आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्करोगातून सावरत आहेत किरण खेर:मुलगा सिकंदरने सोशल मीडिया लाइव्हमध्ये दाखवली 68 वर्षीय किरण यांची झलक, पुर्वीपेक्षा दिसत आहेत अशक्त

17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मागील सहा महिन्यांपासून कर्करोगाशी लढा देत आहेत किरण खेर

अभिनेत्री किरण खेर यांना काही महिन्यांपूर्वीच कर्करोगाचे निदान झाले होते. आता त्या या आजारातून हळूहळू सावरत आहेत. दरम्यान किरण यांचा मुलगा आणि अभिनेता सिकंदर खेरने सोशल मीडिया लाइव्हदरम्यान त्यांची झलक दाखवली. यावेळी किरण घरातील काउचवर बसलेल्या दिसत आहेत. त्यांच्या हातावर पट्टी बांधलेली दिसली. आणि त्या थोड्या अशक्त दिसल्या. यावेळी त्यांनी शुभेच्छा आणि प्रार्थनांसाठी चाहत्यांचे आभार मानले.

व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये सिकंदरने लिहिले, "खेर साहेब आणि किरण मॅम. माझ्या आणि माझ्या कुटंबीयांकडून नमस्कार.. माझ्या आईला दिलेल्या प्रेमाबद्दल आपणा सर्वांचे आभार.' असे सिंकरदने लिहिले आहे.

व्हिडिओमध्ये काय दिसले?
व्हिडिओमध्ये सिकंदर म्हणतोय, "मी आई-वडिलांसोबत बसलो आहे आणि तुम्ही मिसेस खेर यांचे पाय बघू शकता." यानंतर किरण चाहत्यांना 'नमस्कार' म्हणतात. सिकंदरने किरण यांच्या तब्येतीबद्दल
विचारणा केल्याबद्दल सर्व चाहत्यांचे आभार व्यक्त केले. सोबतच त्या आता पुर्वीपेक्षा ब-या आहेत, हेदेखील सांगितले. यावेळी सिकंदरने आपल्या आईची झलकदेखील दाखवली. किरण यांनीही
आपल्या चाहत्यांचे आभार व्यक्त केले. सोबतच पुढील काही महिन्यांत सिकंदर 41 वर्षांचा होणार आहे, त्यामुळे त्याने आता लग्न करावे, असे देखील त्या म्हणाल्या. या व्हिडिओ अनुपम खेर यांचीही एक
झलक दिसली.

मागील सहा महिन्यांपासून कर्करोगाशी लढा देत आहेत किरण खेर
किरण खेर मागील सहा महिन्यांपासून मल्टीपल मायलोमा जो ब्लड कॅन्सरचा एक प्रकार आहे, त्याच्याशी लढा देत आहेत. 1 एप्रिल रोजी त्यांना कर्करोग झाल्याचे माध्यमांत आले होते. पण त्यांना या
आजाराचे निदान मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये झाले होते. असे म्हटले जाते की, 11 नोव्हेंबर 2019 रोजी किरण चंडीगडच्या घरात पडल्या होत्या, त्यानंतर त्यांचा डावा हात फ्रॅक्चर झाला होता. त्यानंतर
तपासणीदरम्यान त्यांना मल्टिपल मायलोमा असल्याचे निदान झाले होते. मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

किरण खेर आता आजारातून सावरत आहेत
आठ दिवसांपूर्वीच किरण खेर यांच्यावर मुंबईतील कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात बोन सर्जरी झाली. ही शस्त्रक्रिया सुमारे तीन तास चालली. या सर्जरीत किरण यांच्या बोन मॅरोमधून कॅन्सरशीसंबंधित
बोन काढण्याचा प्रयत्न केला गेला.

बातम्या आणखी आहेत...