आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरकारच्या निर्णयावर व्यक्त झाले सेलिब्रिटी:कृषी कायदा रद्द झाल्याबद्दल तापसी पन्नूपासून सोनू सूदपर्यंत अनेक कलाकारांनी व्यक्त केला आनंद, सोशल मीडियाद्वारे दिली प्रतिक्रिया

16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • काय म्हणाले कलाकार?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तीनही कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे बॉलिवूड सेलिब्रिटींनीही आनंद व्यक्त केला आहे. अभिनेत्री रिचा चढ्ढा, तापसी पन्नू, सोनू सूद, दिया मिर्झा आणि गुल पनाग यांनी पंतप्रधानांच्या या निर्णयावर आनंद व्यक्त केला आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली आहे. कंगनाने मात्र या निर्णयावर नाराजी व्यक्त करताना हा निर्णय अत्यंत लाजिरवाणा आणि अन्यायकारक असल्याचे म्हटले आहे.

सेलिब्रिटींची प्रतिक्रिया

रिचा चढ्ढा हिने सोशल मीडियावर एका पत्रकाराचे ट्विट रिट्विट करताना हा शेतकऱ्यांचा विजय असल्याचे म्हटले आणि लिहिले की, "तुम्ही जिंकलात! तुमचा विजय सर्वांचा विजय आहे."

या निर्णयाचा आनंद साजरा करताना तापसी पन्नूने तिच्या सोशल मीडिया स्टोरीवर ही बातमी शेअर केली आणि लिहिले, "तसेच... सर्वांना गुरु नानक जयंतीच्या शुभेच्छा."

पंतप्रधानांच्या निर्णयाचे स्वागत करत सोनू सूदने लिहिले, "ही चांगली बातमी आहे! कृषीविषयक कायदे मागे घेतल्याबद्दल धन्यवाद, मोदीजी. शेतकऱ्यांच्या शांततापूर्ण आंदोलनात मांडल्या जाणाऱ्या न्याय्य मागण्यांचा विचार केला जाईल. आता आशा आहे की या प्रकाश पर्वावर आंदोलन करणारे शेतकरी आनंदाने आपल्या कुटुंबियांसह परततील."

तर सोनूने त्याच्या दुसऱ्या पोस्टमध्ये लिहिले-

पंतप्रधानांच्या निर्णयाचे समर्थन करताना गुल पनाग यांनी लिहिले, "कृषी कायदा मागे घेतल्याबद्दल मी नरेंद्र मोदीजींची आभारी आहे. हे आंदोलन एवढे दिवस वाढायला नको होते, ज्यामुळे अनेक लोकांचे प्राण गेले. आंदोलकांना बदनाम करण्यात आले. हा धडा असू द्या. हा कायदा निर्मात्यांसाठी एक धडा आहे की चर्चा आणि वादविवादाविना मिनिटांत कायदे करून कायदेशीर प्रक्रियेला मागे टाकता येत नाही."

कृषी कायदा मागे घेतल्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना अमिषा पटेल हिनेही पीएम मोदींचे आभार मानले आणि लिहिले की, गुरुपर्वच्या शुभ मुहूर्तावर यापेक्षा चांगली भेट काय असू शकते.

दिया मिर्झानेही ‘जय किसान’ असे लिहून कायदा मागे घेतल्याबद्दल आनंद व्यक्त केला.

सरकारच्या या निर्णयामुळे अभिनेत्री कंगना रनोट नाराज आहे. सरकारचा हा निर्णय दुःखद, लज्जास्पद आणि अन्यायकारक असल्याचे तिने म्हटले आहे. कंगनाने तिच्या पोस्टमध्ये एका ट्विटचा स्क्रीनशॉट शेअर केला आणि लिहिले, "दुःखद, लज्जास्पद आणि अन्यायकारक. संसदेत निवडून आलेले सरकार नव्हे तर रस्त्यावरचे लोक कायदे करु लागले तर ते एक जिहादी राष्ट्र आहे. ज्यांना हे हवे होते त्या सर्वांचे अभिनंदन," अशा शब्दांत कंगनाने आपला संताप व्यक्त केला आहे.

बातम्या आणखी आहेत...