आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नयनताराचा वाढदिवस:नयनताराला व्हायचे होते चार्टर्ड अकाउंटंट, आता साऊथच्या सर्वाधिक मानधन घेणा-या अभिनेत्रींमध्ये होते गणना, 50 सेकंदांच्या जाहिरातीसाठी घेतले होते 5 कोटी रुपये

17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्रभुदेवासोबत लग्नासाठी बदलला होता धर्म

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे नयनतारा. नयनतारा आज तिचा 37 वा वाढदिवस (18 नोव्हेंबर 1984) साजरा करत आहे. बंगळुरुमध्ये ख्रिश्चन कुटुंबात तिचा जन्म झाला. तिचे खरे नाव डायना मरियम कुरियन आहे. नयनताराचे वडील कुरियन कोदियात्तु एअरफोर्समध्ये होते, तर आई ओमाना कुरियन गृहिणी आहेत.

वडील एअरफोर्समध्ये असल्याने नयनताराचे देशातील विविध शहरांमध्ये शिक्षण झाले. तिचे शिक्षण चेन्नी, जामनगर, थिरुवला आणि दिल्लीत झाले. वडिलांच्या निवृत्तीनंतर तिचे कुटुंब केरळमध्ये स्थायिक झाले. नयनताराने महाविद्यालयीन शिक्षण येथूनच पूर्ण केले. तिला चार्टर्ड अकाउंटंट व्हायचे होते. नयनतारा साऊथमधील सध्याच्या घडीची सर्वात महागडी स्टार आहे. नयनतारा एका फिल्मसाठी 3 कोटी रुपये चार्ज करते. तिच्याकडे सुमारे 71 कोटी रुपयांची प्रॉपर्टी आहे.

महागड्या कार आणि आलिशान घराची मालकीण
नयनताराकडे बीएमडब्ल्यू एक्स 6 (किंमत साधारण 76 लाख) आणि ऑडी टीटी रोडस्टर (60 लाख) सारख्या लक्झरी कार आहेत. याशिवाय थिरुवला, केरळ येथे आलिशान बंगले आणि कोच्ची येथे प्रेस्टिज नेप्च्यून कोर्टयार्ड येथे शानदार फ्लॅट आहे. याशिवाय नयनतारा कित्येक ब्रँड्ससाठी एंडोर्समेंटच्या माध्यमातूनही कमाई करते. यामध्ये जीआरटी ज्वेलर्स सारख्या कंपन्या आहेत. एका माहितीनुसार नयनताराने 50 सेकंदांच्या एका टीव्ही जाहिरातीसाठी 5 कोटी रुपये चार्ज केले होते. या जाहिरातीची शुटिंग दोन दिवस चालली होती.

प्रभुदेवासोबत लग्नासाठी बदलला होता धर्म
नयनतारा 2008 मध्ये अभिनेता, दिग्दर्शक, डान्सर प्रभुदेवाच्या प्रेमात पडली होती. प्रभुदेवासोबत लग्न करण्यासाठी तिने हिंदू धर्म स्वीकारला होता. 2010 मध्ये प्रभुदेवाची पत्नी लताने फॅमिली कोर्टात याचिका दाखल केली होती, त्यात आरोप केला होता की प्रभुदेवा, नयनतारासोबत लिव-इनमध्ये राहात आहे. त्यानंतर लताने धमकी दिली होती, की प्रभुदेवाने नयनतारासोबत लग्न केले तर ती आमरण उपोषण करेल. काही महिला संघटनांनी नयनताराला तामिळ संस्कृती धुळीस मिळवत असल्याचा आरोप करत तिच्याविरोधात आंदोलन केले होते. तिचे पुतळेही जाळण्यात आले होते.

विग्नेश शिवन सोबत नयनतारा
विग्नेश शिवन सोबत नयनतारा

2011 मध्ये प्रभुदेवाने घेतला होता घटस्फोट
नयनतारासोबत अफेअर सुरु झाल्यानंतर प्रभुदेवाना त्याचे 16 वर्षे जुने लग्न मोडण्याचा निर्णय घेतला होता. जुलै 2011 मध्ये प्रभुदेवाने त्याची पत्नी लताला घटस्फोट दिला. यानंतर 2012 मध्ये नयनताराने म्हटले की, आता प्रभुदेवासोबत माझे सर्व संबंध संपले आहेत. तिनेही त्याच्यासोबतचे संबंध तोडले. आता नयनतारा विग्नेश शिवन नावाच्या व्यक्तीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. मागील वर्षी त्यांचा साखरपुडा झाला होता.

मंदिरात सलवार सूटमध्ये गेल्याने झाला होता वाद
2009 मध्ये नयनतारा केरळमधील ओट्टापालम येथील अम्मान मंदिरात साडी ऐवजी सलवार सुटमध्ये पोहोचली होती. साडी नेसली नसल्यामुळे प्रशासनासह भक्तांनी नयनताराला मंदिरात प्रवेश नाकारला होता. साऊथमध्ये बहुतेक मंदिरात महिला या साडीमध्येच जातात, या घटनेनंतर लोकांनी नयनताराला एक बॉक्स भरुन साड्या पाठवल्या होत्या.

बातम्या आणखी आहेत...