आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केकेच्या मृत्यूबाबत प्रत्यक्षदर्शीचा दावा:खचाखच भरलेल्या सभागृहात AC बंद होता; आधीही केली होती तक्रार, घामामुळे झाले होते बेहाल

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्रत्यक्षदर्शीचे काय म्हणणे आहे?

बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक केके (कृष्ण कुमार कुन्न्नथ) यांचे मंगळवारी कोलकाता येथे लाइव्ह कॉन्सर्टनंतर निधन झाले. ते 53 वर्षांचे होते. केके कोलकाता येथील नजरुल स्टेजवर लाइव्ह परफॉर्मन्स देत होते. परफॉर्मन्सनंतर त्यांची प्रकृती बिघडली आणि हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. आता केके यांच्या मृत्यूप्रकरणी अनैसर्गिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून कुटुंबीयांची संमती मिळाल्यानंतर त्यांच्या पार्थिवाचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे.

मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा केला जात आहे की, केके यांच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर जखमा आहेत. दरम्यान, एका प्रत्यक्षदर्शीने दावा केला आहे की, केके यांच्या मृत्यूचे कारण आयोजकांचे चुकीचे व्यवस्थापन होते. सोशल मीडिया पोस्टमध्ये प्रत्यक्षदर्शीने लिहिले - बंद सभागृहात खूप गर्दी होती आणि तेथील एसी काम करत नव्हता. केके यांनी एक दिवस आधीच एसीची तक्रार आयोजकांकडे केली होती. हा मृत्यू सामान्य नाहीये, असा दावा प्रत्यक्षदर्शीने केला आहे.

प्रत्यक्षदर्शीने 2 दिवस नेमके काय घडले ते सांगितले

निलोफर हुसैन यांनी सोशल मीडियावर एक लांबलचक पोस्ट लिहिली आहे. त्या सांगतात – "नजरुल मंच (मैफलीचे ठिकाण) येथे एसी काम करत नव्हता. त्याच ठिकाणी केके यांनी एक दिवस आधी परफॉर्मन्स दिला होता. त्यांनी यापूर्वीही एसीबद्दल तक्रार केली होती, कारण त्या दिवशीही घामाने ते बेहाल झाले होते.

पहिली गोष्ट... ते खुले सभागृह नव्हते. इतके पैसे घेतले जात असताना आयोजकांनाही तयारीची काळजी घ्यायला हवी होती. तुम्ही परफॉर्मन्सचा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहिल्यास, तुम्हाला कळेल की केके यांना खूप घाम फुटला होता. ते घामाघूम झाले होते.

केके AC चालू करून काही दिवे बंद करण्याची विनवणी आयोजकांकडे करत होते. गर्मीचा त्यांना खूप जास्त त्रास होत होता. एवढी गर्दी जमली होती की, लोकांनी सभागृहाचे दरवाजे तोडले होते. अनेकजण विना पास सभागृहात दाखल झाले होते. व्यवस्थापन काय करत होते? सुरक्षा व्यवस्था काय करत होती?

फक्त कल्पना करा. कोलकात्याची गर्मी, त्यावर बंद सगळ्याबाजुने बंद. एवढ्या गर्दीत एसीही चालत नव्हता आणि एक व्यक्ती जीव ओतून गातोय... हृदयविकाराचा झटका सामान्य नव्हता. मला धक्का बसला आहे."

सोबत गाणारी गायिका म्हणाली - केके फिट होते, सर्वांना आनंदाने भेटले
केकेच्या परफॉर्मन्सपूर्वी गायिका शुभलक्ष्मी डे यांनी सादरीकरण केले. शुभलक्ष्मी यांनी सांगितले- केके त्याच्या परफॉर्मन्सपूर्वी ग्रीन रूममध्ये आले आणि सर्व कलाकारांना आनंदाने भेटले. सगळ्यांशी त्यांनी छान संवाद साधला. त्यावेळी ते अगदी फिट दिसत होते, त्यांच्या चेहऱ्यावर कुठलाही त्रास जाणवत नव्हता.

हा फोटो मंगळवारच्या कॉन्सर्टमधला आहे. परफॉर्मन्स देताना केके उत्साहित दिसत होते.
हा फोटो मंगळवारच्या कॉन्सर्टमधला आहे. परफॉर्मन्स देताना केके उत्साहित दिसत होते.

अचानक अस्वस्थ वाटत असल्याने घाईघाईने बाहेर पडले
परफॉर्मन्स दरम्यान, केके यांची तब्येत बिघडली आणि ते घाईघाईत मैफिलीच्या ठिकाणाहून बाहेर आले. याचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये ते घामाघूम झालेले दिसत आहे. रिपोर्ट्सनुसार, केके यांना छातीत दुखत होते आणि ते हॉस्पिटलमध्ये जात होते, पण हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

कुटुंबीयांच्या संमतीनंतर शवविच्छेदन केले जाईल

गायक केके यांच्या मृत्यूप्रकरणी कोलकाता येथील न्यू मार्केट पोलिस ठाण्यात अनैसर्गिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कुटुंबीयांच्या संमतीनंतर त्यांचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोलकाता येथील एसएसकेएम रुग्णालयात शवविच्छेदनाची व्यवस्था करण्यात येत आहे.

या वृत्ताशी संबंधित आणखी बातम्या येथे वाचा -

बातम्या आणखी आहेत...