आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोलकाता:‘केके’ मृत्युप्रकरणी गुन्हा; चेहऱ्यावर जखम, कोलकात्यात केकेंच्या पार्थिवाला पोलिसांची मानवंदना

कोलकाताएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलीवूड आणि दक्षिणेतील चित्रपटांत अनेक प्रसिद्ध गाणी गाणारे गायक केके (कृष्णकुमार कुन्नत) यांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी याची अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद घेतली आहे. याप्रकरणी केकेंचे मॅनेजर आणि हॉटेल स्टाफची चौकशी करण्यात आली. पोलिस सीसीटीव्ही फुटेजही खंगाळत आहेत. मुख्यमंत्री ममता बॅनजी यांनी केकेंना श्रद्धांजली अर्पण करून त्यांची पत्नी आणि मुलांची भेट घेतली. कुटुंबीय त्यांचा मृतदेह घेऊन मुंबईला रवाना झाले असून तेथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील.

बातम्या आणखी आहेत...