आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रसिद्ध पार्श्वगायक केके यांचे मंगळवारी रात्री कोलकाता येथे निधन झाले. केके एका कॉन्सर्टसाठी लाइव्ह परफॉर्मन्स देण्यासाठी कोलकाता येथे आले होते. मृत्यूच्या काही तास आधी त्यांनी त्यांच्या परफॉर्मन्सचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यावर प्रतिक्रिया देत चाहत्यांनी त्यांना फिट म्हटले.
मृत्यूच्या काही तासांपूर्वी केके यांनी शेअर केली होती पोस्ट
केके यांनी मंगळवारी दुपारी त्यांच्या इंस्टाग्रामवर नजरुल मंचावरील काही फोटो शेअर केले होते. पोस्ट शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “आज रात्री नजरुल मंचावर डान्स करताना.. विवेकानंद कॉलेज !! लव्ह यू ऑल," अशा आशयाची पोस्ट त्यांनी शेअर केली होती. स्टेजच्या मागून काढलेल्या दोन फोटोंमध्ये, केके हातात माइक घेऊन स्टेजवर चालताना दिसत आहे.
या पोस्टवर चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या
केके यांच्या निधनाची बातमी समजल्यानंतर अनेक चाहत्यांनी केके यांना त्यांच्या कमेंट सेक्शनमध्ये श्रद्धांजली वाहिली आहे. एका चाहत्याने लिहिले, 'विश्वास बसत नाही. रेस्ट इन पीस के.के.' आणखी एकाने लिहिले, 'त्यांच्या निधनाच्या काही तासांपूर्वीची ही गोष्ट आहे, खरंच विश्वास बसत नाहीये. ते खूपच फिट दिसत होते.' त्यांच्या मृत्यूपूर्वी क्लिक केलेल्या फोटोंमध्ये केके किती तंदुरुस्त आणि छान दिसत होते हे सांगत अनेक चाहत्यांनी शोक व्यक्त केला.
केके यांना 'तडप तडप'मधून मिळाला होता ब्रेक
केके यांचा जन्म 1968 मध्ये दिल्लीत झाला. 1999 मध्ये 'हम दिल दे चुके सनम' मधील 'तडप तडप' या गाण्याने त्यांना ओळख मिळाली. त्याच वर्षी केके यांनी 'पल' या स्टुडिओ अल्बममधून करिअरला सुरुवात केली होती. 2000 मध्ये, केके यांना 'हम दिल दे चुके सनम' चित्रपटातील 'तडप-तडप' गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा गिल्ड फिल्म पुरस्कार मिळाला होता. 2008 मध्ये 'ओम शांती ओम'मधील 'आँखों में तेरी' आणि 2009 मध्ये 'बचना-ए हसीनो' मधील 'खुदा जाने' साठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा पुरस्कार देखील त्यांना मिळाला होता.
संगीत संगीत क्षेत्रातील लोकांनी केके यांना श्रद्धांजली वाहिली
केके यांच्या निधनावर देशभरातील लोकांनी श्रद्धांजली वाहिली. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते अक्षय कुमारपर्यंत आणि संगीत इंडस्ट्रीतून सोनू निगम, हर्षदीप कौर आणि विशाल ददलानी यांच्यासारख्या अनेकांनी केके यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.