आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'बिल्ली बिल्ली' गाण्याचा टिझर:पुन्हा दिसली सलमान-पूजाची रोमँटिक केमिस्ट्री, उद्या येणार पूर्ण गाणे

24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडचा मेगास्टार सलमान खानच्या बहुचर्चित 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटातील दुसरे गाणे बिल्ली बिल्लीचा टिझर नुकताच समोर आला आहे. याआधी चित्रपटातील 'नइयो लगदा' हे गाणे रिलीज झाले होते. या गाण्यात सलमान आणि पूजा हेगडे यांचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळाला होता. आता 'बिल्ली बिल्ली' या गाण्यात पुन्हा एकदा दोघांची रोमँटिक केमिस्ट्री प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतेय.

सलमान खानने आपल्या इन्स्टाग्रा अकाउंटवर शेअर केला गाण्याचा टिझर...

'सौदा खरा खरा' आणि 'इश्क तेरा तडपावे' यांसारख्या चार्टबस्टर गाण्यांसाठी प्रसिद्ध असलेले गायक सुखबीर यांनी 'बिल्ली बिल्ली'हे गाणे गायले आणि कंपोज केले आहे. 'बिल्ली बिल्ली' हे गाणे एक जबरदस्त पंजाबी डान्स नंबर आहे. सलमान खानची हुक स्टेप असलेले 'बिल्ली बिल्ली' हे गाणे उद्या म्हणजेच 2 मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे.

सलमानने हटके अंदाजात केले होते या गाण्याचे प्रमोशन

सलमान खानने अलीकडेच हटके अंदाजात एक व्हिडिओ शेअर करून या 'बिल्ली बिल्ली' या गाण्याची घोषणा केली आहे सलमानने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये दोन मांजरी दिसत आहेत.

सलमानने हा व्हिडिओ शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिले, 'माझे 'किसी का भाई किसी की जान' चित्रपटातील गाणे 2 मार्चला रिलीज होत आहे.' सलमान खानने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दोन मांजरी दिसत आहेत, तर पार्श्वभूमीत बिल्ली बिल्ली हे गाणे ऐकू येत आहे. 'किसी का भाई किसी की जान'चे दुसरे गाणे 2 मार्चला रिलीज होणार आहे.

ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे चित्रपट

सलमान खान फिल्म्स प्रोडक्शनचा 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटाची निर्मिती सलमान खानने केली असून, फरहाद सामजी यांनी दिग्दर्शन केले आहे. तसेच, या चित्रपटात सलमान खान, वेंकटेश दग्गुबाती, पूजा हेगडे, जगपती बाबू, भूमिका चावला, विजेंदर सिंग, अभिमन्यू सिंग, राघव जुयाल, सिद्धार्थ निगम, जस्सी गिल, शहनाज गिल, पलक तिवारी आणि विनाली भटनागर यांच्या भूमिका आहेत. अ‍ॅक्शन, कॉमेडी, ड्रामा आणि रोमान्सने भरपूर असलेला 'किसी का भाई किसी की जान' हा चित्रपट 2023च्या ईदला प्रदर्शित होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...