आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किशोर कुमार यांचा वाढदिवस:किशोर कुमार यांचे झाले होते चार विवाह, एका पत्नीचे झाले होते निधन तर दोघींना दिला होता घटस्फोट

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जाणून घ्या किशोर कुमार यांच्या खासगी आयुष्याविषयी...

आपल्या सुमधूर आवाजाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे महान गायक किशोर कुमार यांची आज 92 वी जयंती आहे. त्यांनी हिंदी, बंगाली, आसामी, गुजराती, भोजपुरी, कन्नड, मल्याळम आणि उर्दूत गाणी गायली. त्यांचा जन्म 4 ऑगस्ट 1929 रोजी मध्यप्रदेशातील खंडवा येथे झाला होता. त्यांचे खरे नाव आभास कुमार गांगुली होते. पण नंतर त्यांनी ते बदलून किशोर कुमार असे ठेवले.

किशोर कुमार यांनी गायनासोबतच आपल्या अभिनयानेही चाहत्यांना खिळवून ठेवले. किशोर दा करिअरमध्ये जेवढे यशस्वी ठरले, तेवढेच त्यांचे वैयक्तिक आयुष्यही चांगलेच गाजले. त्यांनी आपल्या आयुष्यात एकदा दोनदा नव्हे तर तब्बल चार वेळा लग्न केले. रुमा घोष, मधुबाला, योगिता बाली आणि लीना चंद्रावरकर ही त्यांच्या चारही पत्नींची नावे आहेत. एक नजर टाकुया त्यांच्या वैवाहिक आयुष्यावर...

रुमा घोष आणि थोरला मुलगा अमित कुमारसोबत किशोर कुमार
रुमा घोष आणि थोरला मुलगा अमित कुमारसोबत किशोर कुमार

पहिली पत्नी रुमा घोष
किशोर कुमार यांच्या पहिल्या पत्नीचे नाव रुमा गुहा ठाकुरता उर्फ रुमा घोष आहे. रुमा या गायिका आणि अभिनेत्री होत्या. जून 2019 मध्ये त्यांचे निधन झाले. रुमा आणि किशोर यांचे लग्न केवळ आठच वर्षे टिकले. 1950 मध्ये किशोर दांनी रुमा यांच्यासोबत लग्न केले होते, मात्र 1958 मध्ये दोघे विभक्त झाले. या दाम्पत्याला एक मुलगा झाला. अमित कुमार हे त्याचे नाव. अमितसुद्धा प्रसिद्ध गायक आहे. 90 च्या दशकात त्याने अनेक गाणी गायली आहेत.

मधुबालासोबत किशोर कुमार
मधुबालासोबत किशोर कुमार

मधुबालासोबत थाटले होते दुसरे लग्न
किशोर कुमार यांची दुसरी पत्‍नी ही प्रसिद्ध अभिनेत्री मधुबाला. मधुबालाने किशोर कुमार यांच्याबरोबर 'चलती का नाम गाडी' (1958) सह अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. मधुबालाच्या सौंदर्यावर किशोर कुमार फिदा झाले होते. मधुबाला आणि दिलीप कुमार यांचे ब्रेकअप झाल्यानंतर 1961 मध्ये किशोर कुमार यांनी मधुबालासोबत लग्न केले. मधुबाला ही मुस्लिम होती आणि त्यामुळे दोघांनी कोर्टात लग्न केले. मधुबालासोबत लग्न करण्यासाठी किशोर कुमार यांनी इस्लाम धर्म स्वीकारला होता. त्यांनी त्यांचे नाव बदलून करीम अब्दुल असे केले होते. हे लग्न 9 वर्षे टिकले. 23 फेब्रुवारी 1969 रोजी हृदयात छिद्र असल्याने मधुबालाचे निधन झाले. तिच्या निधनासोबतच या नात्याचा अंत झाला.

योगिता बालीसोबत किशोर कुमार
योगिता बालीसोबत किशोर कुमार

मधुबालाच्या निधनानंतर योगिता बालीसोबत झाले तिसरे लग्न
अभिनेत्री योगिता बाली ही किशोर कुमार यांची तिसरी पत्नी. मधुबालाच्या निधनानंतर जवळजवळ सात वर्षांनी किशोर कुमार यांनी तिसरे लग्न केले होते. 1976 मध्ये योगिता बालीसोबत ते लग्नगाठीत अडकले. मात्र हे लग्न फार काळ टिकले. केवळ दोन वर्षांतच दोघांनी घटस्फोट घेतला. योगिता या नात्याविषयीच कधीच गंभीर नव्हत्या, असे किशोर

लीना चंदावरकरसोबत किशोर कुमार
लीना चंदावरकरसोबत किशोर कुमार

चौथ्या पत्नीचे नाव लीना चंदावरकर
किशोर दांनी अभिनेत्री लीना चंदावरकरसोबत चौथे लग्न थाटले. विशेष म्हणजे लीना किशोर यांच्यापेक्षा वयाने तब्बल 20 वर्षे लहान होत्या आणि त्यांचा थोरला मुलगा अमितपेक्षा केवळ दोन वर्षांनी मोठ्या होत्या. लीना यांचे किशोर दांसोबतचे दुसरे लग्न होते. किशोर आणि लीना यांना एक मुलगा असून त्याचे नाव सुमीत कुमार आहे. लग्नाच्या सात वर्षांनी म्हणजे 1987 मध्ये किशोर कुमार यांचे निधन झाले.

बातम्या आणखी आहेत...