सिजन प्लांट्सचे उद्घाटन केले. चंदीगडला त्यात 4 प्लांट्स मिळाले आहेत. मला यापैकी दोन प्लांट्सचे व्हर्च्युअली उद्घाटन करण्याची संधी मिळाली."

बातम्या आणखी आहेत...