आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी-अभिनेत्री अथिया शेट्टी क्रिकेटर-बॉयफ्रेंड केएल राहुलसोबत आज लग्नबंधनात अडकणार आहे. सुनील शेट्टीच्या खंडाळा येथील फार्महाऊसवर हा विवाह सोहळा पार पडत आहे. लग्नबंधनात अडकणारी क्रिकेटर आणि अभिनेत्रीची ही पहिली जोडी नाही. क्रिकेट आणि बॉलीवूडमधील संबंध 1968 पासूनचा आहे. अभिनेत्री शर्मिला यांनी टीम इंडिया क्रिकेट संघाचे कर्णधार आणि नवाब मन्सूर अली खान पतौडी यांच्याशी लग्न केले होते. दोन वेगवेगळ्या मोठ्या क्षेत्रातली आघाडीच्या व्यक्तींची ही जोडी लोकांना खूप आवडली होती आणि त्यांचे लग्न यशस्वीही ठरले होते. यानंतर रीना राय, संगीता बिजलानी, गीता बसरा, अनुष्का शर्मा यांसारख्या अनेक अभिनेत्रींनी क्रिकेटर्ससोबत लग्नगाठ बांधली. त्याचबरोबर अमृता सिंग, सुष्मिता सेन, दीपिका पदुकोण यांसारख्या अनेक अभिनेत्री होत्या, ज्यांचे क्रिकेटर्ससोबत प्रेमसंबंध होते. मात्र त्यांचे नाते लग्नापर्यंत पोहोचू शकले नाही. तर सध्या सारा अली खान, उर्वशी रौतेला यांसारख्या अभिनेत्रींची नावेही भारतीय क्रिकेट संघातील क्रिकेटपटुंशी जोडली जात आहेत.
केएल राहुल आणि अथिया शेट्टीच्या लग्नाच्या खास प्रसंगी, बॉलिवूड आणि क्रिकेटच्या या कॉम्बिनेशनवर एक नजर टाकूया-
बॉलीवूड-क्रिकेटमधील सर्वात आवडते जोडपे
60-70 च्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीतील शीर्ष अभिनेत्री असलेल्या शर्मिला टागोर यांनी 1968 मध्ये भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार मन्सूर अली खान पतौडी यांच्याशी विवाह केला. दोघांची भेट एका कॉमन फ्रेंडच्या पार्टीत झाली होती. त्यानंतर मन्सूर यांनी मैत्रीचा पहिला हात पुढे केला. मात्र, शर्मिला यांनी मैत्री नाकारली. जेव्हा मन्सूर यांनी एका सामन्यात भारताला विजय मिळवून दिला. तेव्हा शर्मिला यांनी शुभेच्छा देण्यासाठी मेसेज केला आणि दोघे मित्र बनले. शर्मिला यांना लग्नासाठी राजी करण्यासाठी मन्सूर यांनी 3 चेंडूत 3 षटकार मारले होते. दोघांनी 27 डिसेंबर 1968 रोजी लग्न केले. या लग्नापासून या जोडप्याला सैफ अली खान, सबा अली खान आणि सोहा अली खान अशी तीन मुले आहेत. मन्सूर अली खान यांचे 22 सप्टेंबर 2011 रोजी निधन झाले.
अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीने 3 वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर 11 डिसेंबर 2017 रोजी इटलीमध्ये सात फेरे घेतले. 2021 मध्ये या जोडप्याला एका मुलीचा जन्म झाला, तिचे नाव वामिका आहे.
बॉलिवूड अभिनेत्री हेजल कीचने 30 नोव्हेंबर 2016 रोजी क्रिकेटर युवराज सिंगसोबत लग्न केले. या जोडप्याने 12 नोव्हेंबर 2015 रोजी लग्न केले होते. पंजाबी रितीरिवाजांनुसार हेजलला तिच्या लग्नात गुरबसंत कौर हे नाव देण्यात आले होते. 25 जानेवारी 2022 रोजी या जोडप्याला मुलगा झाला.
चक दे इंडिया फेम अभिनेत्री सागरिका घाटगेने 24 एप्रिल 2017 रोजी क्रिकेटर झहीर खानसोबत लग्न केले. हे जोडपे पहिल्यांदा एका कॉमन फ्रेंडच्या पार्टीत भेटले होते, त्यानंतर त्यांची मैत्री झाली आणि नंतर त्यांनी विवाह केला.
हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविच यांची 1 जानेवारी 2020 रोजी साखरपुडा झाला. त्यानंतर 31 मे 2020 रोजी दोघांनीही सोशल मीडियाद्वारे माहिती दिली की ते पालक होणार आहेत. ही आनंदाची बातमी शेअर करताना नताशा-हार्दिकने त्यांच्या गुप्त लग्नाचे फोटो शेअर केले होते. 30 जुलै 2022 रोजी नताशाने अगस्त्य नावाच्या मुलाला जन्म दिला.
अभिनेत्री गीता बसराने भारतीय क्रिकेटपटू हरभजन सिंगसोबत 29 ऑक्टोबर 2015 रोजी लग्न केले. 27 जुलै 2016 रोजी गीताने मुलगी हिनायाला जन्म दिला. 10 जुलै 2021 रोजी या जोडप्याच्या घरी मुलगा जोवन वीर सिंगचा जन्म झाला.
जान तेरे नाम फेम अभिनेत्री फरहीन खानने क्रिकेटर मनोज प्रभाकरशी लग्न केले. या दाम्पत्याला राहिल आणि मानववंश ही दोन मुले आहेत. मनोज प्रभाकर यांचा पहिल्या लग्नातील मुलगा रोहनही त्यांच्यासोबत दिल्लीत राहतो.
या सेलिब्रिटींचे तुटले लग्न
70 च्या दशकातील अभिनेत्री रीना रायने 1983 मध्ये पाकिस्तानी क्रिकेटरशी लग्न केले. रीना रॉयने लग्नानंतर फिल्मी जग सोडले. लग्नानंतर या जोडप्याला सनम नावाची मुलगी झाली. मोहसीनने लंडनमध्ये स्थायिक होण्याचा निर्णय घेतल्याने त्यांच्या नात्यातील दुरावा वाढला. रीनाने ब्रिटीश नागरिकत्व घेऊन लंडनमध्ये राहावे अशी मोहसीनची इच्छा होती. पण ती त्याला विरोध करत होती. अखेर 7 वर्षांनी 1990 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर मुलगी सनमची कस्टडी मोहसीन खानकडे देण्यात आली होती. पण मोहसीनने दुसरे लग्न केल्यावर पुन्हा मुलीचा ताबा रीना रॉयकडे गेला.
14 नोव्हेंबर 1996 रोजी अभिनेत्री संगीता बिजलानीने मुंबईतील ताजमहाल हॉटेलमध्ये क्रिकेटर मोहम्मद अझरुद्दीनसोबत लग्न केले. क्रिकेटर अझरुद्दीनचे बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टासोबत अफेअर असल्याच्या बातम्यांनंतर दोघांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला होता. अखेर 2010 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला.
या अभिनेत्री आणि क्रिकेटर्सचे नाते लग्नापर्यंत पोहोचू शकले नाही
80 च्या दशकात अभिनेत्री नीना गुप्ता वेस्ट इंडिजचा क्रिकेटर विवियन रिचर्डसोबत रिलेशनशिपमध्ये होत्या. विवियन आधीच विवाहित होता. त्यामुळे तो नीना यांच्याशी लग्न करू शकला नाही. रिलेशनशिपमध्ये असताना नीना गुप्ताने विवियनची मुलगी मसाबा गुप्ताला जन्म दिला. विवियनसोबत ब्रेकअप झाल्यानंतर नीनाने मसाबाला सिंगल मदर म्हणून वाढवले आहे.
80-90 च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री असलेल्या अमृता सिंगचे एकेकाळी भारतीय क्रिकेटपटू रवी शास्त्रीसोबत अफेअर होते. दोघेही लग्न करणार होते, मात्र तसे होऊ शकले नाही. खरंतर रवीची इच्छा होती की अमृताने लग्नानंतर चित्रपटांपासून दूर राहावे, पण अमृताने ही अट मान्य केली नाही. अखेर दोघांचे मार्ग वेगळे झाले.
मोहब्बतें अभिनेत्री किम शर्माही युवराज सिंगसोबत अफेअर असल्याने चर्चेत आली होती. दोघे 2003 ते 2007 पर्यंत रिलेशनशिपमध्ये होते. त्यांनाही लग्न करायचे होते, पण तसे होऊ शकले नाही. युवराजच्या आईला किम शर्मा आवडत नसल्याच्या बातम्या आल्या होत्या, अशा परिस्थितीत युवराजने आईची आज्ञा मानत किमसोबतचे नाते तोडले.
अभिनेत्री ईशा शेरवानी आणि क्रिकेटर झहीर खान यांचे अफेअरही चर्चेत आले आहे. दोघे 2005 ते 2011 पर्यंत रिलेशनशिपमध्ये होते. 2011 मध्ये विश्वचषकानंतर दोघे लग्न करणार असल्याच्या बातम्याही आल्या होत्या, पण त्यानंतर अचानक दोघांचे ब्रेकअप झाले.
2013 मध्ये सुष्मिता सेन आणि माजी पाकिस्तानी क्रिकेटर वसीम अक्रम यांच्या अफेअरच्या बातम्या आल्या होत्या. दोघेही लग्न करणार असल्याचे बोलले जात होते. पण सुष्मिताने हे वृत्त निराधार असल्याचे म्हटले. सुष्मिताने सांगितले की, ती आणि वसीम फक्त मित्र आहेत आणि दोघेही रिअॅलिटी शोच्या निमित्ताने भेटत होते.
धोनीचे नाव 2007 आणि 2008 दरम्यान अभिनेत्री दीपिका पदुकोणसोबत जोडले गेले होते. त्यावेळी टी-20 विश्वचषक जिंकून माही मोठी स्टार बनला होता आणि दीपिका बॉलिवूडची सेन्सेशन होती. सुरुवातीच्या भेटीनंतर दोघेही अनेक ठिकाणी एकत्र दिसले. दीपिका धोनीच्या निमंत्रणावरून त्याला चिअर करण्यासाठी मॅच पाहायलाही गेली होती. धोनीने पत्रकार परिषदेत दीपिका आपली क्रश असल्याचेही सांगितले होते. दोघांनी एकदा एकत्र रॅम्प वॉकही केला होता. मात्र, काही काळानंतर दोघांचे ब्रेकअप झाले.
1999 मध्ये विश्वचषकादरम्यान अभिनेत्री नगमा सौरव गांगुलीला भेटली होती. तेव्हापासून दोघेही एकत्र स्पॉट होऊ लागले. सौरव गांगुली आधीच विवाहित होता, त्यामुळे दोघांनीही हे नातं जाहीरपणे स्वीकारले नव्हते. जेव्हा या नात्याच्या बातम्या येऊ लागल्या तेव्हा सौरवची पत्नी डोनाने घटस्फोटाची मागणी केली. त्यामुळे सौरवने नगमासोबत ब्रेकअप केले. 2003 मध्ये सावी मासिकाला दिलेल्या मुलाखतीत नगमाने सांगितले की, दोघांचेही करिअर धोक्यात असल्याने त्यांना वेगळे व्हावे लागले.
अथिया-राहुल 4 वाजता लग्नबंधनात अडकणार
बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी आणि भारतीय क्रिकेटर केएल राहुल आज दुपारी 4 वाजता लग्नबंधनात अडकणार आहेत. सुनील शेट्टीच्या खंडाळा बंगल्यात कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडणार आहे. या लग्नात सुमारे 100 लोक उपस्थित राहणार आहेत. तर लग्नानंतर दोघे संध्याकाळी साडेसहा वाजता मीडियाशी संवाद साधणार असल्याची माहिती आहे. येथे वाचा संपुर्ण बातमी.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.