आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटाचा ट्रेलर सोमवारी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या बिग बजेट चित्रपटात तगडी स्टारकास्ट पाहायला मिळतेय.
'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटाच्या माध्यमातून सलमान खान चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर कमबॅक करत आहे. या चित्रपटात सलमानचा एक वेगळाच अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या बहुचर्चित चित्रपटासाठी सलमानने किती मानधन घेतले याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, सलमानने 'किसी का भाई किसी की जान'साठी तब्बल 50 कोटी रुपये मानधन घेतल्याची चर्चा आहे.
काही सेकंदांसाठी रामचरणने घेतले कोट्यवधी रुपये
'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेता राम चरणची झलकदेखील प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 'येतम्मा' या गाण्यात राम चरण सलमान आणि दग्गुबती व्यंकटेशसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.
मीडिया रिपोर्टनुसार या गाण्यात काही सेकंद झळकण्यासाठी राम चरणने तब्बल तीन कोटी रुपये घेतले आहेत.
'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटात सलमान खान, पूजा हेगडेसह, दग्गुबती व्यंकटेश आणि पूजा हेगडे महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
या चित्रपटासाठी दग्गुबती व्यंकटेश यांनी आठ कोटी रुपये मानधन घेतले आहे.
सलमानसोबत मुख्य भूमिकेत झळकणाऱ्या पूजा हेगडेने या चित्रपटासाठी पाच कोटी रुपये मानधन घेतले आहे.
शहनाज गिलने या चित्रपटासाठी 55 लाख रुपये घेतल्याची चर्चा आहे.
जस्सी गिलने चित्रपटासाठी 70 लाख रुपये आकारले आहेत.
ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होतोय हा चित्रपट
सलमान खान फिल्म्स प्रोडक्शनच्या 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटाची निर्मिती सलमान खानने केली असून, फरहाद सामजी यांनी दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात सलमान खानसह दग्गुबती व्यंकटेश, पूजा हेगडे, सिद्धार्थ निगम, राघव जुयाल, शहनाज गिल, जस्सी गिल, भूमिका चावला, पलक तिवारी आणि बॉक्सर विजेंद्र सिंह यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेता जगपती बाबू नकारात्मक भूमिका साकारताना दिसणार आहे. हा चित्रपट ईदच्या मुहूर्तावर 21 एप्रिल रोजी प्रदर्शित होतोय.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.