आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूड अभिनेते सुनील शेट्टी यांची लाडकी लेक अथिया शेट्टी क्रिकेटपटू केएल राहुलसोबत विवाहबद्ध झाली आहे. 23 जानेवारी रोजी सुनील शेट्टी यांच्या खंडाळ्यातील आलिशान बंगल्यात दोघांचा शाही लग्नसोहळा पार पडला. दोघांच्या लग्नाची गेल्या बऱ्याच दिवसांपासून चर्चा होती. लग्न पार पडल्यानंतर अथिया आणि केएल राहुल यांनी लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. दोघेही लग्नाच्या फोटोंमध्ये खूपच सुंदर दिसत आहेत.
अथिया आणि राहुलच्या लग्नाच्या कपड्यांनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. दोघांनी साधे पण डिझायनर कपडे लग्नासाठी पसंत केले होते. अथिया आणि राहुलने डिझायनर अनामिका खन्नाने डिझाइन केलेले कपडे घातले होते. अथियाने पेस्टल रंगाचा लहेंगा परिधान केला होता. त्यावर तिने कुंदन ज्वेलरी घातली होती.
पिंकव्हिलाने दिलेल्या वृत्तानुसार, अथियाचा लेहेंगा पूर्णपणे हाताने बनवलेला, हाताने विणलेला होता. त्यावर जरदोजी आणि जाळी वर्कसह सिल्कचे वर्क होते. तर, तिचे ब्लाऊज आणि दुपट्टा सिल्क ऑर्गन्झाचा बनलेला होता. हा सुंदर लग्नाचा लहेंगा तयार करण्यासाठी जवळपास 10 हजार तास लागले होते. तब्बल 416 दिवसांच्या मेहनतीनंतर हा लहेंगा तयार झाला.
पेस्टल लेहेंग्याबरोबर एक मोठा हार, मॅचिंग कानातले, मांग टिका मोजक्याच दागिन्यांनी अथियाने तिचा लूक पूर्ण केला. याशिवाय तिने इतर कोणतेही दागिने घातले नव्हते. अथियाच्या नाजूक कलीरानेही लक्ष वेधून घेतले.
केएल राहुलनेदेखील अथियाच्या लहेंग्याशी मॅच करणारी पेस्टल पिंक शेरवानी घातली होती.
केएल राहुल आणि अथिया शेट्टी मागील चार वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. दोघांच्या व्हायरल फोटोवरुन त्यांच्या अफेअरबद्दल जगाला कळले होते. मात्र त्यांनी आपल्या नात्याची कधीही सार्वजनिकरित्या कबुली दिली नव्हती.
खंडाळ्यातील बंगल्यात पार पडलेल्या या लग्नसोहळ्याला दोघांच्या कुटुंबीयांसह जवळचे मित्र उपस्थित होते. लग्नाला अनुपम खेर, जॅकी श्रॉफ यांची मुलगी कृष्णा श्रॉफ, अर्जुन कपूर आणि त्याची बहीण अंशुला कपूर, अभिनेत्री आकांक्षा रंजन कपूर यांनी हजेरी लावली होती.
तर क्रिकेट विश्वातून ईशांत शर्माने लग्नाला हजेरी लावली होती. आयपीएलनंतर केएल राहुल आणि अथियाच्या लग्नाचे रिसेप्शन ठेवले जाणार असल्याची माहिती सुनील शेट्टी यांनी माध्यमांना दिली.
लग्नानंतर केएल राहुल आणि अथिया यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. विराट कोहली, सानिया मिर्झा, अजय देवगण, आलिया भट्ट, करीना कपूर, अनन्या पांडे, विकी कौशल, भूमी पेडणेकर यांनी नवदाम्पत्याला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
संबंधित वृत्त...
चित्रपट अभिनेत्री अथिया शेट्टी आणि क्रिकेटर केएल राहुल सोमवारी विवाहबंधनात अडकले. अथियाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर लग्नाचे काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये कपल एकमेकांचा हात पकडून सप्तपदी घेताना दिसत आहे. अथियाने लिहिले आहे की, 'मी तुझ्या प्रकाशात प्रेम करायला शिकले आहे.' वाचा सविस्तर...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.