आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Kishore Kumar 93rd Birth Anniversary It Was Written On The Board Of The House 'Beware Of Kishore', Kishore Da's Tantrums Made Lord Dada Pauper

ट्रॅजिक होती लव्ह लाइफ:घराच्या बोर्डवर लिहिले होते 'किशोरपासून सावधान', किशोरदांच्या नख-यांमुळे भगवान दादा झाले होते कंगाल

8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

किशोर कुमार जेवढे त्यांच्या टॅलेंटसाठी ओळखले जातात, तेवढेच ते त्यांच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत होते. आपल्या गायन आणि अभिनय कौशल्याच्या बळावर त्यांनी हिंदी सिनेसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. पार्श्वगायक आणि अभिनेत्याबरोबरच किशोर कुमार दिग्दर्शक, निर्माता आणि स्क्रिप्ट रायटरसुद्धा होते. खरं तर किशोर कुमार पैशांसाठी काम करतात, अशीच त्यांची ओळख निर्माण झाली होती. जेव्हा त्यांना पैसे मिळत नव्हते, तेव्हा ते गाण्याचे रेकॉर्डिंग करत नसे.

फक्त गायनातच नव्हे तर अभिनयाच्या बाबतीतही ते असेच वागायचे. त्यांच्या अशा वागण्यामुळे अनेक निर्माते त्यांच्यासोबत काम करण्यास घाबरायचे. त्यांनी आपल्या करिअरमध्ये सुमारे 110 संगीतकारांसोबत 2678 चित्रपटांमध्ये गाणी गायली. तर 88 चित्रपटांमध्ये अभिनेता म्हणून काम केले होते. त्यांनी गायनात 8 फिल्मफेअर पुरस्कार पुरस्कारही जिंकले होते. 1997 मध्ये मध्यप्रदेश सरकारने भारतीय सिनेसृष्टीतील योगदानाबद्दल त्यांना त्यांच्या नावाने किशोर कुमार पुरस्कारची सुरुवात केली.

4 ऑगस्ट 1929 रोजी खंडवा (मध्यप्रदेश) येथे जन्मलेल्या किशोर दांनी 13 ऑक्टोबर 1987 रोजी या जगाचा कायमचा निरोप घेतला. किशोर दा हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते अशोक कुमार यांचे धाकटे बंधू होते. अशोक कुमार यांची इच्छा होती की, किशोर कुमारदेखील त्यांच्यासारखेच हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते व्हावेत. किशोर दांनी आपल्या भावाची इच्छा पूर्ण केली आणि अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले होते.

आज किशोर दा आपल्यात असते तर त्यांनी वयाची 93 वर्षे पूर्ण केली असती. किशोर दांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आम्ही तुम्हाला त्यांच्या आयुष्याशी निगडीत काही रंजक गोष्टी सांगत आहोत...

किस्सा 1 - किशोर दा यांना अभिनयापेक्षा गाण्यात जास्त रस होता. त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये ते प्रसिद्ध गायक के.एल. सहगल यांना फॉलो करत असे. एके दिवशी संगीतकार एस.डी. बर्मन साहेब अशोक कुमार यांच्या घरी गेले होते. तिथे त्यांनी किशोर दांना गातांना ऐकले. त्यानंतरर बर्मन साहेबांनी किशोर दा यांना गायनासाठी स्वतःची शैली अंगीकारावी असा सल्ला दिला. किशोर दा यांनी बर्मन साहेबांचे ऐकले आणि 1950 ते 1970 पर्यंत ते देव आनंद यांचा आवाज बनले. एसडी बर्मन यांच्या मार्गदर्शनाखाली किशोर दा यांनी राजेश खन्ना यांच्या चित्रपटांसाठी सुमारे 245 गाणी गायली.

किस्सा 2 - किशोर दा यांनी त्यांच्या घराबाहेर एक बोर्ड लावला होता ज्यावर किशोरपासून सावध राहा असे लिहिले होते. एकदा निर्माता-दिग्दर्शक एच. एस. रवैल किशोर दा यांच्या घरी गेल्यावर किशोर दा यांनी चक्क त्यांच्या हाताचा चावा घेतला होता. एच. एस. रवैल यांनी त्यांना असे का केले असे विचारले असता किशोर दा म्हणाले की, तुम्ही घरात येण्यापूर्वी बोर्ड बघायला हवा होता.

किस्सा 3 - किशोर कुमार यांच्याबाबतीत घडलेला एक किस्सा... एकदा किशोर कुमार एका सिनेमाचे शूटिंग करत होते. या चित्रपटासाठीठी निर्मात्यांनी त्यांना अर्धेच पैसे दिले होते. खिन्न झालेले किशोर कुमार चित्रपटाच्या सेटवर अर्धवट मेकअपमध्ये पोहोचले. तेव्हा दिग्दर्शकांनी त्यांना पूर्ण मेकअप करण्यासाठी सांगितले. तेव्हा किशोर कुमार म्हणाले, 'आधा पैसा, आधा काम। पूरा पैसा, पूरा काम'. किशोर कुमार यांच्या अशा स्वभावामुळे निर्माते-दिग्दर्शक त्यांच्याबरोबर काम करण्यास बिचकत होते.

किस्सा 4 - पैशांच्या बाबतीत किशोर कुमार यांच्याशी संबंधित आणखी एक मजेशीर किस्सा आहे. एकदा ते चित्रपट निर्माते आर. सी. तलवार यांच्याबरोबर काम करत होते. मात्र या चित्रपटासाठी आर. सी तलवार यांनी त्यांना अर्धेच पैसे दिले होते. त्यामुळे किशोर कुमार रोज सकाळी त्यांच्या घरासमोर जाऊन बसायचे आणि तलवार यांना बघून ओरडून म्हणायचे, 'हे तलवार, दे दे मेरे आठ हजार... हे तलवार, दे दे मेरे आठ हजार...'.

किस्सा 5 - दिग्दर्शक कालिदास यांच्या 'हाफ तिकीट' चित्रपटा सेटवर किशोर कुमार हे बराचवेळ पोहोचले नाही. म्हणून कालिदास यांनी त्यांच्या घरी फोन लावला. वारंवार फोन करूनही त्यांना काही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर ते किशोर कुमार यांच्या घरी म्हणजेच गौरीकुंजमध्ये गेले. तिथे गेल्यानंतर त्यांनी पाहिले, की किशोर कुमार घरीच होते आणि त्यांचा फोनही चालू होता. तरीदेखील त्यांनी फोन का नाही उचलला? यावर किशोर दा त्यांच्या स्टाइलमध्ये म्हणाले, 'हा फोन येणारे कॉल उचलण्यासाठी नाहीये.'

किस्सा 6 - ज्या चित्रपटाने दिग्दर्शक भगवानदादांना रडवले तो चित्रपट म्हणजे 'हसते रहना'. हा चित्रपट बनवण्यासाठी त्यांनी आपली सर्व जमापूंजी पणाला लावली होती, पण चित्रपटाचे नायक किशोर दा यांच्या नख-यांमुळे तो चित्रपट अर्धवट राहिला. आणि चित्रपट पूर्ण होऊ शकला नाही. यामुळे दादांचे इतके नुकसान झाले की त्यांना त्यांचा जुहू येथील बंगला आणि गाड्या विकून टाकाव्या लागल्या.

किशोर दा कायम चर्चेत राहिले, त्यांच्या वैवाहिक आयुष्यात त्यांनी अनेक चढउतार पाहिले. त्यांनी एकुण चार लग्न केले होते. त्यांच्या चारही पत्नींविषयी जाणून घेऊया -

पहिल्या पत्नी होत्या रुमा घोष (1950 - 1958)
किशोर कुमार यांच्या पहिल्या पत्नीचे नाव रुमा गुहा ठाकुरता उर्फ रुमा घोष होते. रुमा या गायिका आणि अभिनेत्री होत्या. जून 2019 मध्ये त्यांचे निधन झाले. रुमा आणि किशोर यांचे लग्न केवळ आठच वर्षे टिकले. 1950 मध्ये किशोर दांनी रुमा यांच्यासोबत लग्न केले होते, मात्र 1958 मध्ये दोघे विभक्त झाले. या दाम्पत्याला एक मुलगा झाला. अमित कुमार हे त्याचे नाव. अमितसुद्धा प्रसिद्ध गायक आहे. 90 च्या दशकात त्याने अनेक गाणी गायली आहेत.

मधुबालासोबत थाटले होते दुसरे लग्न (1960 - 1969)
किशोर कुमार यांची दुसरी पत्‍नी ही प्रसिद्ध अभिनेत्री मधुबाला. मधुबालाने किशोर कुमार यांच्याबरोबर 'चलती का नाम गाडी' (1958) सह अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. मधुबालाच्या सौंदर्यावर किशोर कुमार फिदा झाले होते. मधुबाला आणि दिलीप कुमार यांचे ब्रेकअप झाल्यानंतर 1961 मध्ये किशोर कुमार यांनी मधुबालासोबत लग्न केले. मधुबाला ही मुस्लिम होती आणि त्यामुळे दोघांनी कोर्टात लग्न केले. मधुबालासोबत लग्न करण्यासाठी किशोर कुमार यांनी इस्लाम धर्म स्वीकारला होता. त्यांनी त्यांचे नाव बदलून करीम अब्दुल असे केले होते. हे लग्न 9 वर्षे टिकले. 23 फेब्रुवारी 1969 रोजी हृदयात छिद्र असल्याने मधुबालाचे निधन झाले. तिच्या निधनासोबतच या नात्याचा अंत झाला.

मधुबालाच्या निधनानंतर योगिता बालीसोबत झाले तिसरे लग्न (1976 - 1978)
अभिनेत्री योगिता बाली ही किशोर कुमार यांची तिसरी पत्नी. मधुबालाच्या निधनानंतर जवळजवळ सात वर्षांनी किशोर कुमार यांनी तिसरे लग्न केले होते. 1976 मध्ये योगिता बालीसोबत ते लग्नगाठीत अडकले. मात्र हे लग्न फार काळ टिकले. केवळ दोन वर्षांतच दोघांनी घटस्फोट घेतला. योगिता या नात्याविषयीच कधीच गंभीर नव्हत्या, असे किशोर

चौथ्या पत्नीचे नाव लीना चंदावरकर (1980 - 1987)
किशोर दांनी अभिनेत्री लीना चंदावरकरसोबत चौथे लग्न थाटले. विशेष म्हणजे लीना किशोर यांच्यापेक्षा वयाने तब्बल 20 वर्षे लहान होत्या आणि त्यांचा थोरला मुलगा अमितपेक्षा केवळ दोन वर्षांनी मोठ्या होत्या. लीना यांचे किशोर दांसोबतचे दुसरे लग्न होते. किशोर आणि लीना यांना एक मुलगा असून त्याचे नाव सुमीत कुमार आहे. लग्नाच्या सात वर्षांनी म्हणजे 1987 मध्ये किशोर कुमार यांचे निधन झाले.

बातम्या आणखी आहेत...