आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'किसी का भाई किसी की जान'चा ट्रेलर आऊट:लव्हस्टोरीला ड्रामा व अ‍ॅक्शनचा तडका; 21 एप्रिलला होणार रिलीज

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलीवूडचा भाईजान सलमान खानच्या बहुप्रतिक्षित किसी का भाई किसी की जान या चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाला आहे. अॅक्शन पॅक्ड ट्रेलरमध्ये भाईजान सलमान दोन लूकमध्ये दिसतो. एक लूक लांब केसांसह दाढीमिशी असलेला आहे. तर दुसरा लूक हा पूर्णपणे क्लीन शेव्ह केलेला आणि छोट्या केसांतील आहे.

प्रेमकथेला फॅमिली ड्रामाचा तडका

चित्रपट प्रेमकथेवर आधारित असल्याचा अंदाज ट्रेलरवरून लावता येतो. प्रेमकथेला कौटुंबिंक ड्रामा आणि अॅक्शनचा तडका दिलेला आहे. ट्रेलरमधून चित्रपटाच्या कथेची पुसटशी कल्पना आधीच लावणे शक्य आहे.

तासाभरात 10 लाख व्ह्यूज

ट्रेलरला तासाभरातच दहा लाख व्ह्यूज मिळाले असून यावर सोशल मीडियातून युझर्सच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. सलमानचे चाहते ट्रेलर बघून खूश आहेत. सलमान खान फिल्म्सच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवरून हा ट्रेलर जारी करण्यात आला आहे.

सलमानसोबत पूजा हेगडे प्रमुख भूमिकेत

सलमान खान आणि पूजा हेगडेची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटात दाक्षिणात्य सुपरस्टार व्यंकटेश दग्गुबाटीचीही महत्वाची भूमिका आहे. फरहाद सामजींनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तर सलमा खान चित्रपटाच्या निर्मात्या आहेत. चित्रपटाला हिमेश रेशमियाने संगीत दिले आहे.

पाहा ट्रेलर

ही बातमीही वाचा...

थक्क करणारा मानधनाचा आकडा:अल्लू अर्जुनने दुपटीने वाढवली फी, 'पुष्पा 2'साठी घेतले तब्बल 'एवढे' कोटी