आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवीन नात्याविषयी मत:कीर्ती कुल्हारी पुन्हा लग्न करणार नाही, म्हणाली - मी लग्नासाठी बनलेले नाही असे मला वाटते

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • काय म्हणाली कीर्ती?

अभिनेत्री कीर्ती कुल्हारीने यावर्षाच्या सुरुवातीला पती साहिल सहगलपासून विभक्त होत असल्याची घोषणा केली होती. आता अलीकडेच एका मुलाखतीत दुसरे लग्न करणार नसल्याचे कीर्तीने स्पष्ट केले आहे. मी लग्नासाठी तयार झालेली व्यक्ती नाही, हे माझ्या लक्षात आले आहे, असे ती म्हणाली आहे. पण भविष्यात एखाद्यासोबत निश्चितच रिलेशनशिपमध्ये राहणार असल्याचेही ती म्हणाली आहे.

काय म्हणाली कीर्ती?
कीर्तिने पुन्हा लग्न करणार का? या प्रश्नाचे उत्तर देताना म्हटले, "मला असे वाटत नाही. मी नाही म्हणण्यावर विश्वास नसणा-या व्यक्तींपैकी एक आहे. जर तुम्ही एखाद्या व्यक्तीसोबत रिलेशनशिपमध्ये राहणार का? असा प्रश्न विचारला असता, तर नक्कीच याचे उत्तर मी हो असे देईल. कारण या बाबत माझे स्पष्ट विचार आहे. एखाद्या व्यक्तीसोबत राहण्यासाठी लग्न करणे महत्त्वाचे नाही, हे मला माहित आहे. त्यामुळे मी पुन्हा लग्न करेन, असे मला वाटत नाही. मी लग्नासाठी बनलेले नाही आणि हे मला कळून चुकले आहे,'असे कीर्ती म्हणाली आहे.

2016 मध्ये झाले होते कीर्ती आणि साहिलचे लग्न
एकत्र काम करत असताना कीर्ती आणि साहिलचे प्रेम प्रकरण सुरू झाले होते. दोघे एका जाहिरातीमध्ये एकत्र काम करत होते आणि येथूनच त्यांचे प्रेम सुरू झाले. दोन महिन्यांच्या डेटिंगनंतर कीर्तीने साहिलला लग्नासाठी प्रपोज केले होते. त्यानंतर 2016मध्ये या दोघांनी लग्न केले होते. लग्नाच्या 5 वर्षांनी दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. कीर्तीने 2010 मध्ये 'खिडची : द मुव्ही' द्वारे आपल्या करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर ती ब-याच चित्रपटांमध्ये लहानमोठ्या भूमिका साकारताना दिसली. कीर्तीने ‘शैतान’, ‘पिंक’, ‘इंदू सरकार’, ‘ब्लॅकमेल’, ‘उरी : द सर्जिकल स्ट्राईक’ आणि ‘मिशन मंगल’सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. गेल्यावर्षी ती 'क्रिमिनल जस्टिस' या वेब सीरिजमध्ये झळकली होती.

बातम्या आणखी आहेत...