आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी 23 जानेवारी रोजी तिचा प्रियकर आणि क्रिकेटपटू केएल राहुलसोबत विवाहबद्ध झाली. लग्नानंतर अथिया आणि राहुल लग्नाचे अनसीन फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहेत. दरम्यान, राहुलने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर अथियासोबतचा एक क्यूट व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ते दोघेही खूप धमालमस्ती करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ त्यांच्या लग्नानंतरच्या पार्टीचा आहे. या व्हिडिओमध्ये अथियाच्या लूकने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
केएल राहुलने शेअर केलेल्या या नवीन व्हिडिओत नवविवाहित जोडपं एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाल्याचे पाहायला मिळत आहे. या पार्टीत अथियाने लाल रंगाचा ड्रेस परिधान केलेला दिसतोय. तर राहुल काळ्या रंगाच्या कुर्त्यात दिसतोय. अथियाने या ड्रेससोबत सुंदर चोकर आणि हिऱ्याच्या कानातले घातले आहे.
या व्हिडिओमध्ये सर्वात जास्त लक्ष वेधून घेतले ते म्हणजे अथिया शेट्टीच्या मंगळसूत्राने. अथियाच्या मंगळसूत्राची डिझाइन फारच खास आहे. यात काळे मणी आणि एक डायमेंडचे पेन्डेंट पाहायला मिळत आहे. या व्हिडिओवर चाहते लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडत आहेत.
23 जानेवारीला अथिया शेट्टी आणि केएल राहुलचे सुनील शेट्टीच्या खंडाळा फार्महाऊसवर लग्न झाले होते. दोघांच्या लग्नाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. या खासगी विवाह समारंभाला दोघांच्याही कुटुंबातील सदस्य आणि जवळचे मित्र सहभागी झाले होते. लग्नानंतर राहुल आणि अथियाने सोशल मीडियावर प्री-वेडिंग फंक्शन्सचे अनेक फोटो शेअर केले आहेत. अद्याप अथिया आणि केएल राहुल यांनी वेडिंग रिसेप्शन पार्टी दिली आहे. आयपीएलनंतर रिसेप्शन होणार असल्याची माहिती अथियाचे वडील सुनील शेट्टी यांनी दिली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.