आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

सुशांत आत्महत्या प्रकरणाचा तपास:मुंबईच्या रस्त्यांवर ऑटोतून फिरुन रिया आणि तिच्या भावाला शोधत आहेत बिहार पोलिस, दोघांचेही फोन आहेत बंद

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शुक्रवारी बिहार पोलिसांच्या पथकाने या दोघांनाही फोन केला पण त्यांचा नंबर बंद येत होता.
  • पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचा मेसेजही पाठवला होता, मात्र अद्याप त्यांच्याकडून उत्तर आलेले नाही.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतचे वडील के.के. सिंह यांनी रविवारी पाटण्याच्या राजीव नगर पोलिस ठाण्यात अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबीयांविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मंगळवारपासून बिहार पोलिस मुंबईत आहेत. मात्र आतापर्यंत एकदाही सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीसोबत त्यांची भेट होऊ शकलेली नाही.

पाटणा पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शोविक घरातून गायब आहेत आणि त्यांचे दोन्ही फोन बंद आहेत. शुक्रवारीही पोलिस पथकाने या दोघांना कॉल करण्याचा प्रयत्न केला. पण दोघांचा फोन स्विच ऑफ येतोय. बिहार पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी हजर होण्याचा निरोप पाठविला आहे, पण अद्याप उत्तर आले नाही. सुशांतच्या बँक तपशिलांच्या आधारे पाटणा पोलिसांनी 50 हून अधिक प्रश्न तयार केले आहेत. रिया चक्रवर्ती आणि तिच्या भावाला चौकशीअंती या सर्वांची उत्तर द्यावे लागतील.

बिहार पोलिसांचे दोन अधिकारी दोन दिवसांत तीनदा रियाच्या घरी जाऊन आले आहेत.
बिहार पोलिसांचे दोन अधिकारी दोन दिवसांत तीनदा रियाच्या घरी जाऊन आले आहेत.

  • रियाच्या वडिलांशी झाले होते बिहार पोलिसांचे बोलणे

बिहार पोलिसांची 4 सदस्यांची टीम रिया आणि तिचा भाऊ शोविक यांना शोधण्यासाठी मुंबईच्या रस्त्यांवर ऑटो रिक्षातून फिरत आहे. पण, काल हीच टीम लक्झरी जग्वार कारमध्येसुद्धा दिसली होती. सध्या बिहार पोलिस या प्रकरणातील चौकशीविषयी फारसे काही सांगत नाहीये.

पोलिसांनी रियाच्या वडिलांशी फोनवर बोलल्याचेही समोर आले आहे. पण त्यांच्याबरोबर महिला पोलिस कॉन्स्टेबल नसल्याचे सांगत त्यांनी रियाचा जबाब नोंदवण्यास नकार दिला आहे. मात्र पोलिसांनी शोविकविषयीही विचारणा केली, पण वडिलांकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. याशिवाय रियाच्या वडिलांचा नंबरही आता बंद असल्याचे सांगितले जात आहे.

बिहार पोलिसांची टीम आधी लक्झरी कारमध्येही दिसली होती. अशा परिस्थितीत पोलिसांचे पथक ऑटोमध्ये का फिरत आहे हे समजत नाही.
बिहार पोलिसांची टीम आधी लक्झरी कारमध्येही दिसली होती. अशा परिस्थितीत पोलिसांचे पथक ऑटोमध्ये का फिरत आहे हे समजत नाही.

मंगळवारपासून बिहार पोलिस मुंबईत आहेत. यादरम्यान पोलिसांनी सुशांतचा व्हिसेरा रिपोर्ट, त्याचा अंतिम पोस्टमार्टम रिपोर्ट, त्याच्या कॉल डिटेल्सची एक प्रतही ताब्यात घेतली आहे. गुरुवारी बिहार पोलिसांची टीम सुशांतच्या बँकेत गेली, ज्याचा त्याच्या वडिलांनी आपल्या एफआयआर कॉपीमध्ये उल्लेख केला होता. येथून पोलिसांनी बँकेचे स्टेटमेंट घेतले आहे. या प्रकरणात पोलिसांनी सुशांतचा नोकर, त्याचा कुक, त्याची बहीण मीतू आणि त्याची एक्स गर्लफ्रेंड अंकिता यांच्यासह 6 जणांची चौकशी केली आहे.

सुशांत आत्महत्येप्रकरणी बिहार पोलिस सुशांतचा रूम पार्टनर राहिलेले क्रिएटिव्ह मॅनेजर सिद्धार्थ पिठानी यांचीही चौकशी करू शकतात. याशिवाय सुशांतचा कर्मचारी ज्याची नियुक्ती रियाने केली होती, त्या दिवेश सावंतचीही पोलिस चौकशी करू शकतात.